Tuesday, August 18, 2015

बाबासाहेब, महाराज आणि मी


निवेदन : मुद्दे अत्यंत खाजगी , माझ्या स्वत:च्या अनुभवातून आणि माझ्या असेल नसेल तेवढ्या वाचनातून आलेले आहेत. याचा कोणत्याही विचारसरणीशी, जातीशी, पक्षाशी किंवा कशाशीही संबंध जोडू नये. माझ्या प्रमाणे तोकडे वाचन आणि सदर वादापासून लांब असणाऱ्या लोकांचेही काहीतरी माझ्या प्रमाणेच असावे या समजुतीतून ४ गोष्टी लिहाव्याश्या वाटल्या.
१. माझे वाचन जास्त नाही. शिवाजी महाराजांबद्दलही मी जास्त वाचलेले नाही. पण मराठी म्हटल्यावर आपसूकच "शिवाजी महाराज की जय"ची भावना आहे. ती तीव्रही आहे पण कट्टर ( कट्टर हिंदू कट्टर मुस्लीम इत्यादी कट्टर प्रमाणे ) नक्कीच नाही. साहजिकच आहे पुरंदरे मी कधीच वाचले नाहीत.
२. पण बाबासाहेबांना मी चेहऱ्याने ओळखायचो. शिवशाहीर म्हणून. मला ते फुल टाईम शाहिरी करतात याचे अप्रूव वाटायचे. यांच्या पोटापाण्याचे काय ? असाही प्रश्न पडायचा.
३.शिवाजी महाराजांबद्दल आणि जिजाऊंबद्दल काहीतरी आपत्तीजनक आहे ते मला पुण्यातल्या बिग्रेडीनी जेम्स लेन प्रकरणाबद्दल केलेल्या तोडफोडी नंतर कळले. माझ्या सारख्या बऱ्याच जणांनाही असेच कळले असावे.जेम्स लेन तांबडा की गोरा हेही मला माहित नाही ,त्याला गुगल करण्याचीही कधी उत्सुकता वाटली नाही.
४. पण त्यामुळे माझ्यावर महाराज किंवा जिजाऊ यांच्याबद्दल काडीचाही फरक पडला नाही. माझा आहे तोच समज राहिला. इतर सर्वांचा राहिला असावा असे वाटते , कारण आजपर्यंत मी कोणालाही "त्या" विषयावर कुजबुज करून असुरी आनंद घेताना पाहिलेले नाही.
५. काही जण हटकून कुठल्याश्या बिग्रेडी पोष्ट मध्ये tag करतात किंवा ग्रुप मध्ये add करतात तेंव्हा मला तिथे अत्यंत गलिच्छ ( अत्यंत म्हणजे अत्यंत गलिच्छ , ज्याला सीमा नाही ) अशा प्रकारचे विचार / विखार वाचायला मिळतात. आता कोणत्या जातीचे कोणत्या जातीविषयी काय बोलतात हे मी तुमच्या अनुभवांवर सोडतो. त्याचा चवीने आस्वाद घेणारेही आहेत. कायम मारामारीची भाषा आणि अत्यंत व्हायलंट अशा वातावरणात "विचारांचा सामना विचारांनीच व्हायला हवा" असे काहीतरी पालुपद वाचल्यावर मला हसायला यायचे.
६. याच ग्रुप वर संत ज्ञानेश्वरांवरही अत्यंत घाणेरड्या भाषेत लिहिलेले वाचल्यानंतर माझी परत त्या ठिकाणी जाण्याची हिम्मत झाली नाही. त्यामागचा हेतू ज्याने त्याने आपल्याला समजानुसार ठरवावा
७. बदनामी झाली बदनामी झाली असे ओरडल्यामुळे खरे तर ज्यांना नाही त्यांनाही हा विषय समजला. आणि हा अजून पसरवला जातो यामागे जातीची राजकारण असल्याचे सरळसरळ दिसते. हे अखंड बल्क पोलरायझेशन आहे . यातून अस्मितेचे राजकारण पेटवून फक्त राजकीय पोळी भाजली जाताना दिसते .
८. महापुरुष हे समाज घडवतात. समाज घडवताना ते सगळ्या जातीधर्माला बरोबर घेतात. कालांतराने मात्र ते महापुरुष झाले की त्या त्या जातीचे लोक महापुरुषावर आपला कॉपीराईट सांगतात. हा एकप्रकारे त्या महापुरुषाला खुजेपणा आणण्याचा करंटेपणा आहे. हे प्रत्येक महापुरुषाच्या बाबतीत खरे आहे.
९. Whatsapp किंवा फेसबुकवर काही ऑडियो टेप ऐकायला मिळाल्या, त्यात स्वत:ला शिवप्रेमी म्हणवणाराच्या आवाजातला माज , भाषा, शिवीगाळ आणि वैचारिक कुवत पाहता शिवाजी महाराज किमान त्याला तरी समजले आहेत का अशी शंका उत्पन्न झाली. आणि हेच लोक महाराजांचा घनघोर अपमान करत आहेत असे वाटले. शिव्या देऊन मारधाड करून जर आपण महाराजांची महानता वाढवणार असू तर आपण महाराजांपेक्षाही महान आहात असे म्हणावे लागेल. नपेक्षा महाराजांचे नाव घ्यायचीही आपली लायकी नाही हे स्वत:च ठरवावे. एकाने दहा मिनिटाची क्लिप पाठवली होती , त्या दहा मिनिटात किमान ५०० आई बहिणीच्या सर्वांगाचा उद्धार करणाऱ्या शिव्या होत्या. कान मिटले.
१०. बाबासाहेबांना पुरस्कार मिळावा की न मिळावा यावर माझे मत खरेतर शून्य आहे. कारण पुरस्काराने फक्त एक recognition मिळते. बाबासाहेबांच्या समर्थकांना किंवा विरोधकांना आधीच त्यांच्याविषयी सगळी माहिती आहे त्यामुळे त्याना वेगळ्या रीक्ग्नीशनचे महत्व नाही/नसावे.
११. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे, बाबासाहेबांविषयी तुमची मतं + किंवा - जशी आहेत ती तशीच राहणार आहेत .आय मीन , पुरस्कार मिळाला ( किंवा मिळाला नाही ) तरी त्यात किंचितसाही बदल होणार नाही. पुरस्कार ही फक्त कपाटात ठेवायची शोभेची गोष्ट आहे. त्यामुळे हा वाद निष्कारण आहे आणि त्याचा तुमच्या आमच्या रोजच्या व्यवहारात कसलाही फायदा किंवा तोटा नाही.
असे आणि बरेच . जमल्यास समाज जोडला जाईल अशा गोष्टी आपल्या हातून झाले तर बरे. तोडायला बरेच असतात . आपण त्यात भागीदार होऊ नका एवढीच विनंती . फेसबुक वर मी फक्त टवाळ्या करायला , टाईमपास करायला आणि मनोरंजन करून घ्यायला येतो.त्यामुळे ग्यान पाजण्याचा हेतू नाही. हे पटलंय तर ठीक आहे, नसेल पटलं तर सोडून द्या.आग्रह कसलाच नाही .

Saturday, July 25, 2015

रियलिटी शोज आणि मी

"इन्डियन आयडल" हा भारतातला पहिला रियलिटी शो असावा. २००४ साली हे रियलिटी शो चं लोणचं भारतात आलं. "अमेरिकन आयडल"च्या थीमचं देसी व्हर्जन. त्यावेळी हे आपल्याला नविन होतं , मलाही होतं. आपण फुल्टू सेंटी.

सुरुवातीच्या ऑडीशन , त्यातले ते गाण्यातला ग देखील माहिती नसताना गायला आलेले स्पर्धक , एक से बढकर एक विचित्र विभूती यामुळे ऑडीशनचा भाग तसा मनोरंजकच ! ते पाहून क्षणभर हसूही येतं. काही नग एवढे हिमनग असतात की ते कायमचे लक्षात राहतात. मधेच एकेकाच्या घरची गरिबी , ट्रेजीडी ,आई वडिलांची कहाणी सांगून एक वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न. कोणी गरीब , कोणी चहावाला, पेंटर , दर्जी किंवा कोणी लहानपणापासून संगीत शिकणारी. कोणी पैदा होताच  "मै इंडियन आयडॉल बनुंगा " म्हणणारा.

एक किंवा २ एन्कर. हे शक्यतो इंडस्ट्रीतले स्ट्रगलर असतात. विनोदाचा तडका , हजरजवाबीपणा आणि नॉनस्टोप टेम्पो कमी होऊ न देता शो सुरु ठेवण्याची जबाबदारी त्यांची.   तीन जजेसचं प्यानेल. ज्यांना काही काम नसतं ते रियालिटी शोज करतात ( आणि ज्यांना काही येत नाही ते डेलीसोपचे संवाद लिहितात, असो ) नंतर राउंड वन .. राउंड टू .. ड्यूएल राउंड , अमका राउंड तमका राउंड करत करत एलिमिनेशन सुरु होत जातात. देशभरातले दर्शक आपल्या फेवरेट सिंगर बद्दल सेंटी होत जातात. हा सेंटीयापा वाढवण्यासाठी जज पण आपल्या अभिनयाचा कस लावतात. हे सगळं नवीन असतं त्यामुळे मला पटत असतं. वाढीव दराचे SMS पाठवून वोट करण्याचे आवाहन केले जाते. मी देखील एलिमिनेशन च्या वेळी नखं चावत बसतो. आपला भिडू वाचला की जीव भांड्यात पडतो. परत मग नवीन च्यालेंज. मग क्वार्टर फिनाले , सेमी फिनले आणि मग ग्र्यांड फिनाले .. मग ते पॉज घेऊन ३-४ वेळा गुगली करून विजेत्यांची नावे झुलवत ठेवणे. आपले देव पाण्यात असतात. आपण ना जिंकणार ना हरणार तरीही आपला रक्तदाब कमी जास्त होत राहतो. मग एक भिडू जिंकणार, महिनाभर त्याचंच कौतुक चालणार. त्याला कार, एक करोड आणि एक वर्षाचे कॉन्ट्रेक्ट. हरणाराला ठेंगा. जो जिता वही सिकंदर , हारा वो बंदर.

नंतर कळतं , केवळ SMS मधून करोडोचा नफा कमावला गेला. विजेता कोण होणार हे आधीच ठरलेलं असतं. मालिकेच्या TRP साठी जे जे काही करता येईल ते केलं जातं. शो मधला सेंटीयापा आठवून माथ्यावरची नस तडकते. आपण चुत्त्या बनलेलो असतो. जजेस चा त्यावेळचा चुतीयापा आठवतो . सगळं डोळ्यासमोरून जातं. नंतर परत रियालिटी शो न बघणे , फिक्स ! डन !

मात्र TRPची उपजाऊ जमीन सापडलेली असते. सगळ्या प्रकारचे शेतकरी सगळ्या प्रकारच्या रियालिटी शो ची शेती करायला लागतात. मग गाणे , नाचणे , पकवणे , कॉमेडी करणे इथपासून तर स्टंट करणे,  एकाच घरात २०-१ नमुन्यांना कोंबून त्यांना रोज तासभर दाखवणे , वगैरे वगैरे. त्यात व्हेरीयेषण म्हणून मुलांचे रियालिटी शोज , सेलेब्रेटीचे रियालिटी शोज. सेंटीयापा अपने चरम तक पाहूच जाता है. सगळ्या पडीक लोकांची जजेस म्हणून नियुक्ती होते. शोज एवढे होतात की अचानक आलेल्या मागणीला त्या क्षेत्रातून मुबलक पुरवठा होत नाही. मग कोणत्याही सोम्यागोम्याला उचलून जज बनवले जाते. जसे नाचण्यात पाय कुठे ठेवावा हेही माहित नसलेला चेतन भगत किंवा करन जोहर आता लोकांना डान्सवर जज करतो. फराह खान गाणे कसे गावे यावर एक्पर्ट ओपिनियन देते. सगळीकडेच एसेमेस मागवण्याची प्रथा असते. दर्शक सगळ्यांनाच मिळत असतात. सेंटीयापाच्या नव्या नव्या क्लुप्त्या काढल्या जातात. एंकर सडेगले जोक मारतो. हसू येत नाही. कोण हरले जिंकले याने फरक पडत नाही. आता जिंकणाराचे २ दिवसही कौतुक होत नाही. सावळा गोंधळ अविरत सुरु राहतो.

रियालिटी शोज ला मात्र मी २००४ च्या इंडियन आयडॉल नंतरच रामराम केला होता. आता मी फक्त ते पाहणारांवर लांबून हसतो . 

Friday, May 1, 2015

उन्हाळा : कुल्फ्या, पेप्सी, पोहणे वगैरे वगैरे


रणरणती ऊन्हाळ्याची दुपार , घराबाहेर संपूर्ण शांतता. सगळेजन घरात चिडीचूप दडी मारून झोपलेले. पोराटोरांना घराबाहेर निघायला बंदी घातलेली असायची. जास्तीत जास्त गेटच्या आतून बाहेरची मजा बघायची अनुमती मिळायची. रोड वरून एखाददुसरा माणूस किंवा एखादी भाकड गाय कोणी काही खायला देतंय का म्हणून दारोदार भटकताना दिसायची. गवत वाळून पिवळं पडलेलं असायचं. एवढ्यात तो दिसला की सगळीकडे एकच गलका व्हायचा. एक्च्युली तो दिसाय्चन आही , घंटीचा आवाज ऐकू यायचा. मग समजून जायचं , कुल्फीवाला कही आसपासही है! गारेगार चौकोनी पेटीत बर्फ आणि त्यावर त्या ट्यूबमध्ये भरून खुपसून ठेवलेल्या कुल्फ्या. वेगवेगळ्या साईझच्या आणि वेगवेगळ्या फ्लेवरच्या. इलायची फ्लेवर सस्ता , म्यान्गो फ्लेवर मेहेंगा.. लक चांगले असेल तर म्यान्गो कुल्फीसाठी पैसे मिळत. कुल्फीवाला कोणती कुल्फी कडक झाली हे कड्या हलवून पहायचा , जी झाली असेल ती बाहेर काढून पाण्यात ढवळायचा मग कुल्फी त्या कंटेनर मधून बाहेर निघे, मग त्या कुल्फीच्याच लिक्विड मध्ये बुडवून आपल्याला द्यायचा. मजा यायची .
अजुन एक कुल्फीवाला असायचा. त्याच्याकडे अंड्याच्या आकाराचे कंटेनर असत. एक बाहेर काढून त्यात ती बांबूची काडी खुपसायची , आणि रबरलॉक काढलं की ते अंड्यासारखी कुल्फी तयार. मटका कुल्फीवालाही असे. तो एका सिलेंडरीकल ग्लासात मटका कुल्फी बनवायचा. त्याचे चार भाग करून चतकोर आकारच्या चार कुल्फ्या तयार करायचा. कुल्फीवाल्यापेक्षा जरा हटके बिजनेस म्हणजे पेप्सीकोला. चाराणे-आठाणे-रुपया नुसार पेप्सीकोल्याची लांबी असायची. वेगळ्या रंगाचे वेगळ्या फ्लेवरचे पेप्सी ! विटकरी हिरवा लाल नारंगी . दुधाचा पेप्सी दुप्पट किमतीला . पण पेप्सीकोला हातगाडीवरच नाही तर दुकानांतही मिळायचा त्यामुळे त्याचे खास आकर्षण नसायचे. दाताने एका कॉर्नरचा प्लास्टिक कुरतडून पेप्सी चोखायची. शेवटी फक्त बर्फ उरला की फेकून द्यायची !

उसाचा रसही असा फिरत्या गाडीवर विकणारे असत. तो आपल्या बायको किंवा पोरासह आपला एक बैल , तो चरखा आणि उस घेऊन गल्लीगल्लीतून भटकायचा. मोठा ग्रुप तयार झाला की तिथेच गाडी लावून बैलाला गोल गोल फिरवून रस काढायचा. लिंबू आलं मारके उसाचा रस रेडी टू ड्रिंक.

असतात एकेक दिवस. उन्हाळ्यातल्या दुपारची शांतता सर्वात शांत असावी. लिंबाच्या किंवा वडाच्या झाडाखाली मस्त खेळत तिथेच दडी मारून द्यायला मजा यायची. उन्हाळ्यात आम्ही रानात पोहायला जायचो. दर वेळी नव्या नव्या विहिरी शोधायचो. विहिरीवर पोहून झालं की विहिरीच्या काठावर उताणे पडायचो. तो गरम चटका अंगावर घ्यायला मजा यायची. गरम झालो की तिथूनच परत पाण्यात सूर मारायचा. पोहून झालं की मग तिथेच डबा खोलून खायचा आणि वावरातून टमाटे हरबरे तोडून खायचे.

उन्हाळा म्हटला की मला हे आठवतं. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. असो.

Monday, April 6, 2015

काळ


काळ, वेळ , समय , टाइम , इत्यादि इत्यादि. महाभारतातला तो नरेशन करणारा "समय" आठवतो. रोज रविवारी सकाळी ९ वाजले की , "मै समय हु .. मै अनंत हु मै निरंतन हु मै अमर हु , मै ये हु मै वो हु " वगैरे सारखी गर्विष्ठ वाक्य फेकत तो आपल्याला पकवत असे. काळ बदलत राहतो. तो आपल्यासोबत सगळ्या गोष्टी बदलतो. गोष्टी बदलत असतात तेंव्हा आपल्याला त्या खास जाणवत नाही, मात्र कालांतराने मागे वळून पाहिल्यावर कळतं, "अरेच्चा, खूप पुढे आलोय आपण.. खूप काही बदललंय "

आज फार सेंटी मारण्याचा इरादा बिलकुल नाही. कधीमधी वेळ मिळाला की मी जुने पुराणे फोटोज बघतो. ज्यावेळी फोटो काढणे हे एक पर्व असायचे , एके काळी फोटो काढायचा म्हणून लोक स्टुडियोमध्ये जायचे किंवा खास नट्टा पट्टा करायचे किंवा मग काहीतरी प्रसंग असेल तेंव्हाच तो फोटो काढला जायचा. तेंव्हाच्या प्रत्येक फोटो बरोबर बऱ्याच आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. घघरातली सर्व कामं धामं आटोपली आणि दुपारच्या निवांत क्षणी कधी कोणी अल्बम घेऊन बसलं की मग गप्पांचा आणि आठवणींचा सुकाळ जमतो तो आता जवळपास दुर्लभ आहे. नपेक्षा कोणाला त्याचे सुखदुख नाही . उचलला कॅमेरा , केले बदकासारखे ओठ की काढला सेल्फी. आता च्या फोटो बरोबर काही आठवणी जोडल्या जात असतील आणि भविष्यात त्या आपण आठवू असे मला बिलकुल वाटत नाही. तर ते असो . काळ सर्व बदलत असतो

शाळेतला पहिला दिवस. पहिल्या दिवशी झालेला आपला पहिला मित्र , मग पहिली ते दहावी त्याच्याच बरोबर शेयर केलेला बाक , भांडणं , एकसाथ केलेल्या मारामाऱ्या , शेतातून चोरलेल्या कैऱ्या. कधीकाळी त्या मित्राशिवाय आपले जगणे फारच आळणी किंवा अशक्य वाटतं . पण ते मागे पडलं. नंतर त्या मित्राचं नावही कधीतरी आठवतं. काळ बदलतो, तो नवीन पात्र घेऊन येतो. वेगळ्या प्रकारचे मित्र , वेगळ्या प्रकारची नाती , वेगळ्या आठवणी , परत एकदा वाटतं , हे नसेल तर आयुष्यात काही चार्म नाही. काळ आपल्या वेगाने दौडत असतो. कॉलेजातल्या आठवणी , मित्र , किस्से , वेडेपणा .. सगळं सगळं तिथेच ठेवून काळ आपल्याला पुढे घेऊन जातो. पहिला पगार , पहिली नोकरी , पहिले चुंबन , पहिले प्रेम आणिक बरंच काही .. हे फक्त एकदाच , काळ वन्स मोर देत नाही. प्रत्येक वळणावर आपला एक रोल असतो. आपण त्यात गुरफटलेलो असतो याची त्यावेळी जाणीव होत नाही. पण मग मागचं काही आठवलं आणि आता परत त्या रोल मध्ये राहावंसं वाटलं की ते अशक्य आहे आणि आपण आता नव्या भूमिकेत अडकलो आहोत याची जाणीव होते.

काळ हा प्रकार आधी जवळपास प्रत्येक लेखकाने उष्टा करून ठेवलेला आहे. बऱ्याचदा त्यांच्या काळातल्या घटना वाचून त्याचा आपण आपल्या काळाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो . बरं वाटतं. सुखद. बघता बघता जाणवलं उत्तरायण सुरु झालेलं आहे.

काहीतरी करायला हवं.. काळाच्या ओघात बरंच काही सुटलंय , बघू पकडता येतंय का ते. काळ कधी कोणाला सगळं एकसाथ देत नाही , काहीतरी बाकी ठेवतोच.
घीसापिटा परंतु जरुरी शेवट , कालाय तस्मै नम: !

अरे हो , आणि एक राहिलंच , इथे रीकॅपच बटणही नाही .

Sunday, January 11, 2015

वर्ल्ड कप २०१५ साठीचा "संघ"

वर्ल्ड कप २०१५ साठी 'संघ' खालील प्रमाणे
१. नरेंद्र ढोणी (कर्णधार आणि विकेटकपूर ) : यांच्यासारखा कर्ण पकवणारा खेळाडु दुसरा नाही. मायावी व्युह रचण्यात आणि फेकण्यात माहीर. ओपनिंग बॉलर,ब्याट्समन, विकेटकपूर, अम्पायर , लेग अम्पायर , थर्ड अम्पायर , रेफ्री , कमेंट्रेटर , पीच क्युरेटर, स्कोरर , बारावा खेळाडू , सब कूच नढो
२. अमित कोहली (उपकर्णधार) : कर्णधाराच्या कुटिल कारस्थानांना कृतीत उतरवण्यात माहीर. प्रतिस्पर्धी टीमचे स्नुपिंग करण्यात, किडन्यापिंग करण्यात धमकवण्यात प्राविण्य
३. रामदेव पटेल : तुम्हाला पटेल नाही तर नाय पटेल, हा टीम मधे आहे. हा काळे रन्स परत आणणार होता. कधी टीमसाठी नवीन एकधाव प्रणाली आणा म्हणाला होता. याचा डोळा सारखा फडफडत असतो.
४. देवेंद्र धवन : कमी वेळात जास्त प्रसिद्धि. कमाल के एथलिट. ५६-७०-७५ ची फिगर. याची वेगळ्या फलंदाजांची टीम हवी म्हणून फार जुनी मागणी आहे . जय फलंदाज.
५. सुषमा शर्मा : घेतलंय ब्याट्समन म्हणुन.. पण ब्याटींग करतील की नाही माहीत नाही. रामभरोसे ब्याट्समन
६. मनोहर रैना : चले तो चांद तक.. नही तो रात तक. ब्याटींग करताना ऊत्तम डुलक्या घ्यायची सवय. अंतरराष्ट्रीय पातळीवर येऊनही गोव्यात गल्ली क्रिकेट खेळण्याच्या मूड मधेच असतात.
७. अरुण जेटहाणे : ऊकडलेले अंडे देतो ब-याचदा. दाखवतो विद्वान.. पण खेळतो बकवास.
८. हर्षवर्धन अश्विन : पुरातन काळातली वैज्ञानिक टेक्नॉलॉजी वापरुन स्पिन बॉलिंग करतो. रिकाम्या वेळात वाटाणे सोलतो. मुळव्याध आणि मलबद्धकोष्ठ झाल्यासारखा कुंथून कुंथून बॉलिंग करतो.
९. नितिनेश्वर गडकुमार : बॉल फेकण्यात आणि धावा चोरण्यात माहीर. यांच्या ड्रायव्हरच्या नावावर ५०० विकेट्स आहेत. फुल्टू गोलमाल. एकदा बसले की उठत नाहीत.
१०. इस्तीफाशंकर शर्मा : बांबूसारखी लांबलचक जीभ, नुसते वाईड आणि नोबॉल टाकण्यात एक्स्पर्ट, त्यामुळे वेळोवेळी कुजावण्यात येतात. विरोधी टीमला भरपेट धावा लुटावण्यात माहीर
११. संबित यादव : आंगाड-तंगाड बॉलिंग साठी प्रसिद्ध. बऱ्याच फलंदाजांकडून कायम चोप खातो तरीही तोंड उचकून सेम इंटेन्सिटीने बॉलिंग करतो.
१२. शहनवाज शामी : कांगडेस कांगडेस करून वात आणतो. बिनकामाचा भज्या, फक्त अल्पसंख्यांक असल्याने संघात नावापुरता असतो
१३. राजनाथ जडेजा : कधी काय करतील सांगता येत नाही. अष्टपैलू म्हणून घेतलं आहे , पण धोतर घालून इकडून तिकडे पान खात हिंडत असतात. आंधळी आणि लकबायचान्स वर विश्वास.
१४. सदानंद रायडू : का घेतला , कोणी घेतला कसा घेतला , काय काम .. कोणालाच माहिती नाही
१५. विनोदकुमार बिन्नी : हा चोंग्या चूपा संघी. दिल्लीमध्ये गद्दारी केल्याबद्दल हळूच संघात जागा मिळाली.
कोच आणि व्यवस्थापक : अर्थात मोहन शास्त्री
फिजियो : लालकृष्ण अडवानी
- (c) tarzan

Saturday, January 3, 2015

माझे हिंदुत्व

मी जन्माने हिंदू आहे. सर्वधर्म समभाव हे मी शाळेत शिकलो. दुसऱ्यांचा द्वेष करू नये ही माझ्या आई-वडिलांची शिकवण. आमच्या घरी पूजा होतात , देवदर्शनालाही जातात. कधीमधी दानधर्मही असतो. देव दगडात नाही माणसात पहा असे गाडगेबाबा सांगतात. माझ्या धर्मात जेवढेही संत महात्मे होऊन गेले त्यात प्रत्येकाने थोतांडाला विरोधच केला. प्रत्येक वेळी कट्टरतेला विरोध केला आणि प्रेमाचाच संदेश दिला.  मी जसा मोठा झालो तश्या मला माझ्या धर्मातल्या गोष्टी खटकू लागल्या. धर्माचा आणि लोकांच्या आस्थेचा फायदा घेऊन माझ्या धर्माची/राजकारणाची दुकान मांडलेली मला सर्वाधिक खटकते. जेजुरीला गेलो तेंव्हा ६ तास रांगेत उभे राहून मला ६ सेकंदही दर्शन घेता आले नाही. समोर कमीत कमी १०० रुपये दान करायची जबरदस्ती करणारा भटजी होता. मी १० रुपये टाकल्यावर तो जवळपास माझ्यावर उखडलाच. आणि त्याने मला अक्षरश: हुसकून लावले. बाहेर शॉर्टकट मधे 'दिवसा' जागरण गोंधळ घालण्याचे ५०० रुपये होते. आईच्या आग्रहाखातर मी तेही केले. नंतर तुळजापूरला गेलो. माझा होणारा त्रागा पाहून आईने ब्राम्हण फिक्स केला , त्याला ५०० रुपये दिल्यावर त्याने आम्हाला VIP रांगेतून दर्शन दिले. तिथेही देवीचे दर्शन फक्त ४-५ सेकंद. तिथला भटजी पुन्हा माझ्यावर खेकसला होता. सामान्य लोकांचा वेटिंग टाईम सुमारे ६ तास होता. त्यात पुन्हा देवीला खण आणि नारळ , रुपये फक्त २०० ते ५००. ते घ्यायचं, गाभाऱ्यात द्यायचं आणि बाहेर पाहिलं की तीच गोष्ट परत "देवीला वाहिलेले खण रुपये ५००" विकायला हजर. ही २-३ उदाहरणं. अशी भरपूर उदाहरणं आणि अनुभव माझ्या वाट्याला आले. पुण्या-मुंबईत असाल तर गणपतीच्या दिवसांत दगडूशेठ किंवा लालबागला हा अनुभव घेऊन पाहू शकता. (किंवा घेतलाही असेल) तुम्ही कुठल्याही मंदिरात जा , बाजार मांडला आहे. आपण लकी आहोत आता सती जाण्याची हिंदू प्रथा बंद केली आहे. निर्मल बाबा, रामपाल, आसाराम , अनिरुद्ध बापू किंवा आलाने फलाणे बाबांचे भरघोस पिक आपल्या देशात आहे. त्यांची दिन दोगुनी रात चौगुनी प्रगती होत असते. हा पाखंड धर्मपंडित राजरोसपणे "हिंदू धर्माचे" नाव देऊन करत असतात. चारेक दिवसांपूर्वीच "किसिंग बाबा" ला हैदराबादमध्ये अटक झाली आहे. एकदा का धर्माला ढाल बनवली की त्यावर प्रश्न विचारणे साहजिकच पाप होते. जे मला बिलकुल अमान्य आहे. आणि धर्माच्या नावावर काहीही चुत्स्पा करणार आणि तो मानला तरच तुम्ही कट्टर हिंदू आहात अन्यथा तुम्ही हरामखोर आहात , तुम्ही दुसऱ्या धर्मावर टीका करून दाखवा , सारखी येडछाप आर्ग्यूमेंट मी फाट्यावर मारतो. दुसरे भंगार आहेत म्हणून तुमचे चांगले ठरत नाही. दुसऱ्याच्या नाकाला शेंबूड आहे म्हणून मीही शेंबड्यासरखाच राहणार, जोवर त्याचाशेंबूड साफ होत नाही तोवर मी माझा लटकत ठेवणार , हा शुद्ध मूर्खपणा आहे.
मी हिंदू आहे त्यामुळे मी हिंदू धर्मावरच टीका करणे स्वाभाविक आहे. आणि तशीही ती धर्मावर टीका नसतेच. टीका असते धर्माचा आधार घेऊन सुरु असलेल्या फालतूगिरीवर. मी मुस्लीम/ख्रिश्चन/बौद्ध /इतर असतो तर मुस्लीम/ख्रिश्चन/बौद्ध/इतर धर्मातल्या फालुतगिरीवर टीका केली असती. थोडक्यात, 'हा धर्म' ही अत्यंत फालतू आणि बिनकामाची गोष्ट आहे. धर्मातून ज्या ज्या चांगल्या गोष्टी, आहेत, ज्या माझ्या विवेकबुद्धीला पटतात तेवढ्या मात्र मी घेतो. धर्म हा चार भिंतीत राहिला पाहिजे, व्यक्तिगत राहिला पाहिजे आणि त्याचा वापर दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी होऊ नये. तेंव्हा धर्माला किती किंमत द्यावी हे ज्याचे त्याने ठरवावे.
तुम्ही जर शिवाजी महाराजांचे भक्त असाल तर फोटो शेयर करा - समजा नाही केला तर माझी श्रद्धा कमी ?
तुमच्या आईवर तुमचे प्रेम असेल तर फोटो लाईक करा - समजा नाही केला तर माझ्या आईवरचे माझे प्रेम शून्य ?
तुम्ही जर कट्टर हिंदू असाल तर अमुक तमुक करा - समजा नाही केलं तर मी हिंदू नाही ?
हिंदु धर्म बचाना हो तो आमके तमके पार्टी को वोट दो - समजा मी नाही त्याला मत दिलं तर माझी सुन्ता होणार?
हे असले प्रकार स्वत:चा मेंदु गहाण ठेवल्याचे प्रतिक अाहेत.
जीवन समृद्ध आणि आनंदी करण्यासाठी कट्टरतेची नाही तर समजदारीची आणि निर्मळ मनाची आवश्यकता आहे. धर्माच्या नावावर इतरांची मुंडकी कापण्यात , बॉम्बस्फोट करण्यात किंवा फेसबुकवर इतर धर्मियांना शिव्या देणारांना कधीच मन:शांती लाभत नाही. ते कायम द्वेषाच्या आगीत जळत राहतात. मी लहानपणी आजोबांसोबत जेंव्हा मंदिरात जायचो तेंव्हा आजोबा मला ऐकू येईल अशा आवाजात देवाला म्हणत " देवा, सर्वांना सद्बुद्धी आणि शांती दे" ( "सर्वांना" , फक्त हिंदूंना नव्हे) तेंव्हा मी म्हणायचो , तुम्ही देवाकडे चॉकलेट किंवा आईसक्रीम का मागत नाहीत ? त्यावर ते म्हणत , "तू मोठा होशील तेंव्हा तुला समजेल". मला समजले. पण आजूबाजूला वयाने वाढलेले खूप दिसतात , पण त्यांना ही साधी गोष्ट समजलेली दिसत नाही .
असो, प्रवचन देण्याचा मानस नाही. आज असेच काहीबाही खरडले आहे. जो तो ज्याला हवे तसे आपापल्या संस्कृती आणि संस्काराप्रमाणे वागायला स्वतंत्र आहे. दिखावे पे मत जाव, अपनी अकल लगाव. प्रत्येक धर्मात धर्माच्या नावावर चाललेला फालतूपणा आहे, धर्मांधता आहे. तेंव्हा हिंदू नसणारांनीही आपल्या धर्माचे मंथन करणे तितकेच जरुरी आहे, पण हा माझा आग्रह नव्हे.
स्पेशल आठवण : मी लहान असताना माझ्या गावात आठवडाभर अखंड हरीनाम साप्ताह चालत असे. गावाचं मुख्य विठ्ठल मंदिर सजलेलं असे. रोज सकाळी काकड आरती असायची. ज्ञानेश्वरी पारायण असे. आणि रोज संध्याकाळी फुकट गावजेवण आणि कीर्तन- भारुड असे. गावातला प्रत्येक जन वर्गणी गोळा करून तो इव्हेंट करत असे. प्रचंड पॉझीटीव्ह एनर्जी असायची, आणि बरंच चांगलं ऐकायला मिळायचं. शाकभाजी पुऱ्या आणि बुंदीचं जेवण दाबून खायचो. टाळ आणि टीका लावून कीर्तनकाराच्या बाजूलाच उभा राहायचो. सगळ्या जाती-धर्माची लोकं त्यात सहभागी असत , तात्पर्य , तिथे जाती-धर्मावरून गटबाजी नसायची! शून्य द्वेष वातावरण. कधी कोणत्या कीर्तनकाराने लव्हजिहाद चा मुद्दा सांगितला नाही , कधी कोणी धर्मपरिवर्तनाबद्दल बोलला नाही. कधी कोणी द्वेष करा म्हणून शिकवले नाही. मला माझ्या धर्माचा राग नाही, मी हिंदू असल्याचा मला कसलाही न्युनगंड नाही. उद्या मी हिंदु राहील की नाही अशी भिती मला कधीच वाटली नाही. हिंदु धर्म खतरेमे है असेही मला कधी वाटले नाही. माझा धर्म आणि माझ्या आस्था या पुर्णपणे वैयक्तिक असुन त्याची परिमाणे मी स्वत: ठरवतो. कोणी मुर्ख नेता किंवा धर्मपंडीत किंवा स्वयंघोषित धर्मरक्षकांना मला माझा धर्म शिकवण्याची गरज नाही.
एका विशिष्ट धर्माच्या कट्टरपंथी धर्मांधांमुळे पुर्ण जगाचा त्या धर्माकडे आणि त्या धर्माच्या लोकांकडे पहाण्याचा एक जबरदस्त नकारात्मक दृष्टिकोण तयार झाला आहे. त्या वाटेने माझा धर्म जाऊ नये..
ता.क.: लेखाचा हेतू आणि हल्लीची राजकीय परिस्थिती यात काही साम्य आढळल्यास आपल्या विवेकबुद्धीस जबाबदार धरावे.

Wednesday, November 5, 2014

नॉस्टॅल्जिया

एक प्रचंड उर्मी मनात दाटुन येते आणि तडक मिळेल ती फ्लाइट पकडावी आणि "घर" गाठावं असं वाटतं. हिवाळा आला की माझं असं होतं.
एसीच्या कृत्रिम थंड हवेत ते पुण्यातल्या हवेतल्या गारव्याचं सुख नाहीच. माणुस आहे त्यात कधीच सुखी नसतो, तो आपल्या भुतकाळातला सुगीचा काळ आठवून खुश होत राहतो. हिवाळा आला की माझं असं होतं.
मस्त पैकी नोवेंबर डिसेंबरातली कडाक्याच्या थंडीतली पहाट असते. बंब पेटवायचा, गरम पाणी तापलं की ऊघड्यावरच अंघोळ करायची. मॉइश्चरायझर्स किंवा स्किन लोशन्स असला काही प्रकार नसतो, एकच प्याराशुटचं तेल डोक्यापासुन पायापर्यंत चोपडायचं असतं. तेही थंडीने थिजलेलं असतं. मजबूत नाश्ता करून थेट गावाबाहेरच्या ग्राऊंडवर क्रिकेट खेळायला पळायचं असतं. कसलीच टेन्शन नसतात की डेडलाईन्स. थंडीत कोणालाच विकेटकिपर थांबायचं नसतं. ऊन चढलं तरी हवेत प्रचंड सुखद गारवा असतो. स्वेटर आणि माकडटोपी घालुनही छान थंडी वाजत असते. शेतात शाडु सुर्यफुल वगेैरे डौलाने डोलत असतो. बॉल शेतात गेला की पळत जायचं. सकाळीच पिकाला पाणी दिलेलं असतं, त्या मातीत पाय रुततात. गारगार चिखलात चप्पल आडकली की परत पाटाच्या पाण्यात पाय धुवायचे.. तिथेच पाणी प्यायचं ..परत क्रिकेट. मधेच कॉन्ग्रेस उपटून ती पिवळी फुलपाखरं पकडायला त्यांच्यामागं धावावं. हिवाळा आला की माझं असं होतं.
कुडकुडत्या पहाटे लवकर उठायचं. डबल ज्याकेट ग्लोवज घालुन रेडी व्हायचं. मित्रांच्याही काही कमिटमेंट नसतात.सगळे पडीक हवे तेंव्हा हवे तिथे जायला तयार असत. तोंडातुन वाफा निघतात. त्यात बळेच स्मोक केल्याचं फिलींग घायचं. सगळ्यांनी एकसाथ बाईकला किका मारून कोकण महाबळेश्वर किंवा भिमाशंकरला कुच करायचं. वाटेत भेळ वडापाव आणि च्या सनकून हाणायचा. फुल कल्ला करायचा.. थंडीत याची मजाच न्यारी. हिवाळा आला की माझं असं होतं.
सकाळीच गर्लफ्रेंडला फोन करायचा. लोणावळ्यात भेटायचं. कुठेतरी चोपुन नाश्ता करून सरळ अँबी व्यालीच्या दिशेने सुटायचं. गारवा आणि ऊब एकसाथ अनुभवायची. हिवाळ्यातला लोणावळा पावसाळ्यातल्या पेक्षा बेष्ट. एकांत.. षांतता.. गारवा.. आणि प्रचंड अतुरता. हिवाळा आला की माझं असं होतं.
साला हिवाळ्यात पुणे ही जगातली बेष्टेष्ट जागा आहे. वाटतं मिळेल ती फ्लाइट पकडावी आणि "घर" गाठावं.

Tuesday, September 16, 2014

पैसा झाला छोटा


आमच्या मातोश्री म्हणजे कडक ! बाहेरचे खाणे , फुकटचे लाड , बाहेर गेल्यावर वचवच करणे , नातेवाईकांकडे गेल्यावर कोणाच्याही वस्तूला हात लावणे किंवा वस्तू घेणे इत्यादी गोष्टींची आम्हाला जबरदस्त जरब होती. आईने डोळे मोठे केले की आम्ही दबकून गप्प बसत असू. कधी मधी पाहुणे घरी आले आणि त्यांनी रुपया जरी हातावर ठेवला तरी आम्ही तो आज्ञाधारकपणे आईच्या हाती देत असू. पन्नास वेळा विनवण्या केल्यावर कधी चाराणे मिळत. त्यातून मग पेरू खावा की बर्फाचा गोळा खावा की पेप्सीकोला घ्यावा की गुलाबजाम ( त्यावेळी सुक्के गुलाबजाम गोळ्याबिस्किटांच्या दुकानात मिळत ,नेहमीच्या गुलाबजामशी त्याचा संबंध नाही ) यात माझे कन्फ्युजन होत असे. आईने पॉन्डस च्या मोठ्या डब्याला एक आडवा छेद देऊन त्याचा गल्ला बनवला होता. त्यात आई तिच्या शिवणकामातले पैसे काढून थोडेफार त्यात टाकत असे. मी काहीतरी आयडिया करून त्यातल्या कॉइन्स काढण्याची शक्कल काढली होती. एकदा हे भांडे फुटल्यावर चंपी झाली आणि नंतर आईने प्रोपर गल्ला आणला.

थोडासा मोठा झाल्यावर म्हणजे हायस्कूलला गेल्यावर कधी मधी आई हातावर पाच दहा रुपये टेकवत असे. वडील तसे दिलदार , त्यांना पैसे मागितले की "घे खिशातून" म्हणत . "घे खिशातून" हा त्यांचा पेटंट डायलॉग. पैशाचं कधी काय केलं काय नाही असले प्रश्न त्यांनी कधी विचारले नाहीत. आम्ही मात्र आईच्या धाकाने पैसे मागायला कचरत असू. कधी एकठ्ठे सहा रुपये मिळत तर कधी एक दोन रुपये जमवून मी सहाचा आकडा जमवत असे. सहा रुपयांचा हिशेब १ सुक्की भेळ किंवा २ वडापाव किंवा २ सामोसे किंवा पाणीपुरी असा हिशेब होता. त्यातही त्या पैशाचे काय खाऊ काय नको असे होत असे.

कॉलेजात गेल्यावर डेली वीस रुपये पॉकेटमनी मिळू लागला. याचाही हिषेब पक्का होता. १० रुपये बसचे रिटर्न आणि ६ रुपये रेल्वेचे रिटर्न तिकीट. ४ रुपये खाऊसाठी. त्यात मी बऱ्याचदा रेल्वेचं तिकीट काढत नसे. एक दोनदा टीसीने पकडलेही होते, पण तोवर मी इतका मोठा झालो होतो की एकट्या टीसीला पकडणे शक्य झाले नाही. एके दिवशी दोन टीसीनी पकडले तेंव्हा तब्बल ८५ रुपये द्यावे लागले होते. सुदैवाने खिशात एक शंभराची नोट आडीनडीला वडिलांनी देऊन ठेवली होती. असो, तर कॉलेजातही आम्हाला काही पैशाची फार चंगळ भेटली असे नाही.फायनल इयर ला येई पर्यंत विसाचे पन्नास झाले होते. इयत्ता पहिली ते इंजिनियरिंगचे फायनल इयर हा प्रवास माझ्या पैशाने चाराण्यापासून सुरु केला तो पन्नास पर्यंत.

आता पर्यंत प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीसाठी मी आई वडिलांकडे पैसे मागायचो. ट्रीपला जायचंय, बाईक हवी , पेट्रोल भरायचंय , कपडे हवेत , जीन्सच घ्यायची , सायकल हवी , पार्टीला जायचंय, मित्राकडे फिरायला चाललोय , लग्नाला चाललोय, इथपासून सायबर कॅफेमध्ये जायचंय , मोबाईल घ्यायचाय , रिचार्ज करायचंय ... इंटरव्यूला चाललोय , सीवी च्या प्रिंट काढायच्यात , भाड्याला पैसे ... सगळीकडे मी डीमांडिंग होतो. त्यांनी कधी सढळ हाताने पैसे दिले नाहीत , पण कधी मनही मारू दिलं नाही. हवं ते कधी ना कधी मिळायचंच. आतापर्यंत मी केवळ परावलंबी होतो. तेंव्हा स्वत: पैसा कमवला तर किती मजा येईल , कोणालाही मागावे लागणार नाहीत , खिशात नुसती खुळखुळ. पाकीट फुगलेलं तेंव्हा असे , पण त्यात नोटा दोनेक आणि बाकीची फालतू रद्दी जास्त असे. त्यात आता नुसत्या नोटा येतील , मग मी आई वडिलांना पैसे देत जाईल . ते माझ्याकडे पैसे मागतील.. नक्की आठवत नाही , पण याच काहीतरी प्रकारचा विचार मी तेंव्हा करत असायचो .
नोकरी लागल्यावर मला कंपनीतच ICICI च्या एजंटने अकाउंट ओपन करून दिलं , कार्ड देऊन गेला. ते भारी वाटलं. ICICI च्या ATM मधून तेंव्हा नेहमी १००च्या करकरीत नोटा निघायच्या. मी कायम पाकीट भरलेलं ठेवायचो. खाण्या-पिण्यात आपण कधीही हातचा राखला नाही स्वत:चे सगळे लाड पुरvवले . असो .

आज आईचं फोन बिल भरताना अचानक आठवण आली. किती दिवस झाले पैशाचा ओघ उलटा सुरु झाला . चारणे आठाणे तर आता चलनातही नाहीत... पण आईला कुठे जायचं असलं की , कपडे घ्यायचे , दागिना हवा ... म्हणेल ते .. आपसूक पैसा जातो. अगदी नकळत. त्या पैशाची फिगर आता हजार पटींनी वाढली . पण तेंव्हाचाच पैसा मोठा होता .
पैसा छोटाच झाला .

Sunday, September 14, 2014

गुंठामंत्र्यांची ग्रोथ


फार्फार वर्षांपुर्वी..(म्हंजे २००० च्या पुर्वी) पुण्यात गुंठ्याला जास्त भाव नव्हता.. आणि जास्त भारीभारी गाड्याही आपल्या मार्केट मधे नव्हत्या. तेंव्हा गुंठामंत्री जीबडं (कमांडर वगैरै) घेत.
मधल्या काळात गुंठ्याला भाव येऊ लागला. महींद्रा अपग्रेड झाला. आणि गुंठामंत्री 'कॉर्पियो' ऊडवू लागले.
पवार सायबांच्या धोरणाने गुंठामंत्र्यांना अजुन भाव आला.. मग आली फॉर्चुनर.
आणि गेल्या २-३ वर्षांतला धिंगाणा तर विचारूच नका. गुंठ्याचे भाव गगणाला आणि पायलीच्या ५० पॉश गाड्या दिमतीला.
आता गुंठामंत्री आवडी (ऑडी) ए४, क्युशेवन, बीयमडब्लु, जाग्वार... रेंज रोवर उडवायला लागले.
या गतीने आगामी ५ वर्षांत पुण्यात फेरारी, मक्लरेन, लँबोर्गीनी बुगाटी, क्याडील्याक वगैरे गाड्या पुण्याच्या रोडवर दिसल्यास आश्चर्य वाटू नये.
पांढरी शुभ्र लँबो किंवा फेरारी हिंजवडीच्या 'शिग्नल'ला ऊभी आहे. आत मिररला ते राष्ट्रवादीचं मानचिन्ह लटकत आहे, गाडीच्या विंडशील्ड वर "आबांची कृपा" "..."फक्त भाईच्" वगैरेचा रेडीयम आर्ट केला आहे, मागच्या काचेवर शिवशेना किंवा कमळ किंवा पंजा किंवा घड्याळाचा वॉटरमार्क काढला आहे. आतमधे १० रेड्यांची गुर्मी असलेलं काळा रेब्यान विथ गोल्डन फ्रेम घातलेलं व्यक्तिमत्व बसलेलं आहे .. काच खाली करून भाई लिटरभर पान खाऊन पिंक टाकत आहे ... आहाहा विंहंगंमंगं दृश्य
मग आपण हळूच म्हणायचं .. "जिमीन विकली बापाची ... गाडी घेतली फेरारीची ",  "बघतोस काय रागानी ... गाडी घेतलीय ल्याम्बोर्गिनी "

Sunday, September 7, 2014

Untitled

स्टेटसला नक्की काय टायटल देऊ सुचत नाही !

फार्फार वर्षांपूर्वी कॉलेजात असताना इ-स्क्वेयर (गणेश खिंड)  लै भारी वाटायचं. मुव्ही पहायची म्हटलं की ई-स्क्वेयर ठरलेला असायचा. नेहमीच पैशाचा जुगाड होणे अवघड , त्यामुळे सकाळी ८ चा शो फारच स्वस्तात पडतो म्हणून अर्धी झोप टाकून पिक्चर पाहायला अस्मादिक सकाळी ७लाच  निघत. तेंव्हा मल्टीप्लेक्सचं अप्रूप फार. सिंगल स्क्रीन थेटरातल्या अत्यंत हलक्या क्वालिटीच्या तिकीटासमोर ते प्रिंट केलेलं तिकीटही भाव खाऊन जायचं. नुसत्या सिनेम्यासोबत खायची प्यायची सोय , थोडासा शॉपिंगचा ऑप्शन आणि फुकटात एसी खात पुस्तके चाळायची सोय क्रॉसवर्डात व्हायची.  म्हणून इस्क्वेयर नेहमीच फेवरिट. हिरवळ वगैरे बोनस. त्यावेळी  कॅम्पातले आयनॉक्स म्हणजे माज वाटे. :) तिथे मी अग्नीवर्षा सोडला तर आयुष्यात दुसरा पिक्चर पाहिला नाही. नंतर नंतर सिंगलस्क्रीन थेटर  फारच बोगस वाटू लागली. ते थेटरात पिक्चर पाहणे डाऊनमार्केट वाटे.  अलका, अलंकार , राहुल , डेक्कन , वेस्टएंड , लक्ष्मीनारायण , विशाल वगैरे सिंगलस्क्रीन मल्टीप्लेक्सच्या झपाट्यात पारच कोमेजली.  मराठी सिनेमाला चोइस नसल्याने तो आपला प्रभातात दिसायचा. जायचो तिथेही. त्यात काही काळाच्या ओघात मल्टीप्लेक्स झाली ती तरली. बाल्कनी आणि स्टोल असायचा. बाल्कनीचं तिकीट काढलं की भारी वाटे. आता रो-वाईज तिकिटं घ्यायची :) लग्नापूर्वी कोपऱ्यातली जागा शोधत असू. आता काय सेंटर हवे ,व्यवस्थित चित्रपट दिसायला हवा.
काळाच्या ओघात मॉल वाढले, मॉल सोबतच स्क्रीन्स आल्या. चिक्कार ऑप्शन. आता इ-स्क्वेयर अगदीच सामान्य वाटते. पण तरीही , इ-स्क्वेयरच्या बऱ्याच आठवणी आहेत. नोकरीला लागल्यावर लेटनाईट मुव्ही पाहून बाईकवर कुडकुडत रात्री स्टेशनला बेकरीतला प्याटीस खाणे , किंवा मग ऑप्शनच नाही म्हणून कमसम ला कोंबडी तुडवणे...  कधीही कुठेही खाण्यापिण्याची आणि घुमणेफिरणे , मनाला येईल तेंव्हा ब्याकटूब्याक ३-३ सिनेमे पाहणे ... यातच अच्छे दिन होते.

भांचोत लाईफस्टाईल सुखवस्तू झाली पण ते शेंशेषण हरवलंय !  फार लांबची गोष्ट नाही हो.. आत्ताआत्ता साताठ दहा वर्षापूर्वीपर्यंत होतं .. सगळं इथेच तर होतं !

Sunday, August 31, 2014

बॉलीवूड फंडा : ( इंडायरेक्ट रेफरन्स वाली गाणी )



बॉलीवूड चित्रपटांत बरेच फंडे फारच ठरलेले असतात.पूर्वीच्या काळी व्हिलन हिरोच्या लहानपणी त्याच्या मात्या-पित्याचा खून करणार मग हिरो मोठा होऊन त्याचा बदला घेणार. त्यातही कहाणी में ट्वीस्ट म्हणून हिरोईन कधी विलन च्या बाजूने होणार तर तिला अचानक काहीतरी गुपित माहिती होणार ज्यात व्हिलनच तिचा खरा व्हिलन आहे हे कळणार , मग ती हिरोला मदत करणार. त्यातही हे परत व्हिलन ला कळणार मग तो हिरोईनच्या आईला किडन्याप करून एका खांबाला बांधून ठेवणार.  ८०-९० चे दशक हे बॉलीवूड मध्ये "बदला दशक" म्हणायला हरकत नाही. यात गुंडा सारखा अप्रतिम बदलापट आपण पाहिला. चित्रपटात जर "पाप रणजीत" सारखे महानुभाव असतील तर हिरोच्या बहिणीवर एखादा अतिप्रसंग फिक्स. किंवा मग एक फ्यामिली मेलोड्रामा. बिंदू, कादर खान , बाबूजी अलोक नाथ , अजित वाच्छानी , रीमा लागू , मोहनीश बैल , अर्चना पुरणमासी , अनुपमखेर वगैरे मंडळींनी त्याकाळी हे रोल करून खूप छपाई केली. पण अलीकडे हे फंडे आउटडेटेड झाले. कालानुरूप त्यात बरेच बदल होत गेले.  पण एक फंडा अजूनही चालूच आहे आणि तो अनंतापर्यंत चालूच राहील...

गाणी बॉलीवूडचा आत्मा. ज्या चित्रपटांत प्रेमाचा त्रिकोण असतो , त्या चित्रपटांत एखाद दुसरं गानं इंडायरेक्ट रेफरन्स वालं असतंच असतं. यात १ हिरो २ हिर्विन्स किंवा २ हिरो एक हिर्विंस  किंवा २ हिरो २ हिर्विन्स इन क्रॉसलिंक  या प्रकारात बऱ्याचदा  हिरो हिर्वीनचे जुणे किंवा छुपे संबंध असतात, पण काही ट्रेजीडी मुळे कनेक्शन व्यवस्थित बसलेलं नसतं. वायरमनच्या भाषेत  अर्थिगला पाझीटिव्ह वायर लावल्यासारखं काहीतरी. तर हे सांगायचे कसे ? त्यांची कुचंबना सांगायची कशी ? मग त्यासाठी गाणी अल्टीमेट प्ल्याटफॉर्म असतो.  कृष्णधवल जमान्यापासून चालत आलेला हा फंडा अलीकडेच आलेल्या स्टुडेंट ऑफ द इयर सारख्या चित्रपटातही पाहायला मिळतो.  अगदीच निवडक काजू वेचायचे म्हटले तर काही गाणी चटकन समोर येतात ..
दिल के झरोके
क्या हुवा तेरा वादा .. वो कसम वो इरादा  ( हम किसी से कम नही )
तू प्यार  है किसी और का तुझे चाहता कोई और है ( दिल है के मानता नही )
मेहँदी लगा के रखना डोली सजा के रखना ( DDLJ )
सांवलीसी एक लड़की ... ( मुझसे दोस्ती करोगे )
..
चिक्कार गाणी आहेत. सांगायचा मुद्दा असा , या गाण्यांच्या वेळी सगळी सच्चाई  ओरीगिनल हिरो , हिर्वीन आणि प्रेक्षक यांनाच माहित असते , तो कबाबमें हड्डी या प्रकरणापासून अंजान असतो. आणि एवढी स्पष्ट रेफरन्स देऊन केलेली गाणी , हातवारे , या दोघांचे एक्स्प्रेशन इत्यादी पाहून त्यात आता लपवण्यासारखे काही नाही असे होते. हा सूर्य हा जयंद्रथ इतकी परिस्थिती झाल्यावर प्रेक्षकांचा मानसिक चोळामोळा होतो . आता हे भांडे फुटल्यावर पुढे काय होणार म्हणून बऱ्याच प्रेक्षकांच्या ब्ल्याडर वर ताण येतो... थोडेसे  बेचैन होते , पण या सगळ्यात ते "कबाब में हड्डी" क्यारेक्टरला याचा थांग पत्ताही लागत नाही ..  किडन्यापिंग , रेप , खून , बदला , अदलाबदली वाले फंडे कालबाह्य झाले .. पण  गाण्यांचा हा फंडा अनंतापर्यंत चालणार ..

खास हे फंडू गाणे :

http://www.youtube.com/watch?v=7GS5QXBHsfU

Saturday, August 23, 2014

भारतातली "चायनिस" खाद्यसंस्कृती

 मला आठवतं त्यानुसार जवळपास २१व्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतात 'चायनीस' खाद्यसंस्कृतीचा उदय झाला. या "चायनिस" खाद्यपदार्थांचा खरोखर चायना मध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांशी काडीचाही संबंध नाही हे आधीच नमूद करावे लागेल. असला तर तो फक्त "राईस" आणि "नुडल्स" चा .एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला चायनीसच्या टपऱ्या लागायला सुरुवात झाली. एकीकडे म्याकडोनाल्ड डॉमिनोज पिझ्झा हट सारखे अमेरिकन युरोपियन मल्टीन्याशनल ब्रांडस् उच्चभ्रू संस्कृतीत पॉप्युलर होत असताना "चायनिस" ब्रांड मध्यमवर्ग आणि खालच्या वर्गात रुजत होता.
चायनिस ची गाडी टाकण्यासाठी काय लागते ?
१. एक टिपिकल डार्क लाल रंगाची ६x4 फुटाची टपरी.
२. त्यावर एक ड्रागन पेंट केलेला .(या ड्रागनचे वैशिष्ठ्य असे की एकवेळ दोन फिंगरप्रिंट्स म्याच होतील पण एका टपरीवरचा ड्रागन दुसऱ्या टपरीवरच्या ड्रागन शी कधीही म्याच होत नाही ) काही टपर्यांवर तर मगरी ,पाली सुसरी, डायनासोर, गॉडजीला , एनाकोंडा ही काढलेले मी पहिल्या आहेत.
३. एक चीनी दिसणारा नेपाळी/ मणिपुरी /ओरिसी/हिमाचलपरदेशी किंवा कुठलाही पूर्वेकडील कुक. असा कुक नसेल तर ते चायनिस चालत नाही असा अनुभव आहे.
४. नाव : हॉंगकॉंग , शांगाय , बीजिंग/बेजिंग , ब्ल्याक ड्रागन , सोल्टी. घुमुन फिरून १० प्रकारची नावच मी पहिली आहेत. आमच्या इथे एक चम्पा चायनिस पण होतं. पण ती फारच एक्सेप्शनल केस होती. नाव जर चायनीज नसेल तर चायनिस चा फील येत नाही .
५. २ मोठ्या कढया , एक लांब दांडा असलेली मेगा पळी भला मोठा ग्यास बर्नर एवढ्या सामुग्रीत कोणताही चायनिस पदार्थ बनतो
६. नीलकमल प्लास्टिक फर्निचर. या नीलकमलवाल्याचा बिजनेस वाढला तो चायनिस टपरीमुलेच .
६. ल्यामिनेट केलेलं मेनुकार्ड. हे जास्तीत जास्त १ पानाचे असते. मराठी आणि इंग्रजी ऑप्शन दिल्यास ते २ पानी होते. त्यातल्या मराठी आणि इंग्रजी स्पेलिंग घटकाभर मनोरंजन व्हावे म्हणून मुद्दाम तशा छापलेल्या असतात
हा सगळा हार्डवेयर सेटअप झाला की चायनिसची हातगाडी धंद्याला तयार असते. दुपारचे चार वाजले की कुठल्याही रोडसाईडला गाडी लावून द्यायची. चायनिसवर जे ट्रेनी किंवा नवीन रुजू होतात त्यांना कोबी कापायचे काम दिले जाते. धंद्याला सुरुवात होण्यापूर्वी ट्रेनी पोरगं पोतंभर कोबी कापून रेडी करतं. सिनियर चायनिस कुक दुसरीकडे चिकनचे पीस साफ करणे, लॉलीपॉपच्या कांड्या तयार करणे , नुडल्स आणि चिकन लाल रंगाच्या मसाल्यात डीपफ्राय करणे वगैरे कामं करत असतो. आणिक एक पोऱ्या प्लास्टिकचे टेबल आणि खुर्च्या लावत असतो. प्रत्येक टेबल वर तीन वाट्या असतात. यात टोमेटो-चिली -सोया सॉस असतो. डेली रुटीन सेम असते. पब्लिक यायला सुरुवात झाली की चायनिस कुक ग्यासचा जाळ मोठा करून त्यावर ती कढई ठेवतो. त्यात पाणी मारून एका छोट्या खराट्याने ती साफ करून कढई उलटी करतो. मग ऑर्डर असेल त्या प्रमाणे त्याच कढाई मध्ये पदार्थ बनवले जातात. एका हाताने ती कढाई आणि एका हाताने तो लांब दांड्याची मेगापळी यांना एकमेकांवर आपटत अल्मोस्ट सगळे पदार्थ तयार होतात.
आपल्याकडे चायनिस फार थोड्या काळात फार लवकर पॉप्युलर झालं. स्वस्त आणि कमी भांडवलात चालू कमाईचा बिजनेस म्हणून चायनिस टपरीचा उदय झाला. गावातल्या छोट्यामोठ्या भाई लोकांनी या उद्योगात भलताच इंटरेस्ट घेतल्याने गल्ली बोळात चायनिस खाद्यसंस्कृती पसरली. बेवड्या लोकांना विदाउट सर्विसचार्ज दारू पिण्याची सोय या निमित्ताने झाली. पोलीस लोक हप्तावसुलीच्या निमित्ताने येतात तेंव्हा जेवणाचीही फुकट ऑर्डर देतात त्यांच्यासाठी खास उरलेल्या खरकट्या अन्नातून एक "पोलीस राईस" बनवला जातो. जे बेवडे पिऊन टाईट असतात त्यांना चिकनच्या नावावर डाळीचे लॉलीपॉप खाऊ घातले जातात. हायजीन वगैरे गोष्टीची चिंता करू नये. चिकन लॉलीपॉप, चिकन फ्राईड राईस , ट्रिपल राईस , लंग फंग सुप, मंचाव सूप , इत्यादी ऑर्डर द्यावी. मनसोक्त हाणावे.
मोठ्या हॉटेलांत पण चायनीज पदार्थ मिळतात. मेनल्यांड चायना सारखी ऑथेंटिक चायनीज रेस्तरा आपल्या कडे आहेत. पण मी जेंव्हा हॉंगकॉंग मध्ये गेलो आणि तिथले ओरिजिनल चायनीज पदार्थ पाहिले तेंव्हा मी चाट पडलो. आपल्या इथल्या चायनीस चा आणि ओरिजिनल चायनीजचा काहीही संबंध नाही . इव्हन लंगफंग सूप , मंचाव सूप , शेजवान राईस /नुडल्स असले कुठलेही पदार्थ मला तिकडे सापडले नाहीत . लॉलीपॉप नावाचा पदार्थ तिकडे अस्तित्वातच नाही. हॉंगकॉंगमध्ये त्याला चिकन विंग्स किंवा ड्रमस्टिक्स म्हणतात आणि ते बनवायची स्टाईल ही लॉलीपॉपच्या जवळपासही नाही.नाही म्हणायला सोया , विनेगर , चिली सॉस वगैरे वापरतात. नुडल्स आणि राईसही पूर्ण वेगळे असतात. आपल्याला ते चायनीज आवडणारही नाही.. त्याच हेतूने इंडियामेड फेक चायनीजची (ज्याला वर "चायनिस" म्हटले आहे.) निर्मिती झाली असावी .
कॉलेजात असताना चायनिसचा चस्का लागला होता. अल्मोस्ट रोज चिकन तोडायला मी चायनिसच्या टपरीवर पळायचो. बरेच दिवस लिहिणे मनात होते. हा नोस्तेल्जीया आहे.आता चायनिस तितकेसे रुचत नाही. टपरीवर खायला संकोच वाटतो. चायनिस चा बिजनेस आता आपल्याकडे सेट आहे .

लई भारी - एक लई भंगार अनुभव

लई भारी - एक लई भंगार अनुभव
एके दिवशी काय जाहाले ..
एके दिवशी काय जाहले ..
मी बसलो होतो टोरंट शोधात आणि लई भारी चा टोरंट सापडला
आणि माझ्याच हाताने माझ्या पायावर धोंडा पडला
असो, तर चित्रपटाचं संगीत महाराष्ट्राच्या ढोल-ताशाने (अजय अतुल) दिलेलं असल्यामुळे सुरुवातीपासून धात्ताड-तत्त्ताड वाजायला सुरुवात होते आणि पुढच्या दोन तास आता फक्त नाशिक ढोल ऐकायचा आहे अशी पाल चुकचुकते. फेटा घातलेले एक लोकल बडी असामी म्हणजे प्रतापसिंह निंबाळकर , आणि त्यांच्या सौ सुमित्रादेवी आपल्या कुलदैवताच्या मंदिराच्या रिनोवेशनसाठी एखादा नेता आपल्या समर्थकांना अभिवादन करावे तसे येत असतात. तोच , एक शमनछाप भटजी मध्ये शिंकतो, आणि या निपुत्रिक बाई ला मंदिरात प्रवेश नको म्हणून ढूस्की सोडतो. यावरून कळते की यांना मुल नाही. तोच त्याला कोणी "२ रुपयाचा भटजी" म्हणून जागा दाखवतो पण प्रतापसिंह हा निर्णय "रिवाज" म्हणून मान्य करतो. (आता मंदिराचा जीर्णोद्धार होण्या आधी हा रिवाज होता का ? या आधी मंदिरात वांझ बाई चालत नाही म्हणून माहित होतं तर एवढं शॉक होण्याचं कारण काय ? वगैरे मनाला पडू नयेत) ब्याक ग्राउंड ला अजय अतुल वाजत राहतो. हा प्रसंग झाल्यामुळे मासाहेब दुखी होतात , घरकाम करणाऱ्या बाई त्यांना वारी ला जाण्याचे सुचवतात. पण थोड्यावेळापूर्वी कसलीतरी फालतू रीत मानणारे प्रतापसिंह रागावतील म्हणून बाई मी कशी येऊ म्हणून प्रश्न उपस्थित करतात. त्यावर मोलकरीण मासाहेबांना "वाक" ला येण्याचे निमित्त करायला सांगतात. मा साहेब वारीत घुसतात. अजय अतुल वाजत असतो. थोड्यावेळाने पंढरपूरच्या पोचून विठोबा मंदिरात मासाहेब बच्चनस्टाईलमध्ये विठोबाला दोष देतात, दोष देऊन शांत झाल्या की पदरात मुल घालण्याची याचना करतात , त्या एवढ्या हतबल झालेल्या असतात की म्हणतात "मला फक्त एकदाच आई कर आणि पाहिलं मुल मी तुला अर्पण करीन". म्हणजे त्यांना पुत्र तसा नकोच असतो , फक्त तो वांझ वाला कलंक नको असतो. वारीवरून घरी आल्यावर मासाहेबांना तत्काळ कोरड्या उलट्या सुरु होतात. त्यावरून त्यांना कळते की आपल्याला मुल होणार आहे. प्रतापसिंह जाम खुश होतात. मोलकरीण मासाहेबांना आपल्या नवसाची आठवण करून देतात. मासाहेब हे प्रतापसिंहाला सांगतात. प्रतापसिंह संतापतात पण त्यांचा संताप सात्विक असतो. ते समजावतात की मुल नवसामुळे नाही तर डॉक्टरने ( की ज्योतिषी? ) संगीलेलं असतं की "तुम्हाला मुल लेट होणार" त्यामुळे झालेलं आहे. ते त्यांचा सगळा बिजनेस आणि गाव सोडून लंडनला निघून जातात. ( येथे उल्लेख करावा लागेल तो प्रतापसिंहाच्या घराचा. घर एकविसाव्या शतकातल्या लेटेस्ट डिजाईनचं असतं , पण त्यांची कार जुना काळ दाखवायचा म्हणून देवानंदच्या पिक्चर मधली असते )
मासाहेबांना जुळी मुलं होणार आहे हे त्यांना आणि त्यांच्या डॉक्टरांना डीलेवरी होईपर्यंत कळत नाही. मुल झाल्यावर दुसऱ्याच एकामुलाची रवानगी पंढरपूरला होते. डॉक्टर कडून गोपनीयतेची शपथ घेऊन ही बातमी लपवली जाते. एक मुलगा ( प्रिन्स ) आपणच ठेवून घेतात आणि आपल्याला पुत्र झाला आहे हे मासाहेब लंडनला फोन करून कळवतात, प्रतापसिंह लगेच झालं गेलं विसरून परत येतात. अजय अतुल वाजत राहतो. मुल मोठं होतं. मधल्या काळात प्रतापसिंहाचा भाऊ आणि त्याचा मुलगा संग्राम साउथ स्टाईल आतंक माजवत असतात. मनाला येईल तेंव्हा हवे त्याला आडवे करत असतात आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत असतात. प्रतापसिंह वैतागून यांना धडा शिकवायचा ठरवतो तेंव्हा काका-पुतण्या त्याला कायमचे आडवे करतात. परदेशातून शिकून आलेला प्रिन्स अगदीच झाम्या असतो. नाकावरची माशी उठत नसते. तो एका आयटमच्या प्रेमात पडतो. ती आयटम संग्रामने प्लेस केलेला सापळा असतो. प्रिन्सकडून ती सगळ्या जायदादच्या कागदावर सह्या घेते आणि मग संग्राम एका ट्रक ने प्रिन्स चा खेळ खल्लास करतो
आता मा साहेब एकट्याच असतात. संग्राम त्यांना बेइज्जत करून हाकलतो तेंव्हा त्या फारच डाऊन होतात. पंढरपूरला जातात. तिथे "तंटा नाय तर घंटा नाय" म्हणत घंट्यासाठी फायटिंग करणारा माउली उर्फ 'विठ्ठलाला अर्पण केलेला पुत्र' भेटतो.विठ्ठलाच्या पायाखाली वीट असते म्हणून माउलीने वीटभट्टी टाकलेली असते. दिवसा वीटभट्टी आणि रात्री हातभट्टी असा त्याचा रुटीन असतो . त्याला थोडे हेड्सअप देऊन या सुमित्रादेवी म्हणजे मासाहेब आहेत असे कळते. तो जाम शिव्या-शाप देऊन मदत करण्यास नकार देतो. पण मावलीची डाव त्याला विठ्ठल का वास्ता देके मदत करायला पाठवते . माउली लगेच इकडे येऊन संग्राम बरोबर ढिशुम ढिशुम करतो. अजय अतुल वाजतच असतो. एकदिवस हातभट्टी घेऊन घरी येताना माउलीला भाऊ ( म्हणजे भाई ( म्हणजे सल्लू) ) भेटतो . भाऊ पण हातभट्टी लावून टाईट असतो. या टाईट सिच्युएशन मध्ये दोघेही आपल्या एवन संवादफेकी ने डोक्यात वीट मारून घ्यायला भाग पाडतात. पुलं म्हणतात त्या प्रमाणे एखाद्या गोष्टीचा वीट येणे म्हणजे काय ते कळते. थोड्या वेळाने निंबाळकर घराण्याचे मीठ कललेला नोकर माउलीला पूर्ण केटी देतो. संग्रामच्या बारला आग लावणे , लोकांच्या जमिनीचे कागदपत्र अगदी पाकीट मारावे या शिताफीने माउली आपली कामं करत असतो. संग्रामने सुरुवातीला हाकलले तेंव्हा थुंकही चाटायची तयारी दाखवणाऱ्या मासाहेब माउलीच्या जीवावर "हे निंबाळकरांचे रक्त आहे ... शत्रूच्या रक्ताने टिळा लावतो पण तुझे रक्त लावून मी कपाळ खराब करणार नाही " म्हणत पंचतारांकित संवाद फेकतात. मागे अजय अतुल कंटिन्यू वाजतच असतो. मग क्लायम्याक्स मध्ये संग्राम-माउली तुंबळ युद्ध होते. संग्राम आणि त्याचा बा मरतो. मग माउलीला त्याच्या आई विषयी प्रेम वगैरे येते. मला लहानपणी चित्रपटात गाणी ही कोणाचे ब्ल्याडर फुल झाले असेल तर ब्रेक म्हणून असतात असे वाटे. लय भारी पाहताना याचा प्रत्यय येतो. थोडक्यात कोणत्यातरी टिपिकल साउथच्या सिनेमाची स्टोरी उचलेली आहे.
परीक्षण बरंच लेट आलंय , त्यामुळे थेटरात जाऊन कोणी पाहणार नाही , पण कुठे डाउनलोड करून किंवा फुकट टीव्हीवर पाहताना वेळ जाऊ नये म्हणून प्रपंच .

Sunday, August 3, 2014

दवणीय :नातं त्याचं आणि तिचं



वयाच्या पाचव्या वर्षापासून तिला पोलियो झालेला. वडील कर्मठ आणि सनातनी होते . त्यांचा आदेश होता , कोणीही कसल्याही एलियोपथीची औषधं घ्यायची नाहीत. त्यांच्या या हट्टापायी तिचे आधीची तीन भावंड गमावली होती , परंतु "देवाची इच्छा" , "गेल्या जन्मीचे भोग" अशी वडिलांची ठाम समजूत. वडिलांच्या शब्दापुढे घरात कोणाचं काही चालायचं नाही. हिचा पोलियो दिवसेंदिवस वाढत गेला. नियतीचे दुर्दैव असे की ती १८वर्षाची होई पर्यंत वडील वारले.  जास्त काही मागे ठेवलं नव्हतं. थोडंसं सोनं , राहतं घर आणि कोकणात थोडीफार शेती , त्यातूनही काही उत्पन्न होत नसे. कोणालातरी कसायला दिली तो वर्षाला २०हजार टेकवी.

आईने खानावळ सुरु केली. इन मीन ५ मुलं जेवायला येत. त्याची तिची भेट घडली जेंव्हा तो खानावळीत आला आणि तिने त्याला वांग्याची भाजी वाढली. तो खानदेशातला ,  पुण्यात कॉलेजात शिकायला आलेला. रात्री कुठेतरी कामावर जाऊन पैसे कमवायचा. घरचं खानं हवं म्हणून खानावळ लावली.  वांग्याची भाजीच्या वासाने तो टर्न अप झाला.  "अजून वाढता का ? " त्याने ताटात बघतच तिला अजून भाजी वाढण्याची विनंती केली . ती लंगडतच वळली , भाजी वाढली आत गेली.  "अजून भाजी मिळेल काय ? " तो पुंन्हा खाली बघूनच बोलला. तिने जवळपास ५-६ वेळा त्याला काहीही तक्रार न करता भाजी वाढली . तिचे लंगडने तो बघत होता.

वेळ गेला तसा दोघांचा संवाद वाढला. लोकं येत जात राहिली , हा मात्र खानावळीशी प्रामाणिक राहिला. नाही म्हणायला त्याची तिची नजरानजर होत असे. तशी ती दिसायला सुंदर होती , गोरीपान काया , लांब नाक , काळेभोर केस , वक्राकार शरीरयष्टी... तिच्या पायाचा प्रोब्लेम नसता तर कोणत्याही युवराजने तिला मागणी घातली असती.जेवणात वांग्याची भाजी असली त्याचा चेहरा फुललेला असे. आणि त्याचा तो फुललेला चेहरा पाहायला तीही आतुर असे. बऱ्याचदा त्याच्यासाठी ती पेशल वांग्याची भाजी बनवे

एक दिवस तो तिच्या आईला बोललाच ! तिच्या आईला मुलीच्या भावना समजत नव्हत्या असं नाही. पण या संसाराचं पुढे कसे होणार ? ही अशी.. ट्रेक्टरची दोन चाकं जर एकाच त्रिज्येची नसतील तर तो चालेल कसा ? पण त्याने तिच्या आईला कन्विन्स केलं.  त्याचे आई-वडील नव्हते त्यामुळे बाकीचा काही प्रॉब्लेम नव्हता.
यथावकाश लग्न झालं. सुरुवातीचे काही दिवस फार मजेत गेले. तो तिला फिरायला नेई. बऱ्याचदा उचलून घेई. त्याचे शिक्षण वगैरे पूर्ण होऊन त्याला नोकरीही मोठ्या पगाराची लागली होती. ती त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याने बरीच प्रगती केली. कोणाची नजर लागावी असा त्याचा तिचा संसार चालू होता. पण नजर लागलीच.

लग्नानंतर ती जास्त काम करत नव्हती. आठवड्यातून ५ दिवस डॉमिनोज , म्याकडोनल्ड , वगैरे होत असे  , कधी वैशाली तर कधी गंधर्व .. पुण्यात हॉटेलांचा तुटवडा का आहे ? तिचे खाणे वाढत होते. आता फिरायला नेताना त्याला तिला उचलणे अशक्य होते. तिने वजनाची सत्तरी पार केली होती. तिचे काळेभोर केस तिने कापून बॉबकट केला होता , तिच्या गोऱ्यापान त्वचेवर मेकअप च्या सामने एलर्जी उठली होती. कमनीय अंतर्वक्र फिगर आता बहिर्वक्र झाली होती. दोघांची आता वरचेवर भांडण होऊ लागली . तो ऑफिसातून आता अजूनच उशिरा येऊ लागला. रात्री १२-१ ला भांडणाच्या आवाजाने शेजार्यांची झोपमोड होऊ लागली. व्हायचं तेच झालं. त्याने तिला माहेरी पाठवायचा निर्णय घेतला , तिनेही आता परत न येण्याचा निर्णय घेतला आणि त्याच रात्री ती घरी निघून गेली .

तिची आई आता आजारपणाने खंगली होती. काय बोलणार बिचारी. फोनवरच त्याने तिला घटस्फोटाची बातमी दिली. पण त्या पेपर्स वर सही घेण्यासाठी त्याला तिच्या घरी जावे लागले. तो घरी गेला.  जेवायची वेळ होती . तोच ... तोच त्याला तो ओळखीचा वास आला , आज वांग्याची भाजी होती. तिने त्याला वांग्याची भाजी वाढली , तेंव्हा त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो दवणीय झाला होता . त्याने सात-आठ वेळा वाण्याची भाजी मागितली . मागचा काळ त्याच्या डोळ्यासमोरून जात होता. ती जेंव्हा जेवत होती तेंव्हा तिच्या लक्षात आलं , अरे आज भाजीत मीठ नाही .. आणि हा काही बोललाही नाही. एक वेळ भाजीत केस झुरळ पाल पडली तरी त्याला चालायचं , पण मिठ कमी पडलेलं त्याला चालायचं नाही , आणि आज त्याने चक्क निमूटपणे खाल्लं ? दोघांचे ही डोळे पाणावले होते. वातावरण दवानीय झालं होतं. त्याने घटस्फोटाचे पेपर फाडले आणि तिला घट्ट मिठी मारली होती. वांग्याच्या भाजीमुळे ते परत एकदा एक झाले होते.  .

 नाही , खरंतर त्याचे अश्रू भाजीत पडल्यामुळे भाजीला चव आली होती.

Sunday, July 27, 2014

Minuscule: Valley of the Lost Ants - एक अति सुंदर अनुभव



काल स्त्रीहट्टापुढे गुढगे टेकवत  "मीनेस्क्युल - हरवलेल्या मुंग्यांची  दरी" ( शब्दश: भाषांतर )  पाहायला गेलो. तसा पूर्वी प्रोमो वगैरे पाहिलेला , पण चित्रपट लै भारी असेल असे काही वाटले नव्हते. किंवा त्याच्यावर  दोन शब्द खरडायची तसदी घेईल असेही नाही. अंमळ बादलीभर पॉपकॉर्ण आणि टिपाडभर सॉफ्टड्रिंकची सेटिंग लावून सीटवर बसलो. चित्रपटाच्या सुरुवातीला एक कपल एका अतिशय निसर्गरम्य अशा जागी  निवांतक्षण घालवत वोडकाचे दोन पेग घेत वेळ घालवत असतं. बाई प्रेग्नंट असते. अचानक तिला आतून काहीतरी जाणीव होते आणि तिचे यजमान तत्काळ तिला गाडीत बसवून रवाना होतात . जाताना पार्टीसाठी आणलेला बराचसा सामान मागे ठेवून जातात.  मी चित्रपट एनिमेशन प्रकारातला आहे हे समजून होतो आणि इथे अजून कसलाच एनिमेशनचा प्रकार दिसत नाही आणि दिसेल अशी कुठे अशाही नाही. पण तरीही ते मनमोहक दृश्य पाहून मी मात्र सुखावलेलो .

ते कपल गेल्या नंतर खरी मजा सुरु होते. वेगवेगळ्या प्रकारचे कीटक माश्या वगैरे पार्टीच्या सामानावर तुटून पडतात. जो तो आपल्या वजनाच्या १००००० पट वजनी वस्तू उचलून पळवून नेण्याच्या मागे असतो. प्यारलली दुसरीकडे चित्रपटाच्या हिरोचा जन्म त्याच्या दोन भावांसोबत झालेला असतो . हा हिरो म्हणजे एक रंगीत आकाराचा किडा. आता हा किडा असल्याने त्याच्यात मुळातच किडे असतात , आणि त्या कारणाने तो त्याच्या फ्यामिली पासून दूर होतो आणि या पार्टी स्पॉट मधल्या एका डब्यात जाऊन लपतो.या डब्यात शुगरक्युब्ज असतात. या डब्याला ८-१० काळ्या मुग्या आपल्या वारुळाकडे घेऊन जातात .

वाटेत या किड्याची आणि मुंग्यांची दोस्ती होते. वाटेत लाल आणि क्रूर विलन मुंग्या दिसतात. काळ्या मुंग्यांचा सरदार त्याला एक शुगर क्यूब देतो पण त्यामुळे ते रागावतात.वाटेत पाठलाग करताना बरीच धमाल येते . काळ्या मुंग्यांचे कमालीचे टीमवर्क दाखवताना दिग्दर्शकाने इम्याजीनेषण आणि स्पेशल इफेक्टचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. नंतर हा हमला थेट काळ्या मुंग्यांची टीम विरुद्ध लाल मुंग्यांची टीम असा होतो . त्यात आपला किडा कशा प्रकारे त्यांना मदत करतो वगैरे पडद्यावर बघण्यात मजा आहे . हा चित्रपट चुकुनही टोरंट वर डाऊनलोड करून पाहू नये. हे चित्रपट मोठ्या स्क्रीन वर बघण्यात मजा आहे . शून्य संवाद आणि फक्त किड्यांचे गुंजन आणि भुणभुण यातूनही एखाद्या सुपर डायलॉग वाल्या चित्रपटाच्या कानाखाली मारेल असे मार्मिक चित्रीकरण यात आहे. शक्यतो मला चित्रपटात चुक्या आणि कमी काढायला आवडते पण यावेळी तसा काही स्कोप नाही .दिलखुश चित्रपट .

जमल्यास पहा :)

Monday, July 14, 2014

लाईकचे प्रकार


हुशार झुकरबर्गने "लाईक" च्या बटणाचे इंवेन्षण करून फेसबुक मध्ये ऑक्सिजन फुकला. लोकं येतात , फेसबुक वाचतात , कोणी आवडलं म्हणून लाईक करतो , कोणी पटलं म्हणून लाईक किंवा लाईक दाबण्याची बरीच कारणं असू शकतील . अस्मादिकांनी वातावरणाचा जायजा घेऊन टिपलेले हे लाईकचे काही खास प्रकार :-
१. बकरा लाईक : आपल्या लिष्ट मधला (किंवा पाहण्यातला) कोणी एखादी पोस्ट लाईक करतो म्हणजे आपणही ती केली पाहिजे या भावनेने आपसूक वाहिले गेलेले लाईक या प्रकारात येतात . येथे माणसाच्या मेंढरी वृत्तीचे दर्शन घडते.
२. सेटलमेंट लाईक : एखादा आपली पोष्ट लाईक करून गेला की कर्तव्यभावनेमुळे जे लाईक्स निघतात ते या प्रकारात. ज्याप्रमाणे स्वाभिमानी माणूस कोणाचे कर्ज बाकी ठेवत नाही , त्याप्रमाणे हे लोक कोणाचे लाईक्स उधार ठेवत नाहीत
३. जमालगोटा लाईक : अडल्यारात्री जमालगोटा घेतल्यावर दिसणाऱ्या परिणामांप्रमाणे हे लोक दिसतील ती प्रत्येक पोष्ट लाईक करत सुटतात , साईडबारवर बार बार हर बार यांचे नाव दिसत राहते. कर्ण लाजेल एवढा एवढे दानशूर या प्रकारात येतात
४. चाटे कोचिंग लाईक : या लाईक्स शक्यतो सुंदर मुली किंवा आव्हानात्मक दिसणाऱ्या महिलांच्या पोस्ट वर फोटो टाकल्याच्या दुसऱ्या मिनिटापासून सुरु होतात. यांच्या लिष्ट मध्ये फिमेल आयडीज चा भरमार दिसतो आणि यांची टाईमलाईन एक्टीवीटी पाहिल्यास यांचे लाईक्स चाटे गिरी करण्यात वापरल्याचे दिसते .
५. परमपूज्य लाईक : शक्यतो आपल्या लिस्ट मध्ये असणारे आदरणीय किंवा सिनियर किंवा उच्च विचारवंत किंवा "सो कॉल्ड" फेमस व्यक्तीने काहीही पोस्ट केलं की ते कळो न कळो आपला आदरणीय लाईक तिथे पुरवलाच पाहिजे या हेतूने प्रेरित. कधी कधी पोस्ट वाचायला किमान ५ मिनिटे लागतात पण एका मिनिटात बक्कळ लाईक दिसल्या की आदरणीय लाईक ओळखू येतात
६. बाब्या लाईक्स : "आपला तो बाब्या" अर्थात आपल्या मताला पटणारी किंवा फेवरिंग पोस्ट असली की बाब्या लाईक ठोकला जातो. शक्यतो राजकारण , आवडता नेता किंवा पक्ष या विषयांत बाब्या लाईक्स ओळखता येतात. भले मोठे इंग्रजी लेख कधी कोण वाचत असेल अशी शंका आहे . उदाहरणार्थ : "PM Modi's extra ordinary visionary economic step" किंवा "Dr. Swami exposes himself " नुसतं हेडिंग वाचलं की भक्तांनी पोस्ट लाईक केलीच पाहिजे. आपभक्त किंवा कॉंग्रेसभक्त किंवा इत्यादी ... बाब्या लाईक्स डन !
७. आशावादी लाईक : आपण जर दुसऱ्यांच्या पोस्ट लाईक केल्या नाहीत तर उद्या न जाणो आपल्या पोस्ट वर लाईकचा सुका दुष्काळ पडेल अशा भीतीने या वृत्ती सगळीकडे आपली इन्व्हेस्टमेंट करत असतात
८. पप्पूबनो लाईक्स : लाईक करून जादू पहा , लाईक करा आणि ६९ टाईप करून गम्मत जम्मत पहा वगैरे प्रकारात स्वत:च्या अकलेचे दिवाळखोरी स्वत:च्या जबाबदारीवर पूर्ण शुद्धीत केले जातात.
९. हेल्पिंग लाईक : आपण अमकी पोस्ट लाईक केली तर तमक्याच्या अकाउंट मध्ये ऑटोमेटीक पैसे जमा होऊन त्याचे दु:ख किंवा गरज पूर्ण होईल या भाभड्या आशेपायी वाहिलेले लाईक
१०. इमोशनल लाईक : देशभक्त असाल तर , आईवर प्रेम करत असाल तर , राजे पुन्हा जन्माला यावे असे वाटत असेल तर , गणपतीने दुध प्यावे असे वाटले तर , एकाच बापाची औलाद असाल तर , वगैरे भावनिक च्यालेन्जेसला आपल्या ५६ इंची छातीने स्वीकारणारे शूरवीर या प्रकारचे लाईक देऊन आपण पाईक असल्याचे "कोणाला?" सिद्ध करतात
एवढेच सुचले , अजून सुचले तर परत कधी !

Friday, July 11, 2014

थोर संगीतकार अनु मलिक



आम्हाला अनु मलिक कळले ते असा संगीतकार म्हणून की ज्याचं संगीत इतकं महान आहे की कोणी महान संगीतकार ते आधीच चोरतो  म्हणूनच . लहानपणापासून जसं घरी इंटरनेट आलं तसा आम्हाला इंग्रजी गाण्यांचे लिरिक्स डाऊनलोड करून तोंडपाठ करण्याचा छंद जडला . याला कारण म्हणजे इंग्रजी गाण्यांचे विडीयो. तर ते असो. अनु मलिक आणि माझी ओळख तशी काही डायरेक्ट नाही . नाही म्हणजे मी त्याला ओळखतो, पण तो मला ओळखत नाही.

बाजीगर मधली त्याची कलाकृती "मै मिला तू मिली .. तू मिली मै मिला .. दुनिया जले तो जले ..."  यासारखा अफलातून प्रकार मी आजतागायत कोणत्या बडबडगीतात देखील कधी ऐकला नाही. "अरे बाबा अरे बाबा करे क्या दिवाना .. लडका जब भी लडकी देखे गाये यही गाना " या अन्नू मलिकच्या गाण्याला मकारेना वाल्यांनी आधीच चोरलं होतं . मला नक्की आठवत नाही , पण बर्याच स्पानिश , इंग्लिश आणि काही काही तर म्हणे जपानी संगीतकारांनी अनु मलिक च्या धून आणि कम्पोजीषण चोरी करून ग्र्यामी वगैरे जिंकलेल्या आहेत .

उंची है बिल्डींग .. लिफ्ट तेरी बंद है ... वगैरे गाण्यांनी अन्नू मलिक च्या संगीतज्ञानाची उंची कळते . तो चिरका भसाडा आवाज ऐकला की खुद्द ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्यामुखी वेद वदवले ती घटना पुराणातली वांगी नसून खरी आहेत हे मनोमन पटते .
अन्नू मलिक चा अजून एक वाखाणण्या सारखा गुण म्हणजे त्यांचे परम शिष्य मा.प.पु. नवज्योत सिंग सिद्धू जे आपल्या ताबडतोड शायरी साठी प्रसिद्ध आहेत , त्यांची खरी प्रेरणा अनु मलिकच.

अनु मलिक चा अजून एक बोनस गुण म्हणजे , तो एक उत्तम जज/ज्युरी आहे. 12 Angry Men (1957) , इंडियन आयडॉल , एंटरटेनमेंट के लिये कूच भी करेगा ,India Got tallent , आप की अदालत वगैरे सारख्या मालिकांतून उत्तम जजमेंट दिल्याबद्दल त्यांची शिफारस खरं तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून व्हायला हवी . पण अन्नू मलिकला कधी तो डिजर्व करतो ते मिळालंच नाही , ही त्याची नाही तर भारतीयांची शोकांतिका आहे .

बऱ्याच जणांना अनु मालिक विषयी अजुन एक गोष्ट माहिती नसेल. माझे एक दूरचे काका सान्ताक्रुजला राहतात, त्यांचं फिल्मसिटी मध्ये येणं-जाणं असतं. ते सेट वर दुधाच्या पिशव्या , केळ्याचे गड , ब्रेड-बुरून-बनपाव वगैरे पुरवायच काम करतात . त्या काकांनी सांगितलेला किस्सा . अनु मलिक ला ५ केळी , एक ब्रेड चा अख्खा पुडा , दुध आणि वरून अमूल बटरचं एक अख्ख पाकीट एकत्र काला करून खायला आवडतं. त्याच्या हाताची बोटं इतकी मोठी आहेत की महिला ज्या बांगड्या हातात घालतात त्या बांगड्या अनुच्या बोटात बसतील. अनु हार्मोनियमची २-३ बटनं एकसाथ दाबतो . तबल्याची कितीतरी पानं अनुच्या बोटांनी हाय खाऊन फाटलेली आहेत.

खरच , एवढं असूनही अनु खूप डाऊन टू अर्थ आहे असे माझ्या त्या दूरच्या काकांचे मत आहे . अनु मलिक ला शतश: प्रणाम .

Saturday, July 5, 2014

क्रिकेटचा ओवरडोस

हे MCC विरुद्ध ROW ची म्याच म्हणजे थोर क्रिकेटर्सची मंगळागौर वगैरे वाटू लागले आहे. गेला बाजार सगळे राजकारणी एखाद्या गैरराजकीय कार्यक्रमासाठी एकच मंचावर जमले आहेत , आणि ते एकमेकांची अत्यंत मुक्तकंठाने स्तुती करत आहेत , हे जेवढं गुळचट वाटतं तेवढी गुळचट मला ही म्याच वाटते. फक्त आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ बघावा इतकंच सार काय ते यात. पण ते म्याच स्पिरीट , ते टशन आणायचं कुठून ?
मला लेट ९०ज किंवा २००५-६ च्या आधीचं क्रिकेट आठवतं. भारंभार सेरीज नसायच्या. श्रीखंडपूरी रोज खायला दिली तर त्यातला आनंद निघून जातो. त्यावेळीची श्रीखंड पुरी म्हणजे भारत पाकिस्तान म्याच. दौरा फिक्स झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी ग्रामपंचायतीत जाऊन एकूण एक पेपरचं शेवटचं पान वाचायचो. त्यावेळी २४x७ न्युज च्यानेल्स नसत. पेपरात कॉलम्स वाचायची ओढ असायची. म्याच पाहिलेली असली तरी दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी वाचायला मजाच यायची.
सईद अन्वर , अमीर सोहेल , वकार , सक्लेन , इंझमाम , सलीम मलिक, वसीम चा भरणा असलेली टीम गांगुली , तेंडूलकर, द्रविड,कुंबळे , अझुरुद्दिन , प्रसाद श्रीनाथ, नयन मोंगिया , मांजरेकर वगैरे लोकं असलेल्या टीम बरोबर खेळायची . त्यावेळी बहुतेकदा भारत हरायचा. म्याचेस शारजा मध्ये व्हायच्या. त्यावेळी पहिल्या बॉलपासून जो थ्रील असायचा तो थ्रील किमान मला शेवटचा कधी मिळाला ते आठवत नाही. न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियातल्या म्याचेस मी रात्री २-३ वाजता उठून पाहायचो. तेंडूलकर ओपनिंग करायचा आणि चामिंडा वास किंवा एलन डोनाल्ड किंवा मेग्रा जेंव्हा रन अप घ्यायचे तेंव्हा काळजाचे ठोके ऐकू येत. वर्ल्ड कप मधल्या पाकिस्तान विरुद्धच्या म्याच मध्ये सचिन ने टोलावलेला थर्ड म्यान वरचा सिक्सर किंवा कॅडीकच्या त्या शोर्ट बॉलवर एक पाय पुढे घेऊन मिड विकेट वर खेचलेला षटकार , कधी हेन्री ओलोंगाची काढलेली लक्तरं तो सचिन पुन्हा अनुभवावासा वाटतो. सौरव गांगुलीचा ऑफ ड्राईव ऑफकट किंवा डाऊन द विकेट येऊन मिड ऑन ला ग्राउंड बाहेर टोलवलेला षटकार , किंवा सेहवागने एकाच ओवर मध्ये ५ चौकार मारणे , किंवा कुंबळेने दिवसभर रडकुंडी आणलेल्या स्टीव वॉ ची विकेट घेणे , हरभजनची कोलकात्यातली हेट्रिक किंवा सेहवागची मुलतानी ट्रिपल सेंच्युरी .... यात जे थ्रील होतं ते गवसत नाही. भारत हरणे किंवा जिंकणे मोठी गोष्ट असायची.
आता त्या निघून गेलेल्या मेमरीज या पद्धतीने खेळवल्या गेलेल्या गुळचट म्याचेसमुळे परत येणे नाही. लय क्रिकेट झालं चांगलं झालं का वाईट झालं ?

Sunday, June 29, 2014

आधुनिक तुकाराम

मागासपण देगा देवा |
त्यांसी आरक्षणाचा खवा ||

ओपनवाले रत्न थोर |
तया ओपनचा हा मार ||

ज्याचे जाती उच्चभ्रूपण |
तया जगणेही मुश्कील ||

तुका म्हणे जात |
व्हावे मागसाहून मागास ||

- संत तुकाराम

ता.क. तुकाराम महाराज स्वत: बेनीफीशीयरी होत. त्यामुळे तुकारामांना द्राक्ष आंबट नव्हेत.

तिरस्कारमूर्ती माणूस

मला वाटलं संपूर्ण पृथ्वीवर  जर एकच देश असता तर माणसाने कदाचित कोणाचाही दुसऱ्या देशाचा म्हणून तिरस्कार केला नसता. ही देशाची बंधनं तोडली पाहिजेत.  पण तोच पाहिलं , एकाच देशातली लोकंही  धर्माच्या नावाने दुसऱ्याचा करतच असतात की .

मग मला वाटलं, जर हा धर्मच नसता तर किती बरं झालं असतं , सगळेच एका धर्माचे असते तर हे दुसऱ्या धर्माला कमी लेखणे , त्यांचा तिरस्कार करणे कदाचित थांबलं असतं . पण नाही , सगळे एकच धर्माचे असते तर त्यात जाती आहेत.

मुद्दा जातीच्या उच्च-नीचतेच असो किंवा आरक्षणाचा , काहीतरी कारण आहेच तिरस्काराला. मग मला वाटलं, साला एकच धर्म आणि एकच जात असती तर निदान हा तिरस्कार कमी झाला असता .

पण नाही .. त्यातही आमच्या पोटजाती आहेतच . स्वत:ला वरचा समजायचं दुसऱ्याला कमी लेखन म्हणजे तिरस्कार एकच धर्म एकच जात असली तरीही आहेत.

मग मला वाटलं , पोटजातीही नकोत. सगळ्यांत भावकी हवी. सगळेच एकमेकांचे भौभौ. तोच मी पाहिलं भावकी-भावकी मध्ये तर अजूनच जास्ती तिरस्कार आहे. एकच धर्म जात पोटजात आणि भावकी असली तरीही तिरस्कार मात्र कायम आहे .

तिरस्कार काय संपत नाय लका !