मला वाटलं संपूर्ण पृथ्वीवर जर एकच देश असता तर माणसाने कदाचित कोणाचाही दुसऱ्या देशाचा म्हणून तिरस्कार केला नसता. ही देशाची बंधनं तोडली पाहिजेत. पण तोच पाहिलं , एकाच देशातली लोकंही धर्माच्या नावाने दुसऱ्याचा करतच असतात की .
मग मला वाटलं, जर हा धर्मच नसता तर किती बरं झालं असतं , सगळेच एका धर्माचे असते तर हे दुसऱ्या धर्माला कमी लेखणे , त्यांचा तिरस्कार करणे कदाचित थांबलं असतं . पण नाही , सगळे एकच धर्माचे असते तर त्यात जाती आहेत.
मुद्दा जातीच्या उच्च-नीचतेच असो किंवा आरक्षणाचा , काहीतरी कारण आहेच तिरस्काराला. मग मला वाटलं, साला एकच धर्म आणि एकच जात असती तर निदान हा तिरस्कार कमी झाला असता .
पण नाही .. त्यातही आमच्या पोटजाती आहेतच . स्वत:ला वरचा समजायचं दुसऱ्याला कमी लेखन म्हणजे तिरस्कार एकच धर्म एकच जात असली तरीही आहेत.
मग मला वाटलं , पोटजातीही नकोत. सगळ्यांत भावकी हवी. सगळेच एकमेकांचे भौभौ. तोच मी पाहिलं भावकी-भावकी मध्ये तर अजूनच जास्ती तिरस्कार आहे. एकच धर्म जात पोटजात आणि भावकी असली तरीही तिरस्कार मात्र कायम आहे .
तिरस्कार काय संपत नाय लका !

No comments:
Post a Comment