Sunday, July 11, 2010

आय.डी. तितक्या प्रकृती

मला मराठी संस्थळावर येऊन आता जवळपास दोन-अडिच वर्ष झाली. हळु हळु इथले रिती-रिवाज कळले. लोकंही हळु हळु ओळखु लागलो. इथे जशी वयानं अनुभवानं श्रेष्ठ मंडळी आहेत , तशीच अगदीच गबाळी , शेंबडी आणि ज्यांना पाहुन फक्त किळस यावी असे ही महानग आहेत. थोडक्यात काय ? की मराठी अंतरजालावर वावरणार्‍या लोकांची बँडविड्थ फार मोठी आहे. कोणी वैचारिक गुर्‍हाळं चालंवतो , कोणी आपल्या विश्वात मश्गुल स्वतःची लाल करत रहातो ,कोणाला प्रसिद्धीचे हव्यास, कोणाला स्वतःचा उदोउदो व्हावा असं वाटतं,तर कोणी काय लिहीतो हे त्याला स्वत:लाही समजत नाही. काही काही तर इतकं भयंकर पकाऊ लिहीतात की पहिला पॅरा वाचतानाच मी वैतागुन म्हणतो, "हे निद्रादेवी,मला तुझ्या कुशीत घे, आणि दोनचार चांगलीशी स्वप्न दाखव बाई , ह्या लेखकानं माझ्या डोक्याचा भुगा केलाय ".

माझ्या अंडरस्टँडिंग नुसार, मराठी संस्थळांवरुन बौद्धिक ग्रहण करण्याचा प्रकार शुन्य टक्के आहे. किंबहुना तो शुन्य टक्केच असावा. एखाद्या जनरल विषयातली माहिती वगैरे ठिक आहे. कोण महाभाग जेंव्हा एखाद्या गोष्टीचं भुसकाट काढे पर्यंत एखाद्या विषयावर पकवतो तेंव्हा आमचा नेहमीच तोल ढासळतो. आपल्याला जे शिकायचं होतं ते आपण शाळेत/विद्यालयांत शिकलो आहोत. आणि जरी आपल्याला इंटरनेट वर कोणती माहिती हवी असेल तर त्यासाठी गुगल बाबाने मिलियन डॉलर्स खर्ची घालुन एक एक्सलंट सर्च इंजिन २४x७ सुरु ठेवलेलं आहे. मग मराठी साईट्स वरंच हे गुर्‍हाळे दळने का चालु असते ? मागे कोणी एकदा कसला तरी संस्कृतचा श्लोक उचलुन आणला आणि त्याचा अर्थ काय ? म्हणुन एक धागा सुरु केला.असे आणि अशा प्रकारचे कैक धागे. मला नेहमी प्रश्न पडतो, साला हे लोक ह्या सुभाषितांचा/श्लोकांचा अर्थ जाणुन नक्की काय करत असावेत? बर आता म्हणाल तर ही सुभाषितं लिहीली गेली तो काळ कोणता होता ? त्याकाळाप्रमाणे आपण आज आचरण तरी करणे शक्य आहे का? गितेत कृष्ण म्हणुन गेलाय "फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा" शेंबड्या पोर्‍याला देखील ही ओळ माहिती असेल, पण मग आज आयटी वाले इन्क्रिमेंटची(पक्षी: फळाची अपेक्षा) वाट का पहात असतात ? तिकडे इन्क्रिमेंट झाली की इकडे पेपरं पडायला सुरुवात होतेच ना ? आहो का नाही होणार? कृष्णाला देव मानतात म्हणुन ठिक आहे, नाही तर कृष्णाच्या ह्या तत्वज्ञाना बद्दल लोकं त्याला वेड्यात काढायला कमी करतील ? मग हेच लोक 'मला सुभाषिताचा अर्थ सांगा हो" म्हणुन काय कोल्हेकुई पिटतात ? तर ह्याचं सुबोध मराठीत उत्तर आहे, "माझ्या अभ्यासुपणाचं कौतुक करा" , "माझ्या लेखावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडा ( ह्यांच्या लेखांवर कुत्र मुतल्यासारखाच पाऊस पडतो,हा भाग अलहिदा).

अजुन एक प्रकारचा फ्रस्ट्रेटेड प्रकार पहायला भेटतो, तो म्हणजे पण्णाशी किंवा साठी उलटलेले एकेकाळी उच्चशिक्षण घेतलेले (आणि सद्ध्या रिकामे असलेले) वृद्ध गट. ह्या गटातली लोकं अशा विषयांवर लिहीतात जो विषय एखाद्या पेपरात छापुन येतो आणि तो पेपर पोर्‍याला गटाराशेजारी बसवताना त्याची आई खाली पसरवते. ह्यांच्या लेखणाचा स्पिड आणि एवढं ढिगाढिगानं प्रसवणारं ते भयंकर मटरेल पाहिलं की खडकवासला धरण तुडुंब भरल्यावर जशी त्याची सगळी दारं खुली करतात आणि पाणी जशी वाट मिळेल तसं प्रलयकारी वेगात वहातं त्याची आठवण होते.कधीकधी हे लोकं कोणत्याश्या इंग्रजी नॉवेलचं भाषांतर (अगदी वर्ड-टु-वर्ड बरंका) करत बसतात आणि मग त्याचं आपल्याला अप्रिसियेशन मिळेल म्हणुन चातका सारखी आ वासुन धागा रिफ्रेश करतात. ह्यांच्या इथे कुत्र ही मुतत नाही, ते नुसतंच वास घेऊन जातं , चार प्रतिसाद असतात त्या पैकी २ यांच्यासारख्याच नगांचे असतात , आणि २ प्रतिसाद हे त्याप्रतिसादांना आभार प्रदर्शित करणारे ह्यांचेच असतात.

"माझी कुणीतरी दखल घ्यावी" असं कोणत्याही मणुष्यप्राण्याला वाटते. पण अरे बाबा, तु तुझ्या घरात नाहीस जिथे तु चड्डी जरी भरवली तरी तुझी आई, लाडानं "कशी गं शु केली माज्ज्या बाळानं, आत्ता तर भरवलं होतं मी माज्ज्या शोणुल्याला.." करंत पुन्हा "श्श्श्श्श्सूऊऊऊऊ श्श्श्श्श्सूऊऊऊऊ"  करत उरलेला कार्यक्रमही जोरात कर म्हणुन प्रोत्साहित करेल. काही आय.डी. इतके अ‍ॅडिक्टेड असतात ह्या 'दखल घेणे' प्रकाराला, की त्यांची त्यांच्या धाग्यांवर नकारात्मक प्रतिक्रिया खायचीही तयारी असते , फक्त "माझ्या धाग्याला प्रतिसाद द्या हो" एवढ्या एकाच हेतु ने प्रचंड प्रेरीत असतात. ह्या दखल न घेतल्याचा त्रास नव्या - नवख्यांपेक्षा जुण्या-मुरलेल्या लोणच्यांचा जास्त होतो.हे लोकं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात यशस्वी असतीलही , कदाचीत त्यामुळे त्यांच्या मराठी संस्थळांवरच्या अपेक्षा वाढत जातात. '१५० लोकं मला रिपोर्ट करतात, माझ्या पाण्चट विनोदांना सुद्धा हसतात' हीच अपेक्षा यांच्या अंतरजालावर असते, आणि सगळा घोळ होतो.

काही आय.डी. हे अगदीच बाळबोध लिखाण करतात.हे कशावर लिहीतात? का लिहीतात? कोणत्या वाचकवर्गासाठी लिहीतात? ह्याचं ज्ञान ह्यांना स्वतःलाही आहे की नाही ह्याबाबद मी अजुन सांशक आहेत. लेखाचा हेतु काय आहे ? हे यांना उमगलेलंच नसतं.पण केवळ फुकट आहे म्हणुन पानं भरवायची, त्यातुन पुन्हा लोकांकडुन "वा वा! काय छाण लिहीलंय! च्या अपेक्षा ठेवायच्या! तो खुळचटपणा इतका बकवास असतो की की असे आय.डी. पाहिले तरी सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. काही काही आय.डींनी तर स्वतःचे असे ऑफसेट्स बनवले आहेत. त्यांची जालावरची ती ओळखंच तशी आहे. हा आय.डी. जर नाव बदलुन आला आणि कोणाचा जर त्याच्याशी साम्य असलेला आय.डी. असेल तर त्याची त्रेधातिरपिट होते.नव्हे त्याला तितकं जागरुक व्हावंच लागतं. तो प्रत्येक ठिकाणी वावरताना 'ह्या" आणि माझ्या आय.डी. चा काही संबंध नाहीये ;) थोडक्यात, ह्यांची दखल जरुर घेतली जाते पण ती ह्या प्रकारे. लोकल/बस साठी स्टेशन वर उभे असताना गर्दीत सामान्य लोकं आजुबाजुला असतात. आपण त्यांची दखल घेत नाही, किंवा वि जस्ट डोंण्ट माईंड देम बींग क्लोज टु अस इन गर्दी(मराठीत क्राऊड) पण जर एखादं दाढीचे खुटले वाढलेलं,अंगाचा वास येणारं,गबाळे कपडे घातलेलं बेनं शेजारी उभं राहिलं तर आपण न रहावुन आपली जागा तरी बदललो नाही तर त्याला तरी दुर रेटतो. ह्यांच्याविषयी आमच्या जालिय सदस्यांची मतं काहीशी अशी आहेत.
"अरे तो ग्याणबा७८९ म्हणजे शेंबुड आहे रे , घृणा वाटते मला त्याची. "
"हा हा हा , ह्या ग्याणबाच्या डोक्याचे आटे ढिल्ले झालेत , काय बावळट पणा करतोय "
"हा ग्याणबा तर ||***|| ला सुद्धा लाजवेल असा वागतो रे हल्ली"
" हा बहुतेक लहाणपणी डोक्यावर पडलेला असणार "  असो , ही लिस्ट फारंच अपुर्ण आहे. ह्यांच्यावर उधळलेल्या स्तुतीसुमनांचा एक नवा धागा होऊ शकेल.

आय.डी.चा अजुन एक पैलु म्हणजे राजकारणी आय.डी. ह्यांना केवळ जालिय राजकारणात रस असतो, ह्याच्या त्याच्या स्क्रॅपबुक मधे जाऊन या बोटावरच्या थुंकी त्या बोटावर करणे , पिना मारणे , एकाला दुसर्‍या विरुद्ध भडकवने, एखाद्याला दुसर्‍याविरुद्ध "चढवुन देऊन" आपण लांबुन त्याची मजा लुटणे. असे हे विकृत आय.डी. हे स्वतः शक्यतो क्लिन कॉलर रहाण्याचा प्रयत्न करत असतात. पण दर वेळी जमुनंच येईल असे नाही. मग तोंडघशी पडलं की दुसरीकडे त्याच आय.डी. बद्दल गोडगोड जवळीक साधणार्‍या प्रतिक्रीया लिहायच्या. जालावर सगळ्यात इरिटेटिंग आणि नको असलेले कोणी प्राणि मला वाटले असतील तर ते हे. स्वतःला चालाख हुशार आणि दिडशहाणे समजणार्‍या ह्यांना "गिरे तो भी टांग उपर" राहिल असा शाप मिळालेला असत्तो बहुतेक.

असो , जालावर फिरताना मला १०० विचित्र टाळकी भेटली असली तरी २०-१ अफलातुन टाळकी सुद्धा भेटली. प्रो'ज अँड कॉन्स प्रत्येक गोष्टीला असतात. मामला बॅलंस्ड है.
प्रत्येकजण कुठेतरी स्वतःच्या "आयडेटिटी" च्या शोधात असतो, त्याला त्याची "आयडेंटीटी" मिळो इतकंच मागणं विधात्याकडे आहे, कारण "आयडेंटीटी क्रायसीस" मधे अडकलेले,पिचलेले आणि फ्रस्टेट झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे , आणि ही चिंतेची बाब आहे :)

जो जे वांछिल तो ते लाहो ||  प्राणिजात ||

-(जालप्रकृती अभ्यासक) टारझन

8 comments:

Unknown said...

tu kuthalya category madhe yetos re sondakya? jyala tyala shivya de,jithe tithe shembud shinkar asale prakar band kar...tu mhanaje koni sarvadnyani aahes ka??? mipavarun ka haakalale hyacha neat vichaar kar. tuze lekhan changalech aahe pan tyavishyicha garva aani fusharakya marane kami kar.

Unknown said...

सतिशराव , मी कोणत्या प्रकारात मोडतो ते मी लोकांवर सोडलंय :) बाकी आपल्यासारख्या आय.डींचा एक गृप राहिलाच की. ह्या आय.डी धारकांना आपल्या बापाचं नाव लावायला शरम वाटत असते, हे छुप्या नावाने येतात आणि गरळ ओकुन जातात. बाकी मी शिंकरलेला शेंबुड तुमच्या तोंडावरंच सुकलाय बहुदा. तोंड पुसुन या ;)

Unknown said...

mala vatalelach tu asala kahitari lihinar. mi mazya kharya navanech lihit aahe. tuze lekhan aavadate mhanun salla dila hota baki dukarashi ghaanit kusti khelayachi mazi ajibat icha nahi. tula mipavarun ka hakalale hyacha shaant pane vichar kar..mhanajee mi ekatach nahi he tula samajel.

aso aamchya pratisadachi dakhal ghetalyabaddal dhanyavaad!!

Unknown said...

माझ्या विचारांचं मी पाहुन घेईन. मी तुमच्याकडे सल्ले मागायला आलेलो नाही. मला सल्ले देण्या आगोदर स्वतःची लायकी तपासा. माझे लिखाण सर्वांना आवडावे असा माझा आग्रह नाही, तुम्हाला ते आवडले अथवा आवडले नाही मला *ट फरक पडत नाही. आपल्याला डुकराशी घाणीत कुस्ती करायची का इच्छा नाही हे कळुन घेण्याची बिल्कुल उत्सुकता नाही. आपल्या आवडीनिवडी लिहायच्या असल्यास इंटरनेट सर्वर्स ओस पडलेले आहेत. आपल्यासारखी लोकं आधी नको तिथे बोटं घालतात आणि वास आला म्हणुन ओरडतात. सद्ध्या माझ्याकडे वेळ नाही , आपण स्वत:ला फाट्यावर मारुन घेणे. आणि असले फुकाचे सल्ले देण्याची उगा तसदी घेऊ नये. अपमाण होईल.
सदर प्रतिसादाने झणझण होणार नाही अशी अपेक्षा करतो :)
शुभेच्छा.

निशा............ said...

शेणबा...आपलं शाणबा ने खोडी काढली म्हणून हा लेख पाडला वाटतं!!! :)

एक दोन रसायन शास्त्राचे लेख त्याने लिहिले...मला वाटले...बाबाला सापडली शेवटी त्याची लाइन..पण नाही.... निव्वळ पकाऊ!!!

दुर्लक्ष करा... जसे बहुतेक सगळे करतात!!!

he isnt worth so much.... he is nothing more but a frustrasted soul who is badly in need of some communication..and attention..good or bad he doesnt seem to care....

deny him the very thing he is looknig for!!!!

Unknown said...

LOLz ,
You said it Nisha ,
But Only positive thing for him is that He is not only of his kind, there are few more around :)

अजित said...

LOL'z itka apman kasa kay karu shaktos re tu? shahanyane kharach tuzya nadi lagu naye.... vachave aani nahi awadla tar sodun dyave....

lay bhannat...

Unknown said...

shaanbaa war lihaayalaa tuzee aukaat aahe kaa? lay chhaan por aahe! shaanabaa tulaa pan lihaayalaa haw.