वयाच्या पाचव्या वर्षापासून तिला पोलियो झालेला. वडील कर्मठ आणि सनातनी होते . त्यांचा आदेश होता , कोणीही कसल्याही एलियोपथीची औषधं घ्यायची नाहीत. त्यांच्या या हट्टापायी तिचे आधीची तीन भावंड गमावली होती , परंतु "देवाची इच्छा" , "गेल्या जन्मीचे भोग" अशी वडिलांची ठाम समजूत. वडिलांच्या शब्दापुढे घरात कोणाचं काही चालायचं नाही. हिचा पोलियो दिवसेंदिवस वाढत गेला. नियतीचे दुर्दैव असे की ती १८वर्षाची होई पर्यंत वडील वारले. जास्त काही मागे ठेवलं नव्हतं. थोडंसं सोनं , राहतं घर आणि कोकणात थोडीफार शेती , त्यातूनही काही उत्पन्न होत नसे. कोणालातरी कसायला दिली तो वर्षाला २०हजार टेकवी.
आईने खानावळ सुरु केली. इन मीन ५ मुलं जेवायला येत. त्याची तिची भेट घडली जेंव्हा तो खानावळीत आला आणि तिने त्याला वांग्याची भाजी वाढली. तो खानदेशातला , पुण्यात कॉलेजात शिकायला आलेला. रात्री कुठेतरी कामावर जाऊन पैसे कमवायचा. घरचं खानं हवं म्हणून खानावळ लावली. वांग्याची भाजीच्या वासाने तो टर्न अप झाला. "अजून वाढता का ? " त्याने ताटात बघतच तिला अजून भाजी वाढण्याची विनंती केली . ती लंगडतच वळली , भाजी वाढली आत गेली. "अजून भाजी मिळेल काय ? " तो पुंन्हा खाली बघूनच बोलला. तिने जवळपास ५-६ वेळा त्याला काहीही तक्रार न करता भाजी वाढली . तिचे लंगडने तो बघत होता.
वेळ गेला तसा दोघांचा संवाद वाढला. लोकं येत जात राहिली , हा मात्र खानावळीशी प्रामाणिक राहिला. नाही म्हणायला त्याची तिची नजरानजर होत असे. तशी ती दिसायला सुंदर होती , गोरीपान काया , लांब नाक , काळेभोर केस , वक्राकार शरीरयष्टी... तिच्या पायाचा प्रोब्लेम नसता तर कोणत्याही युवराजने तिला मागणी घातली असती.जेवणात वांग्याची भाजी असली त्याचा चेहरा फुललेला असे. आणि त्याचा तो फुललेला चेहरा पाहायला तीही आतुर असे. बऱ्याचदा त्याच्यासाठी ती पेशल वांग्याची भाजी बनवे
एक दिवस तो तिच्या आईला बोललाच ! तिच्या आईला मुलीच्या भावना समजत नव्हत्या असं नाही. पण या संसाराचं पुढे कसे होणार ? ही अशी.. ट्रेक्टरची दोन चाकं जर एकाच त्रिज्येची नसतील तर तो चालेल कसा ? पण त्याने तिच्या आईला कन्विन्स केलं. त्याचे आई-वडील नव्हते त्यामुळे बाकीचा काही प्रॉब्लेम नव्हता.
यथावकाश लग्न झालं. सुरुवातीचे काही दिवस फार मजेत गेले. तो तिला फिरायला नेई. बऱ्याचदा उचलून घेई. त्याचे शिक्षण वगैरे पूर्ण होऊन त्याला नोकरीही मोठ्या पगाराची लागली होती. ती त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याने बरीच प्रगती केली. कोणाची नजर लागावी असा त्याचा तिचा संसार चालू होता. पण नजर लागलीच.
लग्नानंतर ती जास्त काम करत नव्हती. आठवड्यातून ५ दिवस डॉमिनोज , म्याकडोनल्ड , वगैरे होत असे , कधी वैशाली तर कधी गंधर्व .. पुण्यात हॉटेलांचा तुटवडा का आहे ? तिचे खाणे वाढत होते. आता फिरायला नेताना त्याला तिला उचलणे अशक्य होते. तिने वजनाची सत्तरी पार केली होती. तिचे काळेभोर केस तिने कापून बॉबकट केला होता , तिच्या गोऱ्यापान त्वचेवर मेकअप च्या सामने एलर्जी उठली होती. कमनीय अंतर्वक्र फिगर आता बहिर्वक्र झाली होती. दोघांची आता वरचेवर भांडण होऊ लागली . तो ऑफिसातून आता अजूनच उशिरा येऊ लागला. रात्री १२-१ ला भांडणाच्या आवाजाने शेजार्यांची झोपमोड होऊ लागली. व्हायचं तेच झालं. त्याने तिला माहेरी पाठवायचा निर्णय घेतला , तिनेही आता परत न येण्याचा निर्णय घेतला आणि त्याच रात्री ती घरी निघून गेली .
तिची आई आता आजारपणाने खंगली होती. काय बोलणार बिचारी. फोनवरच त्याने तिला घटस्फोटाची बातमी दिली. पण त्या पेपर्स वर सही घेण्यासाठी त्याला तिच्या घरी जावे लागले. तो घरी गेला. जेवायची वेळ होती . तोच ... तोच त्याला तो ओळखीचा वास आला , आज वांग्याची भाजी होती. तिने त्याला वांग्याची भाजी वाढली , तेंव्हा त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो दवणीय झाला होता . त्याने सात-आठ वेळा वाण्याची भाजी मागितली . मागचा काळ त्याच्या डोळ्यासमोरून जात होता. ती जेंव्हा जेवत होती तेंव्हा तिच्या लक्षात आलं , अरे आज भाजीत मीठ नाही .. आणि हा काही बोललाही नाही. एक वेळ भाजीत केस झुरळ पाल पडली तरी त्याला चालायचं , पण मिठ कमी पडलेलं त्याला चालायचं नाही , आणि आज त्याने चक्क निमूटपणे खाल्लं ? दोघांचे ही डोळे पाणावले होते. वातावरण दवानीय झालं होतं. त्याने घटस्फोटाचे पेपर फाडले आणि तिला घट्ट मिठी मारली होती. वांग्याच्या भाजीमुळे ते परत एकदा एक झाले होते. .
नाही , खरंतर त्याचे अश्रू भाजीत पडल्यामुळे भाजीला चव आली होती.
No comments:
Post a Comment