काल स्त्रीहट्टापुढे गुढगे टेकवत "मीनेस्क्युल - हरवलेल्या मुंग्यांची दरी" ( शब्दश: भाषांतर ) पाहायला गेलो. तसा पूर्वी प्रोमो वगैरे पाहिलेला , पण चित्रपट लै भारी असेल असे काही वाटले नव्हते. किंवा त्याच्यावर दोन शब्द खरडायची तसदी घेईल असेही नाही. अंमळ बादलीभर पॉपकॉर्ण आणि टिपाडभर सॉफ्टड्रिंकची सेटिंग लावून सीटवर बसलो. चित्रपटाच्या सुरुवातीला एक कपल एका अतिशय निसर्गरम्य अशा जागी निवांतक्षण घालवत वोडकाचे दोन पेग घेत वेळ घालवत असतं. बाई प्रेग्नंट असते. अचानक तिला आतून काहीतरी जाणीव होते आणि तिचे यजमान तत्काळ तिला गाडीत बसवून रवाना होतात . जाताना पार्टीसाठी आणलेला बराचसा सामान मागे ठेवून जातात. मी चित्रपट एनिमेशन प्रकारातला आहे हे समजून होतो आणि इथे अजून कसलाच एनिमेशनचा प्रकार दिसत नाही आणि दिसेल अशी कुठे अशाही नाही. पण तरीही ते मनमोहक दृश्य पाहून मी मात्र सुखावलेलो .
ते कपल गेल्या नंतर खरी मजा सुरु होते. वेगवेगळ्या प्रकारचे कीटक माश्या वगैरे पार्टीच्या सामानावर तुटून पडतात. जो तो आपल्या वजनाच्या १००००० पट वजनी वस्तू उचलून पळवून नेण्याच्या मागे असतो. प्यारलली दुसरीकडे चित्रपटाच्या हिरोचा जन्म त्याच्या दोन भावांसोबत झालेला असतो . हा हिरो म्हणजे एक रंगीत आकाराचा किडा. आता हा किडा असल्याने त्याच्यात मुळातच किडे असतात , आणि त्या कारणाने तो त्याच्या फ्यामिली पासून दूर होतो आणि या पार्टी स्पॉट मधल्या एका डब्यात जाऊन लपतो.या डब्यात शुगरक्युब्ज असतात. या डब्याला ८-१० काळ्या मुग्या आपल्या वारुळाकडे घेऊन जातात .
वाटेत या किड्याची आणि मुंग्यांची दोस्ती होते. वाटेत लाल आणि क्रूर विलन मुंग्या दिसतात. काळ्या मुंग्यांचा सरदार त्याला एक शुगर क्यूब देतो पण त्यामुळे ते रागावतात.वाटेत पाठलाग करताना बरीच धमाल येते . काळ्या मुंग्यांचे कमालीचे टीमवर्क दाखवताना दिग्दर्शकाने इम्याजीनेषण आणि स्पेशल इफेक्टचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. नंतर हा हमला थेट काळ्या मुंग्यांची टीम विरुद्ध लाल मुंग्यांची टीम असा होतो . त्यात आपला किडा कशा प्रकारे त्यांना मदत करतो वगैरे पडद्यावर बघण्यात मजा आहे . हा चित्रपट चुकुनही टोरंट वर डाऊनलोड करून पाहू नये. हे चित्रपट मोठ्या स्क्रीन वर बघण्यात मजा आहे . शून्य संवाद आणि फक्त किड्यांचे गुंजन आणि भुणभुण यातूनही एखाद्या सुपर डायलॉग वाल्या चित्रपटाच्या कानाखाली मारेल असे मार्मिक चित्रीकरण यात आहे. शक्यतो मला चित्रपटात चुक्या आणि कमी काढायला आवडते पण यावेळी तसा काही स्कोप नाही .दिलखुश चित्रपट .
जमल्यास पहा :)
No comments:
Post a Comment