Friday, July 9, 2010

स्टेप-बाय-स्टेप

हल्ली ना ,मला कसलं वैराग्य आलंय कळत नाही. पुर्वीसारखं काही वाटतंच नाही , पुर्वीसारखं म्हणजे हे आत्ताआत्ता, कॉलेजात होतो तसं. कॉलेजात छोट्या छोट्या गोष्टी देखील मनमुराद आनंद देऊन जायच्या , एक्साईटमेंट्स देउन जायच्या. कोणती अनपेक्षित गोष्ट घडली की "आनंदानं हुरळुन जाणं" हे मला फक्त कॉलेज पर्यंत माहित होतं असं वाटतं , त्यानंतर ते ग्राज्युअली कमी कमी होत गेलं. का कुणास ठाऊक ? माझ्यासारखं माझ्या वयातल्या इतरांचंही असंच होत असेल का ?

कॉलेजात असतांना कोण्या पोरीने साधा कटाक्ष दिला तरी तो काळजाला भिडे. मनात मोरपिस वगैरे फिरल्याच्या,मनतरंग सैरभैर होऊन भर उन्हाळ्यात पाऊस पडावा आणि आपण बेभान होऊन नाचावे वगैरे वगैरे कविकल्पना आपल्या आपल्यालाच सुचत. आता हे आठवलं तरी हसु येते (की मी आता स्वतःचं हसु करुन घेतोय ?) कुठल्याशी कंपनी इंटरव्यु ला येणार किंवा आपण इंटरव्यु अपियर होणार ह्यातही प्रचंड थ्रिल होतं , काय होईल ? होईल का माझं प्लेसमेंट ? मनाची सैरभैर धाव इथपर्यंतही थांबत नसे. त्यानंतर येणारा पगार ,मग त्या पगारातले मी घरी किती देणार आणि स्वतःसाठी किती ठेवणार ? किठे कुठे भटकायला जाणार ? किती पार्ट्या करणार , सग्गळं सग्गळं कसं टु एक्सायटिंग टू ब्रिथ ! रिझल्टच्या दिवशी वरवर जरी जोक्स पास करत असलो तरी आत काय काहुर माजलेला असे ते माझं मला माहित. आम्ही इंजिनियरींगला अभ्यास ही शेवटची प्रायॉरीटी ठेवली होती, पीएल्स सुरु झाल्यावरही १० दिवसांनी आमची वात पेटे आणि मग आम्ही पेटुन अभ्यास करत असु, त्या आधी सगळा आनंदी आनंद गडे ! त्याची फळंही मग एखाद दुसरी केटी लागुन आम्हाला मिळाली , अर्थात आम्ही त्यातही धन्यता मानायचो , चला एका केटीवर सुटलो गड्यांनो. पण मी जेंव्हा बी.ई. फायनलचा रिझल्ट पाहिला, कोणता क्लास आला त्याकडे लक्ष नव्हतं , नजर आधी फिरली ते गुणतक्त्याच्या उजव्या बाजुला , एक-एक करत सगळे 'P' दिसले , प्रत्येक 'P' नंतर हृदयाचे ठोके एक्स्पोनेंशियली वाढत होते, शेवटी "Pass: Higher Second Class" ची लाईन पहाताना मोठ्ठ्याने ओरडावसं वाटलं पण का कुणास ठाऊक कंठातुन आवाजंच निघला नाही,एक थेंब टप् कन मार्कशिट वर पडला. दुसरा पडला, अगदी तिसराही पडला! ह्याला आमचा आमच्या अ‍ॅबिलिटीवरचा अविश्वास म्हणा, नाही तर रेप्युटेशनवरचा विश्वास म्हणा , मी दोन मित्रांकडुन माझं मार्कशीट ,नाव आणि मार्क्स बरोबर असल्याचं चेक करुन घेतलं. "थोडक्यात फर्स्टक्लास हुकला गड्या " - इति मित्र. "गेला भो**त तो फर्स्टक्लास" असं म्हणुन मी फायनलम्याच मधे पेणल्टी शुटआऊट मधे ४-४ स्कोर असतांना गोलकिपरने अफलातुनपणे गोल आडवावा आणि म्याच जिंकावी त्या आवेगाने पळत सुटलो होतो. अजुनही आठवतंय, इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षाला "मजाक मजाक"मे चांगला सपाटुन नापास झालेलो. नंतर एम-१ केटी ठेउन सेकंड इयरला ही आलो ... तेंव्हा ही आम्ही सिरियस नव्हतो. नंतर "एम-१" साहेब क्रिटिकल ला गेल्यावर मला तारे दिसु लागले. सेकंड इयरला पास होऊनही जर फर्स्ट इयरचा एकही सब्जेक्ट राहिला तर थर्ड इयरला जाता येत नाही. त्या दिवशी फर्स्ट ईयरचा रिझल्ट होता. माझ्यासाठी जणु "जजमेंट डे" च! मार्कशीट हातात मिळाल्यावर पहिल्या रो मधे तब्बल "४८" मार्क पाहिले.. हो हो "४८" मार्क्स म्हणजे आमच्यासाठी सेंच्युरीच होती. मटकन गुढघ्यांवर बसलो. मागची पोरं दंगा करायला लागली. निकालानंतर काही मुलं आनंदानं उड्या मारत यायची तर काही हिरमुसायची. कचितंच एखादा दगड असायचा जो इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ व्हाट हॅपनड् इन मार्कशीट, मख्ख तोंडाने यायचा. थोडक्यात काय ? तेंव्हा इमोशन्स फार  सेन्सिटिव्ह होत्या. मी आनंद उपभोगायचो , एक्साईटमेंट / थ्रील उपभोगायचो , दु:खी देखील व्हायचो.
थर्ड ईयरला जेंव्हा एकदा प्रेमात पडलो तेंव्हा नेहमीच बंक मारणारा मी , रोज ९:०५ ची लोकल कश्शीही मॅनेज करुन पुढेच असलेल्या पिंपरीच्या प्लॅटफॉर्म कधी ती दिसते असं होई. जशी लोकल प्लॅटफॉर्म वर एंट्री करे , नजर तिचा शोध घेई, भरभर लोकं नजरेसमोरुन जात , आणि बरोब्बर तिच्या रोजच्या जागी ती उभी असे, माझा दिवस बनल्यासारखे होई. उलट ती दिसली नाही की पुर्ण डिसमुड होउन जात असे. बाकी ह्या प्रकरणाचे डिटेल्स तुम्ही "माझ्या प्रेमाचे तीन पोपट-३" मधे वाचलेच असाल (नसेल वाचलं तर वाचा , हा छुपा संदेश ;)  ) असो. सांगन्याचं तात्पर्य इतकंच , आय वॉज एंजॉईंग माय लाईफ.

पण अलिकडे स्साला काय झालंय काही कळतंच नाही. गुलछबु,बाहेरुन मोहक/आकर्षक वाटणार्‍या सॉफ्टवेयर इंडस्ट्रीत आता  तिनेक वर्ष उलटुनही गेली. आधी मी घरी प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागायचो, आता देतो. आयुष्य एका स्टेप ने पुढं आलं, आता असा १८०अंशांनं बदल झाल्यासारखा वाटतो. तेंव्हा इंजिनियरींगची वार्षिक फी देताना नाकी नऊ यायचे, आता एका झटक्यात देऊ शकलो असतो. तेंव्हा कँटिन मधे २२ रुपयांची एग-बिर्याणी म्हणजे फुल्टु चंगळ असायची, मी आपला ४ दिवस पैसे साठवुन मग एकदा एग-बिर्याणी खायचो.च्यायला, इतक्या साध्या गोष्टीतही आनंद मिळायचा. आता पंचतारांकित हॉटेलांत ( ते स्वखर्चाने की कंपनीच्या ? असले पाण्चट प्रश्न विचारणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो ) तंगड्या तोडुनही तो आनंद मिळत नाही, खायचंय म्हणुन खातो. डझंट म्याटर यार. व्हॅट डझंट मॅटर ? द बिल ? ऑर द फिलींग्स ? नथिंग मॅटर्स नाऊ !
नाऊ द लाईफ हॅज बिकम लाईक अ ब्रेड-बटर. डेली इट लुक्स सेम, डेली इट टेस्ट्स सेम अँड द मोस्ट इंपॉर्टंट थिंग इज आय डोंट एंजॉय इटिंग इट. व्हाट द फक इज गोईंट ऑन ?
पैसा येतो जातो. क्षण फक्त जातात. आयुष्यातले दिवसही असेच चाललेत. आणि माझ्या कडे त्यांना जाताना पहाण्याशिवाय आणखी काहीच ठेवलेलं नाही. आला दिवस उठतो मी , दिनचर्या आटोपुन ऑफिसात पाट्या टाकतो मी. दोन चार साईट्स वर विरंगुळ्याचे क्षण शोधायचो (आता त्याचाही कंटाळा आला , आय क्विट !) जगण्यासाठी खावं लागतं. काय खातो ह्याला अर्थ नाही,  खायचं म्हणुन खातो. पचवण्याचं काम ऑटोमॅटिक आहे. आणि स्वतःला निद्रेच्या हवाली करतो मी. व्हाट इज माय अचिव्हमेंट ऑफ द डे ? डू आय फाईंड अ सिंगल मोमेंट विच इज अ डे वर्थ ? नो, अ‍ॅब्सोल्युट्ली नॉट !! आय मिस द फन बडी !
पैसा पैसा पैसा !! डझंट मेक माय मुड नाऊ. लवकरंच मी एक तथाकथित मोठी नावाजलेली मल्टिनॅशनल कंपनी जॉईन करतोय. पगार आधीपेक्षा दुप्पट. पण आनंद शुन्य. काहीच एक्साईटमेंट नाहीये. कॉलेजात असतांना जर ह्या कंपनीत नंबर लागला असता तर मी गावजेवण घातलं असतं, हत्तीवरुन साखर वाटली असती, घराला पुर्ण लायटिंग करून दिपोत्सव साजरा केला असता. आता मित्रांना फक्त फॉर्म्यालिटी म्हणुन पिंगवत .. "बाबारे इकडे जॉइन करतोय " बास !

थँक्स टू माय बडीज! आय स्टिल फाईंड माय फन विथ देम. बाप्या-नर्‍या-प्रदिप-योग्या-निल्या-आज्या-कावर्‍या-बोरक्या हीच आमची बडीलिस्ट. नाही म्हणायला मित्र भरपुर आहेत, अगदी दिप्या-कुक्की सारखे संकटमोचन मित्रही आहेत. पण ते त्यांच्या लाईफ्स मधे बिझी झालेत.
पण जेंव्हा जेंव्हा मित्रांना भेटतो , दंगा करतो तेंव्हा टाईम मशीन नक्कीच उलटी फिरते. पुन्हा एकदा मी त्या वेव्हज वर सर्फिंग करुन आपला मनमुराद आनंद घेतो. कॉलेज आधीचं आणि नंतरचं लाईफ ह्यात काय फरक आहे हे मी सांगण्याची गरज नाही.
हे छोटंस स्फुट ... आयुष्य स्टेप-बाय-स्टेप बदल रहातं.
"चेंज इज द ओन्ली थिंग इन लाईफ विच इज  कॉन्स्टंट . "

12 comments:

Narendra said...

ditto feelings for me :)
There is no fun these days in life except when we meet to old buddies...

स्वप्निल दगडे said...

मित्रा, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्या !!!

निशा............ said...

सुप्पर....

मी पण कधीकाळी हेच सगळं काही वर्षांपुर्वी माझ्या डायरीत आणि दोनेक वर्षापुर्वी तिथून निवडक पानं ब्लॉग वर टाकली....

अगदी हेच हेच.. की पुर्वीसारख्या गोष्टी मनाला स्पर्श का करत नाहीत.....

वेल.. हे असं वाटण्याचे दिवस ही जातात... अनुभव आहे.... :)

BTW... मिसळपाव वर तीन चार दिवस तुमची कॉमेंट वाचण्यात आली नाही... सोडलीत की काय?

असं नका करू... माझ्यासारखी बरीच मंडळी लेखांबरोबर त्यावरच्या मनोरंजक प्रत्रिक्रिया वाचण्यासाठी तिकडे जातात... त्या मनोरंजक प्रत्रिक्रिया लिहीणा-यांपैकी तुम्ही एक....

ही एंट्री तिकडे पण टाका....

Unknown said...

@नरेंद्र आणि स्वप्निल , प्रतिक्रीयांबद्दल धण्यवाद दोस्तांनो :)

@ निशा : काही कारणास्तव माझा मिसळपाव वरचा आय.डी. बॅन केलेला आहे. आमच्या गोंधळाने लोकांना त्रास होतो असा म्याणेजमेंटचा समज आहे. त्यामुळे ही पोस्ट तिकडे टाकता येणार नाही. माझ्यासारखा मी एकटाच नाही हे कळुन आणंद झाला :)

- टारझन
लिहीत जा लिहीत जा | ब्लॉगप्सॉटच्या बाईट भरवत जा ||

निशा............ said...

हा...हा....

काही लोक फार रडे असतात हो.... कुणी काही म्हटलं की...रडत रडत तक्रार करायला जातात.. जशी काय अजून शाळेत च आहेत...

कंपूबाजी, टिका झेपत नाही तर आंतरजालावर लिहू नये ना... वाचनमात्र राहावे.... फारच खुमखुमी असेल लिहायची तर ब्लॉग काढावा... माझ्यासारखे :))

मला माहिती आहे...मला झेपणार नाही निष्फळ चर्चा करणे...वादावादी घालणॆ....वेळ पण नसतो फार. मग मी येते... वाचते..आनंद घेते...निघून जाते...

असो... आय विल मिस युअर फनी कॉमेंट्स ऑन मिसळपाव डॉट कॉम!!!!

सुshant said...

अरे तुझा आयडी बंद आहे हे कळल्यावर मला दु:ख झाल्,अरे खरच दु:ख झाल(पण मी गालातल्या गालात का हसतोय?)..........असो.
पण एवढ काय झाल?
काळ्या बॅकग्राउंडवर सफेद अक्षर लिहलेली कशी आवडतात तुला? वाचताना डोळ्यांना त्रास होतो.
बाकी इथेही(की इथेच म्हणाव?) लिहत जा.मी साईट अपडेट्स बघायला येत जाईन.
बाकी तु जे कंटाळायच लिहत आहेस ते मी ४-५ वर्षापासुन अनुभवतोय.मला कोणीही मित्र नाही जो मला हव तेव्हा भेटेल,फक्त फोनवर बोलतो,कामाचच!
माझे चिक्कार मित्र आहेत्/होते.पण मी त्यांपासुन आता दुर रहतो,काही फरक नाही पडत्,लफडे पण होत नाहीत.कधी भेटायला आले की कटवतो सर्वांना.
ह्य एकटेपणापासुन दुर रहाव म्हणून पियायला लागलो तर आता त्यात पण मजा नाही म्हणुन 'रोजा' बंद केला.
काही मित्र जिवापाड काळजी घेतात म्हणून त्यांना धरुन आहे.
>>
स्वाक्षरी वाचण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा
खीखीखी......I won't say come back soon,because it's not upto you,right? hahaha
भेटु!

Meenal Gadre. said...

अरे, दिवस बदलत राहतात. लहानपणी झांजा वाजवणारा जोकर पाहून पण बोळकं पसरून हसत असशील.
तेच आता करावे असे वाटत असेल तर तशी निरागसता हवी.
वयाप्रमाणे तीच बदलते. आपण व्यक्ती तीच असते. पण सर्वच काही बदलते.

Unknown said...

निशा : हा हा हा मला कंपुबाजीची गरज पडली नाही :) मी आपला एकटाच दंगा करायचो. असो त्याबद्दल आता अधिक बोलणे व्यर्थ आहे. आमचा फॅनक्लब मिपा बाहेरही आहे , हे कळुन हुरळुन गेलो आहे. आज कोंबडं कापु =)) ( नाही नाही जालिय कोंबडा कापणे बंद केलं आम्ही आता , खरा कोंबडा घेऊन या रे )
उर्मी : सहमत आहे. अशी निरागसत कळते पण वळत नाही प्रकारात असते. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.

@शाणबा५१२ : आपल्या अज्ञानात आपण सुखी आहात , सुखी रहा :) बाकी प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.

सुshant said...

je lihal aahe te aamach adnyaan?
हे माझ अज्ञान की अजुन काही?
अरे बस काय्,भावनांची खिल्ली काय उडवतोस.मीठ असतानाही आम्ही फक्त मसालाच चोळला हो जखमेवर Smile
आणि सांग ना काय झाल ते,मजा येइल वाचायला.
बाकी खुप आगाउगिरी करत होतास हे तुला मान्य करावेच लागेल.पण अस 'बंद करण' नाही आवडल! Smile)
मी तुला व्यनी करायला म्हणुन नावावर क्लीक केल तर तु भुर्र झालेलास.मला वाटल इटलीत आहेस की काय तु संपादकांना सांगितलस खात बंद करायला,काम आहे म्हणुन..........नंतर सर्व कळल.
असो...........बाय.
इथे 'चित्र कस चढवायच व सदस्यनाम कस बदलायच?" खीखीखी............संपादकांना विचारु का? आता पळा!.........खीखीखी!

अरे तिथे मिपावर बघ काय झंपरगीरी चालु आहे,तु गेलास म्हणून लेख काय लिहतायत 'परत परत ये' बोंबा काय मारतायत.........नाटक नुस्ती!

- 'परत ये' अस ज्याला 'ली' पण नाही म्हणाली असा!
आणि म्हणुन जळकांडा आहे असा ज्याचा बबातीत गैरसमज आहे असा
बाय डीफॉल्ट सहमत शानबा.

(now,if you dare to reply me...........please do something to be there again............thank you!)

Unknown said...

शाणबा बाळ , तुला शी ला होत नाहीये का ? असा कुंथल्यासारखा काय करतोयस ? थोडं एरंडेल तेल घे आणि कच्च्या अंड्यांमधे मिक्स करुन घे रात्री. तुझा त्रास बघवत नाही रे =))

YoginiR said...

So true buddy...nice blog again...
Philosophically thinking...u cant have fun all the time in life, there comes a time like this when u have to keep the fun aspect behind u & live with those memories. If u want to continue the fun then think about what u wud like to do for a living if not work in IT industry...

अजित said...

Nice blog, Pratek software engineer chya manatla lihilas tu...