णमस्कार्स लोक्स ,
शिर्षक वाचुन एकदम अमिर-सलमान-परेश रावल समोर उभे राहिले की नाही ? अगदी !! ज्याला "अंदाज अपना अपना" आवडला नाही असा एकंही जण मला भेटलेला नाही. आज पर्यंत ६० वेळा तरी हा पिक्चर पाहिला असेल. नंतर तर काऊंटिंग विसरलो.
मी लै लहाण असतांना माझ्या मावशीच्या घरी पहिल्यांदा हा पिक्चर पाहिला होता. तेंव्हा केबल म्हणजे "वा वा !! केबल आहे का घरी !! वावावा !! " असला प्रकार होता. रात्री घरात सगळे झोपले होते आणि मी मावसभावांबरोबर हा चित्रपट पाहात होतो. " आवाज करु नका रे , नाही तर टिव्ही बंद करा ... काकांना फर्स्टशिप आहे ! " अशी कडक तंबी मावशीने दिली होती. पण माझं हसु काही केल्या थांबतंच नव्हतं !! मावशीने साताठ वॉर्नींग दिल्या .. मावसभाऊ गप्प बघ म्हणुन वैतागले पण माझं हसणं काही आवरंतंच नव्हतं !! शेवटी टिव्ही बंद केला गेला. पण तरीही माझं हसणं थांबत नव्हतं .. मधेच मला खळखळुन हसु येत होतं ;) तर असा हा अफलातुन सिनेमा !! चित्रपटाच्या सुरुवाती पासुन ते "द एंड" येई पर्यंतंच नव्हे तर त्यानंतरही हा चित्रपट अगदी मनमुराद मणोरंजण करतो .. "राजकुमार संतोषी" ह्या अतिषय हुषार डिरेक्टरचे उपकार मानावे तेवढे थोडकेच!
हे काही चित्रपट परिक्षण नव्हे. ह्या चित्रपटाणे माझ्या लाईफ मधला बराच काळ मला जो अफलातुन आणंद दिला त्याबद्दल काहीबाही खरडणं ह्याला परिक्षण म्हणता येणार नाही , नव्हे .. आम्ही ह्या चित्रपटाचं परिक्षण करण्याची लायकीच राखत नाही. .. कोदांच्या लेखाला प्रतिक्रीया देतांना जसं कोणत्या वाक्यावर लिहु कोणत्या वाक्याला सोडु असं व्हावं तसंच "अंदाज अपना अपना" चा कोणता सिन हायलाईट करु न कोणता नको असं होतं !! तेंव्हाचे सलमान-आमीर आजसारखे निगरगट्टं आणि कडकलेले दिसत नव्हते. एकदम "क्युट" वगैरे म्हणता येतील असे चेहरे आणि कैक क्युट एक्स्प्रेशन देऊन बनवलेला ह्युमर ह्याला आजही तोड नाही. ह्या चित्रपटा आधी आणि नंतरही बाप सिनेमे येऊन गेले असतील , पण माझ्यासाठी तरी "अंदाज अपना अपना" च्च !
आमिर खान, सलमान खाण ने धुम तर केलीच्चे , पण शक्ति कपुर चा "क्राईम मास्टर गोगो" , परेश रावलचा डब्बल धमाका "पत्ते बिछवणारा , गेम बजाने वाला तेजा" आणि "वेळेचा पक्का शब्द मोजुन मापुन बोलणारा रामगोपाल बजाज" , विजु खोटे चा "हाथ को आया मुह ना लगा वाला स्मार्ट बॉय रॉबर्ट" , ड्युप्लिकेट लॉयन अर्थात शेहजाद खान चा "प्लान के मुताबिक चालणारा भल्ला" हे एकसे बढकर एक बाँब आहेत ...... आणि हे कमी की काय म्हणुन मेहेमुद , अमर-प्रेम चे पप्पा लोक , आणि पोलिस ठेशणातला फेव्हरिट इणिस्पेक्टर पण उरली सुरली कसर काढुन टाकतात. मी पामर काय ष्टोरी सांगणार? ती तर सर्वांना माहितीच असेल (तोंडपाठही असेल)
जुहीची स्वप्न पाहाणारा आमिर खान जेंव्हा "आयला ! जुही !!" म्हणतो तेंव्हा खुदकन हसु फुटतं !! :) ह्या डायलॉगचा उपयोग मी आमची म्याडम आमच्यावर रागवली की करतो , अतिशय प्रभावी उपाय...
आमच्या सायटीवर मी आणि माझे दोन कलीग मिळुन पुर्ण "अंदाज अपना अपना" चा माहौल तयार करतो, सगळ्यांचेच डायलॉग्ज पाठ असल्याने त्यांची लिंक कधीही लागते आणि आमच्या क्युब मधलं वातावरन हास्यलाटांनी ओसांडुन वाहतं !! कधी कधी ब्यांकेची बोर लोकं आमच्याकडे भुवया वर करुन कपाळाला आठ्या पाडुन बघतात , बट हु केयर्स ?
"ये तेजा तेजा क्या है ... ये तेजा तेजा " क्राईम मास्टर गोगो गोज फॉर अ टोज !! =))
"सुनो सुनो दुनिया के लोगो .. सब से बडा है मिस्टर गोगो " भोळ्या सलमान खाणचा शिघ्रकवी काय जागृत होतो ?
"तेजा मै हुं मार्क इधर है " ह्या डायलॉग मधे तुम्ही म्हणाल विनोदी ते काय ? पण चित्रपट पहाताना लोटपोट व्हावं इतकं खतरणाक त्याचं टायमिंग आहे
"लाख लाख के पचास चेक होयेंगे सर " ह्या स्मार्ट बॉय रॉबट च्या मेंदुंच कौतुक वाटतं..
"ये वास्को दा गामा की गन है " ह्यावरच्या "किस के मामा की गन है " ह्या तेजा च्या पंच वर मी केवळ मरायचा बाकी राहातो.
पोलिस ठेषणातला पाच मिंटाचा सिनही काय कमी नाही ... रोडवर मारपिट करण्याच्या कारणावरुन तुरुंगाचं ओपनींग करायला आणलेल्या अमर-प्रेम इनिस्पेक्टरच्या डोक्यावर ज्या मिर्या वाटतात त्याला उपमा नाही =))
"सर आप शकल से गधे उल्लु के पठे लगते हो लेकीन आप हो नही " , " सर चाय मे शक्कर कम है " काय लिहु काय नको ?
लॉजमालकाला "रामानंद सागर च्या रामायणातला राम-भरत मिलणाचा " सिन आठवतो तेंव्हा माझ्या गालांना वात आलेला असतो ..
"क्राईम मास्टर गोगो .. आखे निकाल के गोटिया खेलुंगा ... आया हुं कुछ ना कुछ तो लुट के जाऊंगा .. खानदानी चोर हुं मै मोगँबो का भतीजा .. " इत्यादी गोगो के कारनामे म्हणजे अगदी कहर आहे कहर.
मी इथे कितीही लिहीलं तरी त्यात पिक्चर पहाण्याची सर येणार नाही , तसा माझा आग्रह ही नाही ...
पण मी कधी निराश वैगैरे असलो की हा चित्रपट जरुर पाहातो, मित्रांच्या घोळक्यात असलो की अंदाज अपना अपना चे संवाद आपोआप एका मागोमाग ओठांवर येतात. ह्या चित्रपट बहुतेक ९३-९४ मधे आला असावा... त्या वेळी जेंव्हा ह्यायले विनोद लिहीले गेले तेंव्हा तर ते एकदम फ्रेश असावेत , जे मला आजही तितकेच फ्रेश वाटतात .. निखळ मनोरंजण करतात ...
तेंव्हा .. ज्यांनी "अंदाज अपना अपना" पाहिलाय त्यांना पुन्हा एकदा उजळणी झालीच असेल , ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरुर पहा .. आणि ज्यांनी हा पिक्चर पाहिला पण त्यांना हा पिक्चर अगदी कॉमन वाटला त्याणा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ;)
No comments:
Post a Comment