Thursday, August 5, 2010

संताजी-धनाजी ते टारझन

आज नितिन थत्त्यांची मिसळपावावर कमेंट पाहिली आणि खरंच वाटुन गेलं.. पुर्वी मोगलांना जळी-स्थळी-पाषाणी संताजी-धनाजी दिसत. हल्ली काही मिपाकरांना टारझन दिसतो असे कळते. परवा कोणी आलेला पादिनभप्कन म्हणुन सदस्य म्हणे टारझन आहे. कौतुकाने आम्हीही पहायला गेलो की या उर्फ प्रविणरावांनी काय तिर मारलेत ते. ते पाहिलं तर ते निघलं एक भिजलेलं कुत्रु .. अपमान करण्याचा काही संबंध नाही, पण त्याची तिथली अवस्था मला भिजलेल्या कुत्र्यासारखीच दिसली. रोज संध्याकाळी ऑफिसातुन आलं आणि कनेक्ट झालो की चिक्कार मेल्स आणि ऑफलाईन मेसेजेस येऊन पडत. "अरे तुच प्रविनभप्कर का ? " म्हणुन .. अलिकडे मी ह्या गोष्टीला इतका वैतागलो होतो की मला ज्या नव्या कंपनीच्या सिटी बँक अकाऊंट ओपन केलं आहे त्या संबंधी फोन आला आणि त्यांनी माझे नाव विचारले तर मी म्हणालो "येस , प्रविनभप्कर बोलुन र्‍हायलोय भो"

मिसळपाव वर सगळ्यात एंजॉय करण्याची गोष्ट म्हणजे तिथल्या वांझोट्या चर्चा. सुरुवातीपासुनंच तिथे कोणी ना कोणी रिकाम्या विषयांना घेऊन काहीतरी टिमकी वाजवतो आणि मग आम्ही त्याचा ढोल वाजवायचो. मागे एकदा बहुगुणींनी "गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचं काय करायचं?" म्हणुन एका उद्बोधक विषयाला  वाचा फोडली आणि आमच्या संयंमाचा बांध सुटला. तेंव्हा मी बहुगुणींना जास्त ओळखत नव्हतो पण त्यांचा हा अवगुणी धागा पाहुन आम्ही त्याचा कचरा करण्याचे मनात पक्के केले होते. आणि त्यावर आम्ही राडा गाजवला होता. परंतु ह्या राड्याची जबाबदारी आम्ही कधीच नाकारली नव्हती. अविनाशकुलकर्णी नावाचे अजुन एक सन्माननिय कादंबरीलेखक आहेत, तसा त्यांच्याशी व्यक्तिगत ओळखीचे संबंध कधी आले नाहीत, पण त्यांच्या एकाच ओळींच्या धाग्यांवर अनेकदा बोटसुख घेण्याची संधी दौडुन यायची.

थोडक्यात काय ? धिंगाणा करावा तर स्वतःच्या नावाने. त्यात एक वेगळीच मजा आहे. जसे लष्कर-ए-तय्यबा आपल्या कृष्णकृत्यांची जबाबदारी घेण्यास नेहमी तयार असते तसे काहीसे आमचे. म्हणुनंच की काय टारझनप्रेमी लोकं आम्हाला अतिरेकी वगैरेची बिरुदं लावतात. जालिय संस्थळांवर आलेली एकुणएक व्यक्ती एक तर आयुष्यात कोणत्या ना कोणत्या फ्रस्ट्रेशन किंवा निराषेत अडकलेला असते, नाही तर त्याची बाहेर कोणी दखल घेत नाही म्हणुन तो जालावर येऊन हुशार्‍या तरी करत असतो. हे ही कारण नसेल तर मग त्याचा धिंगाणा घालण्याचे ठिकाण जसे कट्टे किंवा विरंगुळ्याचे दुसरे साधण नसने , ह्यातुनही कोणी वाचला तर त्याला इथल्या मायावी वातावरणाचं अ‍ॅडिक्शन होणे हे देखील एक कारण आहे. तसा ड्युप्लिकेट आयडींचा इतिहास फार जुणा आहे. उपक्रमासारख्या शेजारी देशांवरचे धम्मकलाडु , वसुलि  इत्यादी महान ड्युप्लिकेट आय.डी आहेत असा आमचा समज आहे , परंतु मिसळपाव वरही काही लोकं ड्युप्लिकेट आय.डी.ज च्या एक्सेलशीट्स बाळगुन तो पद्धतशीरपणे मेंटेण करतात असा आमचा कयास आहे. हे आय.डी. कधी दंगा झाला की कापुर टाकण्याचं काम अगदी इनामेऐतबारे करतात.

अलिकडे आम्ही नवी कंपनी जॉइन केली . कंपनी म्हणजे मोठी , एमेनसी. त्या एकाच कंपनीचे ३-४ युनिट्स (म्हणजे बिल्डिंग्स) एक इकडे तर एक तिकडे , कँपस मधे फिरतानाच निम्मा दिवस निघुन जातो. त्यातही आमचे नव्या नवरीचे "घुंघटकी आड के" दिवस चालु, कधी ट्रेणिंगला पळ , तर कधी कुठल्या फॉरम्यालिटीज पुर्ण कर , अजुन प्रोजेक्ट फिक्स न झाल्याने मी ज्या टिम मधे रिक्वायरमेंट असेल तिकडे तिथल्या सुपरवायझर कडे जाऊन इंटरव्यु देतो. आनंदाने सांगण्याची गोष्ट अशी की आम्हाला अजुन मशीन आणि जागा अलोकेट न झाल्यामुळे आम्ही बांग्लादेशींसारखे इकडुन हकलले की तिकडे .. आणि तिकडुन हकलले की पलिकडे, असं चालुये. अश्या ह्या प्यानिक आणि बोरिंग वाटणार्‍या वातावरणात सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे रिस्ट्रिक्टेड इंटरणेट अ‍ॅक्सेस. आमच्या इथुन फक्त न्युज,बँकिंग आणि इ-लर्निंग साईट्स ओपन होतात , आणि त्यालाही ऑथोराईज्ड टोकन घ्यावे लागते.त्यातुनही वेळ कमी , आणि अशा वातावरणात आम्हाला अलिकडे अंतरजालिय गजाल्यांशी सिंक्रोनस होण्यास वेळ मिळे तो केवळ घरी आल्यावर. आणि अलिकडे जो नाहि येतो तो "टार्‍या आला रे" , "टारझन चे आम्ही फॅन्स आहोत" , "हा अबक म्हणजे टार्‍याच आहे" अशा टिमक्या सोडुन देऊन नंतर गप्प बसुन मज्जा बघतो.

गेल्या काही दिवसांचा प्रतिक्रीयांचा तुलणात्मक अभ्यास केला असता एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे काही लोकांनी ह्या नविन आयडींची केलेली धुलाई. ते पाहुन मला माझे जुणे दिवस न आठवतील तर नवलंच. ज्या दोन आय.डींवरुन हा सगळा धुरळा उडाला; म्हणजेच भापकर आणि कुलकर्णी , हे येडे नक्की येथे नक्की कोणत्या अपेक्षांनी आले होते ? त्यांनी एकतर मिसळपावचा अभ्यास केला नव्हता , नाही तर त्यांच्या कुंडलीत दुर्दैवयोग आला असावा. अरे बायका ह्या आपल्या चॉइसने निवडायच्या असतात, त्यांचे असे जाहिर धागे काढायचे नसतात (हल्ली मुली नवरे आपल्या चॉइसने निवडण्याचा जमाणा आहे म्हणे ! का तर मुली फारंच चुजी आहेत आजकालच्या , हो तर ! २१व्या शतकातली नारी आहे ती एकदम पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन चालते , काय म्हणालात ? हीच नारी मोक्याच्या वेळी बरोबर आपल्या स्त्री असल्याचा गैरफायदा घेते ?? आहो चालायचंच , कोण नाटकी नाही आजच्या जगात ? तर, असो ). आणि काढले तर त्यावरुन होणार्‍या राड्याचा सामणा करण्याची तयारी ठेवावी. आपली बायकोकडुन किंवा होणार्‍या बायको कडुन आमुक आमुक अपेक्षा आहेत ,थोडक्यात त्यातुन त्यातुन म्हैलांकडुन सक्तीच्या अपेक्षा करतोय असा इनडायरेक्ट मेसेज जातोय जो धागा सुरु करणार्‍याच्या दृष्टीने (त्यातल्या त्यात जर तो नविन असेल तर ) जणु पाचर सारुन घेण्यासारखे आहे हे यांना कळले नाही. आमच्या मिसळपाव वरची लोकं भले घरी बायकुचा मार खात असोत , पण जालावर समस्त महिला प्रजातीचे सौंरक्षनकर्ते आहेत.
घरी बायकोने भले त्यांची लाटण्याने साग्रसंगीत पुजा घालो , ते मात्र बायकोला एकदम समान वागणुक देतात. पण ...
उपाशी आणि तहानलेलं शिकारी कुत्र्यांच्या कळपा समोरुन असं जखमी हरीण जावं तसं यांचं झालं , धु धु धु धु धु धुतला यांना. मग कुठे कोल्हापुराची फळी उभी राहिली तर कुठे भापकर एकटेच पेटले. ते नक्की काय करत होते हे त्यांच त्यांना माहित. कधी माफि मागताना दिसत तर कधी धागा काढुन तक्रारी करताना. पण त्यांचे २-३ पंचेस खरोखर दाद देण्यासारखे होते हे मानले पाहिजे (म्हणुनंच हा भापकर म्हणजे टारझन होता , असे म्हणनार्‍यांनी ते कौतुकाने म्हंटले अशी आमचीच पाठ आम्ही थोपवुन घेतो. मधुशाला आणि त्यांच्या समविचारी लोकांनीही अगदी कौतुक करण्याजोगा प्रतिकार केला, बर्‍याच ठिकाणी जुणे-जाणते निरुत्तर दिसले तेंव्हा विषय वळवुन त्यांना हळुच कॉलर झटकल्याचे आम्ही सीसीटिव्ही कॅमेर्‍यांमधे पाहिले. गणपा ऋषीकेश किंवा लाडका नाना , ह्या मंडळींनी मात्र भप्करबाबा वर एक संशयाची तलवार टांगती ठेवली. तर पर्‍याने त्यांच्या उघड्या पडलेल्या तव्यावर हळुच आपला स्वयंपाक शिकुन घेतला. अलिकडे तो लग्णाचा उमेद्वार आहे म्हणे. कोल्हापुराची पोतडीतुन एकेक नवनवे आय.डी. निघत राहिले आणि जुण्या-जाणत्यांविरोधी एक ढाल तयार करत राहिले.

अ‍ॅक्चुली ह्या लेखाचे हिरो होते भप्कर "साहेब" पण त्यांनाही तिथुन हकलल्याचे आत्ताच कानावर आले. त्यानंतर आम्ही १०-१५ मिनीटे आमची मळालेली जमीन (लोळुन लोळुन) स्वच्छ करत होतो. भापक्या बिन बिडीचा मेला म्हणुन १५ मिनीटांनंतर मी २ मिनीटे शांत बसुन श्रद्धांजली वाहीली. भाकप्या नक्की कशामुळे मेला हे अजुन न उलगडलेले कोडे आहे आणि ते उलगडणारही नाही. आणि फक्त एक उसासा घेऊन म्हंटलो , चला सुटलो बुवा , तोच कोणीतरी पिंग केला , "अरे टार्‍या तु परत आलास ? "  हे बघ "सविता = टारझन" , "आल्ल्याबल्ल्या = टारझन " , "अरे हाच टारझन आहे"
आणि मी खिचडीखाताना एक बटाटा जो चावण्याच्या कंटाळ्याअभावी तसाच गिळला होता ,तो पुन्हा तोंडात आला.

चला टारझन होत होता तेंव्हाही लोकांचे रंजन होत होते , आज ही टारझन ची अपरुपे किंवा टारझनचे नाव ही लोकांना रंजन करण्यास पुरेशी ठरत आहेत, ह्यातंच माझे सौख्य सामावले आहे , जय हिंद जै म्हाराष्ट्र

( काय प्रतिज्ञा लिहीली बहुतेक मी , हल्ली माझ्या लेखणाचंही माझ्या पाककलेसारखं झालं आहे. सुरु केला लेख संपली तो प्रतिज्ञा. हे म्हणजे , करायला तर पोहेच टाकले होते , ही खिचडी कशी काय झाली बुवा ??  असो , लेख वाचा , रंजन करुन घ्या, आणि पुन्हा अंतरजालिय गजाल्या करायला आपापल्या मार्गाने मोकळे व्हा , काय ?  )

15 comments:

प्रभो said...
This comment has been removed by the author.
प्रभो said...

अजून एक (कमीतकीमी)अर्धशतकी धाग्याचा (सध्य परिस्थीतीत द्विशतकी) टीआर्पी गेला रे....
असो सध्या टीआर्पी बराच वाढल्याने गरज नसावी.. ;)

Deepali said...

chhan lihilays full TP

अजित said...
This comment has been removed by the author.
अजित said...

आपल्या फ्रेंड्स सर्कल मध्ये पण प्रवीण आणि भापकर असे २ सख्खे मित्र आहेत (होते). त्यांना ठेवू शकलो असतो हे नाव... पादिन भपकन ... :)
अरे ब्रांड नेम्स चा युज सगळेच करतात मार्केट मध्ये... जस्ट फॉर फेम... लोकॅल ब्रांड स ला कुत्रू (भिजलेला) पण विचारत नाही... मग तुझ्या नावाचा युज केला तर त्यात काही नवल नाही... तू लिहित राहा... आमच्या सारखे अजून बरेच पंखे तुझ्या ब्लॉग्स ची वाट पाहत असतात ... Nice writing....

Unknown said...

आरे हो रे आज्या , पव्या माझ्या ध्यानातंच नव्हता. बाकी त्याने हा लेख वाचला तर सरळ घरी गाडी लावेल आणि म्हणेल "ल्हील्ता का ? " आठवते का "गेल्ता का ? " ची गम्मत ? बाकी कॉलेजातल्या अभिषेक भापकराने हा लेख वाचुन मला हाणला नाही म्हणजे मिळवली .. अभ्या सॉरी रे बाबा ..

प्रतिक ठाकूर said...

बर्‍याच दिवसांनी तुझा लेख वाचला रे.
एकदम टिपिकल टारु लेख :)
वाट पहातोय तुझ्या परतण्याची आणि कदाचीत म्हणुनच जळी, (सं)स्थळी आणि नविन आयडीगणी तुझाच भास होतो :)

कम सुन बॅक.

-गणा

निशा............ said...
This comment has been removed by the author.
निशा............ said...

पादीन भप्कन.... हा हा हा.....

मी इथे खुर्चीतून सांडले!!! :)

बर मी म्हणजे मिसळ्पाव वरती सविता बर का!!!

त्यामुळे सविता = टारझन असा संशय घेणारे प्रतिसाद वाचल्यावर मला फिस्सकन हसू आले!

Unknown said...

तु तिथे सविता म्हणुन आहेस हे फार पुर्वीच कळले होते. तु जेंव्हा "टारुशेठ कुठे गेले" म्हणुन धागा काढलास तेंव्हाही सविता हा ड्युप्लिकेट आय.डी. असल्याच्या वावड्या उठल्याच होत्या.
थोडे दिवस शांत राहुन तु सुद्धा टारझनकोट घालुन वावरुन घेतलं असतंस :)

असो , मिसळ्पाव वर वावरास शुभेच्छा :) फक्त राजकारणात अडकु णका :)

Unknown said...
This comment has been removed by the author.
निशा............ said...

अशा साईट्सवर मला माझ्य नावाने वावरायला वेळ नाही.... तुझ्या नावाने कशाला वावरेन?

एकूणच... अशा कुठल्याही साईट्सवर फ़क्त मजेसाठी जायचे असते... फार मनाला काही लावू नये आणि त्यात फार वेळ ही घालवू नये हे मला फार पुर्वी कळले आहे.

Yogesh Joshi said...

टारूभाऊ लेख आवडला..
पादीन भप्पकन ऐकुन मी ही फिस्सकन (पादलो) हसलो.
तुझ्या ब्लॉगची लिन्कच मिळत नव्हती.मिसळप्रेमी वरुन मिळाली.
तु लिहित राहा आम्ही वाचत जाऊ.
- कानडाऊ योगेशु

Unknown said...

वा ! खूप दिवसांनी खास टारु ष्टाईल लेख वाचून खूष झालो. पण त्या प्रवीण ने किल्ला लढविलेला पहाताना टारुची आठवण येणे अनिवार्यच होते. काय तो त्वेष ! अगदी टारु स्टाईल अस्थिदंत विम्याची सोय नव्हती पण सूर जवळजवळ तसाच होता. शिवाय चक्क पराला खुन्नस दिली की त्याने. पराला तोडीस तोड जबाब देणे म्हणजे काय खायचे काम नाही. नंतर पराने जरी बाजू सावरली तरी त्या मॅच मध्ये अ‍ॅड्व्हान्टेज प्रविन्भ्प्कर. आता तू म्हणतोस त्याचाही गेम झाला तिकडे तर मग तो एक धूमकेतूच ठरला तर ! आपण त्यास 'टारझनचा धूमकेतू म्हणूयात, कसे ?

Meenal Gadre. said...

तू काय लिहिशील काही सांगता येत नाही रे !