णमस्कार्स लोक्स ,
हो , आहो भारत बंद आहे ना आज ? मंग ? आम्ही घरी पडिक :) (तसंही ऑफिसात असलो तरीही आम्ही पडीकंच असतो) एखाद्या पक्षाला एकदा का बहुमत मिळालं आणि त्याला काँपिटिशन मिळाली नाही , की तो कशी मनमानी करतोय, हे आपण प्रत्यक्ष बघतोय , नाही ? असो.. राजकिय मुद्द्यांवर वाद घालावा असा काही माझा इथे हेतु नाही. पण या सगळ्यात फायदा आहे तो ण्युज चॅणल वाल्यांचा हो !! पहा पहा , आपले ण्युज वाले आपल्याला घरबसल्या अपडेट्स मिळावे म्हणुन कसे ह्या सुटीच्या दिवशी बंदाचे अपडेट्स घेऊन येत आहेत :)
एक बाकी सत्य , एखादा ण्युज चॅणल असो वा वृत्तपत्र, राजकियस बायस्ड पणा त्यांत असतोच. आता आमच्या आजतक चंच घ्या ना ? आहो हसुन हसुन मुरकुंडी वळली =)) झालं काय ? सकाळ पासुन मी हा न तो ण्युज चॅणल चाळतोय, सगळीकडे बंद सफल झाल्याचं दिसतंय , कुठे जाळपोळ होतेय , कुठे बस,रिक्षा,कार्स च्या काचा फोडल्या जात आहेत , रोड ओस पडलेत ... तोच आमचे आजतक वाले "ये बंद फेल हुआ है ... " "बंद से यातायात बिल्कुल व्यस्त नही " इत्यादी बातमी देऊन थोडक्यात काँग्रेसचं लांगुलचालन (काय शब्द आहे हो हा ,च्यामारी) का काहीतरी चालल्यासारखं दिसतंय ... मग हे लोकं बंदाचा कसा "काहीच्च परिणाम झाला नाहिये" इत्यादी सांगण्याची धडपड मला त्या टेलेब्रांड च्या जाहिरातींसारखी वाटते. तिथे एखादा प्रॉडक्ट विकताना , कैच्याकै म्हणजे कैच्याकै गोष्टी बडबडल्या जातात. जसं "ये देखीये फोन के साथ आप को मिलते है ये हाय क्वालिटी इयरफोन्स .. ये इयरफोन्स की आप के कानोंपर ग्रीप एकदम मजबुत है ... जिस्से आप को बार बार इन्को निकालना नही पडता(????? नक्की इयरफोनच्याच ग्रीप विषयी बोलतोय ना ? ) " असो ह्या आजतकच्या रिपोर्टर ने चर्चगेटावर कोणत्यातरी माणसाला पकडलं (जो मला वाटतंय १००००% त्यांचाच माणुस होता) आणि त्याला अगदीच फालतु प्रश्न विचारायला सुरुवात केली ...
१. क्या आप पे बंद का कोई असर हुआ है ?
-> नही नही , बिल्कुल नही .. ये देखो मै तो बे रोकटोक आ जा रहा हूं .. रेल्वे टाईम पे चल रही है (इकडे मी =)) )
२. आप के दफ्तर को छुट्टी नही है ? क्यो नही है ?
-> नही हमारे "सरकारी" दफ्तर को छुट्टी नही है ...
३. आप घर से कितने बजे निकले ?
-> जी मै अपने नॉर्मल टाईम पे निकला हुं जी
बास .. ह्या तीन प्रश्नांत आजतक वाल्यांनी "ह्या बंदाचा कोणताच परिणाम झालेला नाही , सगळं कसं सुरळीत चालु आहे " म्हणुन ठोकुन दिलं आणि नंतर बॉम्ब टाकला "हाला के सडकों पे कोई नही है .. सडके ओस पडी है ... "
अरे ? =)) आत्ता तर म्हणत होता सगळं सुरळीत आहे म्हणुन ?
तोच दुसर्या एका चॅनल वर "बंद से पुरा जनजिवन प्रभावित .... नितीन गडकरी ने खुद को गिरफ्तार करवाया .. बहोत से बिजेपी वाले पोलीस स्टेशन मे " तर काही पोलिसांचा निर्दयी लाठीचार्ज दाखवत होते ...
मधेच एक न्युज चॅनलवर धोनीच्या लग्नाचा एपिसोड चालु होता... त्यात एक ८-१० सेकंदांचा एका घोडीचा फुटेज असा लुप मधे दाखवत होते, एक घोडेस्वार तिच्यावर बसुन इथुन तिथपर्यंत जाताना दाखवला ... हे रिपोर्टर भाऊ चालु .. " आप देख सकते है .. ये वो घोडी है जिसपे बैठ के माही अपनी दुल्हन को लेने आयेंगे " आणि त्यावर सुमारे १० मिनीटं तेच तेच वेगळ्या अँगलने सांगणं सुरु होतं ... मनात म्हंटलं यांना जर कुठेसं त्या घोडीचं लिद वगैरे पडलेलं दिसलं तर हे त्यावर सुद्धा ३० मिनीटांचा एक एपिसोड काढतील .. 'ये देखीये ये उस घोडी का लिद है जिसपे माहि बैठणे वाले है ... जब माहि घोडी पे बैठेंगे तब उसका स्वास्थ्य और मन शांत होणा जरुरी है... असो पुढचं इमॅजिन करा "
पुढचा चॅनल मराठी .... ह्यांचा ण्युज रिपोर्टर फ्रेशर असावा , ह्याच्यात आणि आमच्या पिं-चिं-वार्ताहार चॅनल च्या ण्युज रिपोर्टर मधे काह्ही एक फरक नाही ... रखडत- अडखळत तो बिचारा बंदाच्या बातम्या देतो ... आणि फुल्टु मनोरंजन होतं !!
कधी कधी वाटतं , ह्या ण्युजचॅनल्स ची कॅटॅगरी बदलुन "एंटरटेनमेंट चॅनल" करायला हवी.
जेंव्हा जेंव्हा मेजर घटणा घटतात , तेंव्हा तेंव्हा हे ण्युजवाले एक्स्क्लुझिविटी आणि ब्रेकिंग ण्युज बनवण्याच्या नादात बातमी कमी आणि मनोरंजन जास्त करतात.
क्यामेरा म्यान गजोधर पांडे के साथ मै टारझन चौरासिया , न्युज टीएनेन,भाजीवाला मार्केट .
1 comment:
Mala watat vikale gele ahet he sagale
Post a Comment