आम्हाला अनु मलिक कळले ते असा संगीतकार म्हणून की ज्याचं संगीत इतकं महान आहे की कोणी महान संगीतकार ते आधीच चोरतो म्हणूनच . लहानपणापासून जसं घरी इंटरनेट आलं तसा आम्हाला इंग्रजी गाण्यांचे लिरिक्स डाऊनलोड करून तोंडपाठ करण्याचा छंद जडला . याला कारण म्हणजे इंग्रजी गाण्यांचे विडीयो. तर ते असो. अनु मलिक आणि माझी ओळख तशी काही डायरेक्ट नाही . नाही म्हणजे मी त्याला ओळखतो, पण तो मला ओळखत नाही.
बाजीगर मधली त्याची कलाकृती "मै मिला तू मिली .. तू मिली मै मिला .. दुनिया जले तो जले ..." यासारखा अफलातून प्रकार मी आजतागायत कोणत्या बडबडगीतात देखील कधी ऐकला नाही. "अरे बाबा अरे बाबा करे क्या दिवाना .. लडका जब भी लडकी देखे गाये यही गाना " या अन्नू मलिकच्या गाण्याला मकारेना वाल्यांनी आधीच चोरलं होतं . मला नक्की आठवत नाही , पण बर्याच स्पानिश , इंग्लिश आणि काही काही तर म्हणे जपानी संगीतकारांनी अनु मलिक च्या धून आणि कम्पोजीषण चोरी करून ग्र्यामी वगैरे जिंकलेल्या आहेत .
उंची है बिल्डींग .. लिफ्ट तेरी बंद है ... वगैरे गाण्यांनी अन्नू मलिक च्या संगीतज्ञानाची उंची कळते . तो चिरका भसाडा आवाज ऐकला की खुद्द ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्यामुखी वेद वदवले ती घटना पुराणातली वांगी नसून खरी आहेत हे मनोमन पटते .
अन्नू मलिक चा अजून एक वाखाणण्या सारखा गुण म्हणजे त्यांचे परम शिष्य मा.प.पु. नवज्योत सिंग सिद्धू जे आपल्या ताबडतोड शायरी साठी प्रसिद्ध आहेत , त्यांची खरी प्रेरणा अनु मलिकच.
अनु मलिक चा अजून एक बोनस गुण म्हणजे , तो एक उत्तम जज/ज्युरी आहे. 12 Angry Men (1957) , इंडियन आयडॉल , एंटरटेनमेंट के लिये कूच भी करेगा ,India Got tallent , आप की अदालत वगैरे सारख्या मालिकांतून उत्तम जजमेंट दिल्याबद्दल त्यांची शिफारस खरं तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून व्हायला हवी . पण अन्नू मलिकला कधी तो डिजर्व करतो ते मिळालंच नाही , ही त्याची नाही तर भारतीयांची शोकांतिका आहे .
बऱ्याच जणांना अनु मालिक विषयी अजुन एक गोष्ट माहिती नसेल. माझे एक दूरचे काका सान्ताक्रुजला राहतात, त्यांचं फिल्मसिटी मध्ये येणं-जाणं असतं. ते सेट वर दुधाच्या पिशव्या , केळ्याचे गड , ब्रेड-बुरून-बनपाव वगैरे पुरवायच काम करतात . त्या काकांनी सांगितलेला किस्सा . अनु मलिक ला ५ केळी , एक ब्रेड चा अख्खा पुडा , दुध आणि वरून अमूल बटरचं एक अख्ख पाकीट एकत्र काला करून खायला आवडतं. त्याच्या हाताची बोटं इतकी मोठी आहेत की महिला ज्या बांगड्या हातात घालतात त्या बांगड्या अनुच्या बोटात बसतील. अनु हार्मोनियमची २-३ बटनं एकसाथ दाबतो . तबल्याची कितीतरी पानं अनुच्या बोटांनी हाय खाऊन फाटलेली आहेत.
खरच , एवढं असूनही अनु खूप डाऊन टू अर्थ आहे असे माझ्या त्या दूरच्या काकांचे मत आहे . अनु मलिक ला शतश: प्रणाम .
No comments:
Post a Comment