Friday, April 23, 2010

रसग्रहण - सुपरहिट गाणी !

णमस्कार्स मंडली ,

सहजरावांबरोबर चर्चा करता करता सुचलेला एक विषय ... आपली बॉलीवुड परंपरा अतिशय महान आहे. मनोरंजणाचा अनलिमिटेड खजाणा आहे.

दलाल : मिथुन च्या एका अप्रतिम हिट चित्रपटातलं हे गाणं म्हणजे क्या केहने ? सुनते ही बात बनती है ..
"चढ गया उपर रे ... अटरीया पे लोटन कबुतर रे ... गुटूर गटूर ..."
व्वा !! ज्या कोणी लिहीलंय त्याने कसं एखाद्या बैठकीला लिहीलंय ... "चढ गया उपर रे ... "  मधे जो यमनाचा सुर लागतो त्यावर मिथुन ने तितक्याच ताकदवर नृत्याभिनयाने शब्दाशब्दाला दाद दिली आहे. आणि त्यानंतर "अटरीया पे लोटन का कसला तरी कबुतर म्हणजे खल्लासंच ! शिवाय "गुटूर गुटूर " हा कोरस सदृष पदार्थ तर लाजवाब .

हिरो नंबर १ : ह्यात खरं तर एकसे बढकर एक गाणी. तसंही नाईंटीज मधे गोविंदावर पिक्चराईझ झालेल्या गाण्यांना तोडंच नाही. गोविंदाला दिलेलं ड्रेसिंगही खास असे .. लाल शर्ट , पिवळी पँट (आजवर आम्ही फक्त गोविंदा आणि द मास्क लाच पिवळ्या पँट मधे पाहिला आहे )  ... गाणं काहीसं असं होतं
मै तो रस्ते से जा रहा था ..
भेल पुरी खा रहा था ...
तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू ?

फक्त एकंच प्रश्न पडला .... रस्त्याने चालता चालता अशी भेळपुरी खाता येते ? बर खातोय गोवींदा ... आणि त्या करिश्माला मिर्ची कशी काय लागली ? बरं लागली तर लेका तुझी हिरॉइन आहे ना ती ? तुच "मै क्या करू ?" म्हंटला तर कसं होणार?  (नाही तसं करिश्मा म्हंटलं की बरेच स्वयंसेवी कार्यकर्ते "काहीही" करायला तयार झाली असती म्हणा )  पण ह्या गाण्याचे लिरिक्स इतर कोणत्याही गाण्यापेक्षा केवळ अर्थपुर्ण नाही तर रियलॅस्टिक आहेत.  उगाच चंद्र-तारे तोडुन आणन्याच्या कवीकल्पना नाहीत .. किंवा "तेरे लिया सारी दुनिया छोड जाऊंगा " सारखी डोकेफिरू आशिकी नाही....  किती डाऊन टू अर्थ ?

गुलाम : तसं पाहिलं तर हा आमचा त्यावेळचा सर्वांत आवडता चित्रपट. अमिर खान अ‍ॅक्टिंग मधे तगडा आहे ह्यावर कोणाचंच दुमत नसेल (जसं प्रा.डॉ.दिलीप कुमार बद्दल आहे). ह्या चित्रपटातलं एक गाणं ..
"ए क्या बोलती तु ? .... "  इतकी जबरस्त स्टाईल .. आणि त्यात इतका इंटेलिजंट प्रश्नं विचारावा ?
मग त्यावर लाडकी हिरॉइन " ए .. क्या मै बोलू" असं लाडिक उत्तर न देईल  तर कसे ?
नायकही पहा कसा मौका पाहुन चौका मारतोय .. " आती क्या खंडाला ? " बरं आता हिरॉइनीने मंद असलंच पाहिजे का ? ती म्हणते .. "क्या .. करू ... आके मै खंडाला ? "   अगं बाई .. .तो तुला इंदिरा आवास योजना किंवा जवाहरलाल नेहरु ग्रामरोजगार योजने अंतर्गत वीटा वहायला नाही गं घेऊन चालला ...  असो .. कायम लक्षात राहाणारं अफलातुन गाणं

आंखे : गोविंदा बाबुंचंच एक गाणं आठवलं .
"अंगना मे बाबा ... द्वारे पेमा ... कैसे आये गोरी हम तोहारे घरमा " 
कॅन यु इमॅजिन .. ? हिरॉइनीचा पप्पा अंगणात पत्ते कुटत बसलाय ... आणि दरवाजावर आई रंग घेऊन नेमप्लेट बनवते आहे "श्री.आगणे बाबा आणि सौ. द्वारका " .... आणि अशा ह्या कायम घरी पडिक असलेल्या आई-बापाच्या पोरीवर गोविंदाने प्रेम करावे ... तिला भेटणार कसा हा ? किती गहन प्रश्न किती सहजतेने माडंला आहे ? नाही ?


दाग- द फायर :एक महिमा चौधरी आणि संजय दत्तंचं गाणं .. आता 'सिवाजी - द बॉस' , 'हिरो - द नायक' , 'तात्या - द मालक' , 'टार्‍या - द हिणकस' सारखं  "दाग" आणि "द फायर " चं काय रिलेशन आहे ? असला अतिमहामुर्ख प्रश्न विचारायचा नाही.
"ओ निले आखोंवाला ... तेरा लकी कबुतर
पिये इश्क दा प्याला .. तेरा लकी कबुतर"

आता निळ्या डोळ्यांचं कबुतर असतं का ? असा वैचारिक प्रश्नं विचारायचा नाही .. हे म्हणजे आणासपुर्‍या म्हणतो तसं " धु म्हंटलं की धुवायचं .. उगा काय लोंबतंय ते इचारायचं न्हाई " .. असो .. तर हे निले आखो वाला कबुतर .. तो ही महिमा चौधरी चा ? पहा काय महिमा आहे (हिला स्वतःला लक ची आवश्यकता होती .. तीला मिळालं नाही .. पण कबुतर लकीच) .. तसा सुरुवातीला काही अर्थबोध होत नाही .. पण दुसरं वाक्य आलं की पुर्ण अर्थ कसा गंगाजळाप्रमाणे क्रिस्टल क्लियर होतो.

खलनायक : संजुबाबा संजु चा हा चित्रपट कोण विसरेल .. साला आम्ही लै लहान होतो त्यावेळेस.. आणि आमच्या घरी टिव्ही पण नव्हता... तेंव्हा शेजारच्या आंटींना प्रश्न विचारला होता... तिने पुन्हा घरी टिव्ही पाहु दिला नाहीच .. उलट घरी तक्रार केली .. च्यायला माझं काय चुकलं म्हणुन मी बरेच दिवस खाजवत होतो ... डोकं.. असो .. गाणं काहीसं असं आठवतंय ..
"कुक कुक कुक कुक कुक कुक कुक ..... चोली के पिछे ... चोली के पिछे ... (एन टाईम्स) "
वं बाई जे काही आहे ते एक किंवा दोनंच असेल .. किति वेळा ? किती वेळा ? आं ? कोण्या एलियन ने लिहीलंय हे गाणं ? तर ते "कुक कुक कुक कुक " हे गाणं आमच्या गावी कोंबड्यांना परत बोलावण्यासाठी खुराड्यात डालन्याव्या वेळेस वाजवले जाण्याचा प्रघात होता. चोली के पिछे क्या है ? हे मात्र परिस्थिती नुसार बदलु शकतं .. ह्याला एकंच स्टॅटिक उत्तर कसं देता येईल ? आता जर चोली हँगर ला इस्त्रि करुन लटकवली असेल तरी तिच्या पिछे हिचं दिल कसं असु शकेल ? असो ..


राजाबाबु : गरिबांच्या मिथुनचं अजुन एक गाणं ते ही लाडक्या करिश्मा बरोबर. ऐन हिवाळ्याची वेळ ... गरिब घराण्यातली हिरो-हिरॉइनी ... (त्या काळी भिकेला लागले तरी महालात राहून फॅशन करण्याची "तारा रम पम" गिरी परवडायचीच नाही म्हणा )
"सरकाईल्यो खटिया जाडा लगे "
हिरो हिरॉइन कडे फक्त वन रुम झोपडी असल्याने हे अंगणात झोपायचे. आता त्यावेळी काही ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या नव्हती. आपली पृथ्वी हिरवी गार होती. ओझोनच्या थराला बिळ पडलेली नव्हती. अर्थात ... थंडी फारंच बोचरी पडे. हिरो हिरॉइन बाहेर झोपल्याने त्यांना मच्छरही फार चावत असावेत. त्यात यांच्याकडे एकंच गोदडी असल्याने एक सुंदर उपाय सुचवताना गोविंदा किती निरागस पणे करिश्माला म्हणतो .. सरकायल्यो खटीया जाडा लगे .. आणि त्याचं हे प्रेम किंवा समंजसपणा पाहुन तीही "जाडे मे बलमा प्यारा लगे " म्हणुन परतफेड करते.
अफलातुन गुढ खुल अर्थ असलेलं गाणं ..


आवरता हात घेतो... कारण गाणी तर खुप आहेत .. पण आमचा स्टॅमीना तेवढा नाही. आणि तसंही आम्हीच सगळं लिहीलं तर प्रतिसादात पब्लिक काय लिहील ?

- (लिरिक्स रायटर) कावेत अस्तर

तळ टिप : लेख लिहीतांना गाणी आणि माहिती पुरवल्याबद्दल सहजरावांचे आभार. ह्या निमीत्ताने त्यांच्या समर्पण कपाटात आमच्याकडनं पण एक लेख.

2 comments:

अजित said...

Hmmm... Hi gani mhanje hindi cinemanchi ek vegli olakh aahe... :)
Mazya tarfe ek gana....
Tuze aksa beach ghumadu, aa chalti kya.......... :D

Mahesh M said...

अगं बाई .. .तो तुला इंदिरा आवास योजना किंवा जवाहरलाल नेहरु ग्रामरोजगार योजने अंतर्गत वीटा वहायला नाही गं घेऊन चालला ... 1no bhau.........