बॉलीवूड चित्रपटांत बरेच फंडे फारच ठरलेले असतात.पूर्वीच्या काळी व्हिलन हिरोच्या लहानपणी त्याच्या मात्या-पित्याचा खून करणार मग हिरो मोठा होऊन त्याचा बदला घेणार. त्यातही कहाणी में ट्वीस्ट म्हणून हिरोईन कधी विलन च्या बाजूने होणार तर तिला अचानक काहीतरी गुपित माहिती होणार ज्यात व्हिलनच तिचा खरा व्हिलन आहे हे कळणार , मग ती हिरोला मदत करणार. त्यातही हे परत व्हिलन ला कळणार मग तो हिरोईनच्या आईला किडन्याप करून एका खांबाला बांधून ठेवणार. ८०-९० चे दशक हे बॉलीवूड मध्ये "बदला दशक" म्हणायला हरकत नाही. यात गुंडा सारखा अप्रतिम बदलापट आपण पाहिला. चित्रपटात जर "पाप रणजीत" सारखे महानुभाव असतील तर हिरोच्या बहिणीवर एखादा अतिप्रसंग फिक्स. किंवा मग एक फ्यामिली मेलोड्रामा. बिंदू, कादर खान , बाबूजी अलोक नाथ , अजित वाच्छानी , रीमा लागू , मोहनीश बैल , अर्चना पुरणमासी , अनुपमखेर वगैरे मंडळींनी त्याकाळी हे रोल करून खूप छपाई केली. पण अलीकडे हे फंडे आउटडेटेड झाले. कालानुरूप त्यात बरेच बदल होत गेले. पण एक फंडा अजूनही चालूच आहे आणि तो अनंतापर्यंत चालूच राहील...
गाणी बॉलीवूडचा आत्मा. ज्या चित्रपटांत प्रेमाचा त्रिकोण असतो , त्या चित्रपटांत एखाद दुसरं गानं इंडायरेक्ट रेफरन्स वालं असतंच असतं. यात १ हिरो २ हिर्विन्स किंवा २ हिरो एक हिर्विंस किंवा २ हिरो २ हिर्विन्स इन क्रॉसलिंक या प्रकारात बऱ्याचदा हिरो हिर्वीनचे जुणे किंवा छुपे संबंध असतात, पण काही ट्रेजीडी मुळे कनेक्शन व्यवस्थित बसलेलं नसतं. वायरमनच्या भाषेत अर्थिगला पाझीटिव्ह वायर लावल्यासारखं काहीतरी. तर हे सांगायचे कसे ? त्यांची कुचंबना सांगायची कशी ? मग त्यासाठी गाणी अल्टीमेट प्ल्याटफॉर्म असतो. कृष्णधवल जमान्यापासून चालत आलेला हा फंडा अलीकडेच आलेल्या स्टुडेंट ऑफ द इयर सारख्या चित्रपटातही पाहायला मिळतो. अगदीच निवडक काजू वेचायचे म्हटले तर काही गाणी चटकन समोर येतात ..
दिल के झरोके
क्या हुवा तेरा वादा .. वो कसम वो इरादा ( हम किसी से कम नही )
तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है ( दिल है के मानता नही )
मेहँदी लगा के रखना डोली सजा के रखना ( DDLJ )
सांवलीसी एक लड़की ... ( मुझसे दोस्ती करोगे )
..
चिक्कार गाणी आहेत. सांगायचा मुद्दा असा , या गाण्यांच्या वेळी सगळी सच्चाई ओरीगिनल हिरो , हिर्वीन आणि प्रेक्षक यांनाच माहित असते , तो कबाबमें हड्डी या प्रकरणापासून अंजान असतो. आणि एवढी स्पष्ट रेफरन्स देऊन केलेली गाणी , हातवारे , या दोघांचे एक्स्प्रेशन इत्यादी पाहून त्यात आता लपवण्यासारखे काही नाही असे होते. हा सूर्य हा जयंद्रथ इतकी परिस्थिती झाल्यावर प्रेक्षकांचा मानसिक चोळामोळा होतो . आता हे भांडे फुटल्यावर पुढे काय होणार म्हणून बऱ्याच प्रेक्षकांच्या ब्ल्याडर वर ताण येतो... थोडेसे बेचैन होते , पण या सगळ्यात ते "कबाब में हड्डी" क्यारेक्टरला याचा थांग पत्ताही लागत नाही .. किडन्यापिंग , रेप , खून , बदला , अदलाबदली वाले फंडे कालबाह्य झाले .. पण गाण्यांचा हा फंडा अनंतापर्यंत चालणार ..
खास हे फंडू गाणे :
No comments:
Post a Comment