मला अजुनही आठवतंय काहीतरी , बघ तुलाही आठवत असेल !!
"पहला नशा .. पहला खुमार ... नया प्यार है .. नया इंतजार. ..
करलुं मै क्या अपना हाल .. ए दिले बेकरार .. मेरे दिले बेकरार "
किती परफेक्ट गाणं होतं हे माझ्या मनस्थितीचं प्रकटन करायला ? तु जेंव्हा हे गाणं माझ्यासाठी गायचीस तेंव्हा मी ते अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत असे. तुझ्या आवाजात एकदम एकरुप होत असे , तुझं फोनवरचं लाघवी बोलणं,लडिवाळ पणे हसणं , माझ्यावर रागावणं , अगदी जोरात रागावणं, कोणत्याही गोष्टी माझ्याबरोबर शेयर करणं ... किती स्वप्नवत घडत होतं माझ्याशी ! कोण होतीस तेंव्हा तु माझी ? का चिडायचीस माझ्यावर इतकं ? विनाकारण ? आणि मी सुद्धा ते विनातक्रार का ऐकुन घेत होतो ? काय मी तुझ्या प्रेमात पडलो होतो ? हो !!! I was in love!! Damn it !!! ..Really I was literally mad in love with you !! ... तासंतास तुझ्या फोनची वेड्यासारखी वाट पाहाणं , तुझ्या विचारांनी मनात हलकल्लोळ माजणं , अजुन कशातही लक्ष न लागणं , झोप न लागनं , लागलीच ... तर स्वप्नातही तुझा निराकार चेहरा ... हे प्रेमंच होतं ग माझी राणी .
कसं सांगु तुला मी ... तुझ्यावरचं माझं प्रेम क्षणाक्षणाला वाढत गेलं अगदी एखाद्या चेन रिअॅक्शन सारखं!
आणि एक दिवस तु मला भेटण्याचं कबुल केलंस ... सगळीकडेच आनंदी आनंद दिसु लागला ... तु कशी असशील, मला पाहुन काय विचार करशील ? तुझे एक्स्प्रेशन्स काय असतील ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जाऊन बोलणार काय ? तुला कशाचं वाईट वाटलं तर ? तु माझ्या मुखात एक भडकाऊन दिलीस तर ? अनेक प्रश्नांचा अगदी काहुर माजला होता मनात .... पुणे-मुंबै प्रवास त्यावेळी जास्त सरावाचा नव्हता ... तरी काय काय करुन शेवटी पोचलो एकदा मुंबैत... बस मधुन उतरल्यावर दिसणारी प्रत्येक मुलगी तुच आहेस की काय ? असं वाटायचं ! शेवटी एकदाची तु मला दिसलीस ... क्षणभर स्तब्ध झालो. जितकं इमॅजिन केलं त्यापेक्षा तु कितीतरी सुंदर होतीस , स्टायलिश होतीस. तसा मी पक्का गावठी , ह्या जंगली टारझनला ही शहरी जेन शोभेल का? असा एक खुळचट प्रश्न मनाला चाटुन गेला. पहिले काही क्षण काय बोलावे हेच सुचत नव्हतं , तु सुद्धा घाबरलेलीस , आणि मी तर बावचळलो होतो :) सुरुवातीला तर नजरानजरही टाळत होतो ना आपण ? पण हार्टबिट्स किती वाढल्या होत्या. शेवटी भिड चेपल्यावर आपण मस्त मनमोकळे बोललो. तुझ्याशी बोलुन तसंही मला बरं वाटत असे. मी खुप खुष होतो. त्यावेळी आजच्या सारख्या नोटा मोडायची सोय नव्हती. इतर वेळी मी वडापाव खाऊन वेळ मारुन नेणारा , पण तुझ्यासाठी मॉलमधले काय काय महागडे डिश घेऊन आलो .. त्यातलं तु अगदीच थोडंसं खाल्लं होतंस .. (अर्थात मी ते नंतर संपवलं म्हणा) तो दिवस अविस्मरणिय होता. त्या दिवशी जेंव्हा आपण आपापल्या वाटेने गेलो , तुझा कोणीतरी पाठलाग करतंय म्हणुन तु मला फोनवलंस , मी प्रचंड कासाविस झालो ... पण मी तर बस मधे बसलो होतो. तुझ्या काळजीनेच माझी अवस्था वाईट झाली. किती गुरफटलो होतो मी तुझ्यात ?
आपलं प्रेमाचं कोकरु दिवसेंदिवस वाढतंच होतं , माझं प्रेम क्षणाक्षणाला वाढत होतं .. तुझ्यात मी पुर्ण पणे गुंतलो होतो. मला अजुनही 'तो' दिवस आठवतो. आजवर केवळ मनानेच एकरुप झालो होतो ... तरी तुला स्पर्ष करण्याचं माझं काही डेयरिंग झालं नव्हतं. मन मात्र तुला स्पर्ष करण्यासाठी वेड होतं मात्र जरुर. म्हणुनंच मला लोकल ने प्रवास करताना तुझा हलकासाच स्पर्ष झाला तरी शहारे येत. त्या दिवशी तु मला चुंबण देण्याचं कबुल केलं होतंस , पण तु फारंच त्रासवलंस मला. हो तुझी ही तितकीच इच्छा होत असेल हे न कळण्याइतका बावळट मी त्यावेळी नक्कीच होतो. दिवस संपत चालला होता. आणि शेवटी , त्या झाडाखाली मी प्रथम तुझ्या ओठांवर माझे ओठ टेकवले. तो क्षण आजही मला आठवतो. पुर्ण अंगातुन वीज सळसळली होती. ही फिलींग मी पुर्ण आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. माझ्या मेंदुला झिणझिण्या आल्या होत्या. पुर्ण शरीरातुन एक उर्जेचा लोळ उसळला होता. तू डोळे बंद केले होतेस . तुझा श्वास जोरात वाढला होता. हळुच मी तुला आपल्या मिठीत घेतले. तु ती मिठी सोडवण्याचा खोटा खोटा प्रयत्न केला देखील.आपण अजुन जवळ आलो होतो.
मी अफ्रिकेला जाण्याआधी तुला भेटलो होतो. आठवतंय ?
तेंव्हा आपण दोघे पुढचा काही अनिश्चित काळ भेटु शकणार नाही ,म्हणुन तु उदास होतीस. तु मला मिठी मारुन अगदी चिटकुन बसली होतीस. तोच माझ्या खांद्यावर मला काही गार गार जाणवलं , हो , ते तुझे अश्रु होते गं !! तु रडत होतीस ...
"ए वेडा बाई , मी काय नेहमी साठी चाल्लोय का ? It's my job , I've to go.... I promise I will come back soon .." मी तुझे डोळे पुसत तुझी समजुत काढतंच होतो , तर तु पुन्हा मला लिपटलीस , आणि रडु लागलीस ...
"किती गं प्रेम करतेस मला ? तु अशी रडलीस तर मी तुझ्या पासुन लांब , एकटा , कसा बरं राहु शकेल ? मी कमजोर होतोय "
ए जेनुटले ... मला मिस करशील ना ? मी तुला तिकडुन फोन करेन गं , रडु नकोस , आपण व्हिडीओ चॅटिंग सुद्धा करु .
त्या दिवशी तुला सोडताना मन किती जड झालं होतं, आणि एक दिवस मी आलो अफ्रिकेवरुन तेंव्हा ... तु मला एयरपोर्टावर घ्यायला आलीस. मी खुप खुष होतो त्या दिवशी, नॉट जस्ट कॉझ आय वॉज कमींग बॅक ... पण मी माझ्या लाडक्या जेनुटली ला भेटणार होतो . हो तुझ्या स्पर्षाची अतुरता होती. आपण तेंव्हा जुहू बिच वर गेलो होतो . हा समुद्र साला मला नेहमीच भुरळ पाडत आला आहे. संध्याकाळच्या सुर्यास्ताच्या वेळी तर तो परमोच्च आनंद देतो :)
मी तसा नास्तिक , पण मला बळजबरीनं सिद्धीविनायकाला घेऊन गेलीस, मोदकांचा प्रसाद मी आवडीनं खाल्ला म्हणा, पण त्याचा टिकाही तु माल लावायचा आग्रह केलास !! अरे जेवलास का ? उठलास का ? ऑफिसला जातोय कधी रे जातोय गधड्या ? किती उशीर हा ? झोपतोयस का लवकर ? रात्री कितीवेळ ऑनलाईन बसतोस .. न कितीनं काय .. फोनवरच्या इन्स्ट्रक्शन्स कशा रोबोट सारख्या पाळतो मी ? ( ;) ).. Thanks for being my mom @ times !! ... I love you ...... and love you forever ,,
( बघ .. मी लेख लिहीता लिहीता त्या आठवणींत इतका बुडला गेलो होतो , की मला तुला भेटण्याची इच्छा अनावर झाली ,... चल नरिमन पॉईंट ला जाऊ या , I'm calling you, get ready in 20 minutes , I'll pick you up , we are going to the marine drive ... )
No comments:
Post a Comment