Wednesday, June 30, 2010

गुत्तुडा

"ए कटली रे कटली "
"ए मध्या .......... पकड पकड "
"मांजा पकड ... मी पतंग घेउन आलो "
"च्यायला ... टार्‍या लै गुतुडा झाला लका .. मांजा काय कामाचा नाय "
" आण रं इकडं .... गुतुडा आसला मुन काय आख्खा मांजा वाया घालितो का ? "

काही नात्यांचही असंच असतं , बरिच गुंतागुंत असते आणि आपण तो गुंता सोडवण्याबाबद बर्‍याचदा पॅसिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. गोष्ट मनाला बोचत असते कुठे तरी. पण कधी इगो आडवा येतो, मी कमीपणा का घेऊ ? मी का गैरसमज दुर करावेत ? नाती नेहमी रक्ताचीच असावीत असंही नाही. इनफॅक्ट आपला नातेवाईकांशी हल्ली संबंध तरी कितीसा येतो हो ? कधी सुख-दु:खाच्या प्रसंगात तोंडदेखली चार हाय-बाय-कसंकाय ? म्हंटलं की तोंड फिरवुन नावं ठेवणार असे हे रक्ताचे नाते. आय डोण्ड गिव्ह अ डॅम् !!!

जेंव्हा मी माझ्या पहिल्या-वहिल्या जॉबला जॉइन झालो होतो , तेंव्हा एकटाच सिलेक्ट झालो होतो. सगळं कसं नविन नविन होतं. एसीचं थंडगार वातावरण , कायम रफ्रेशनरचा घुमणारा सुगंध. सगळे टाय वगैरे घालुन सोफॅक्स्टिकेटेड लोकं त्यात मी आपला साध्या फॉर्मल्स मधे. ते वेल ऑर्गनाइझ्ड क्युबिकल्स , टिम वाईज विभागणी,  एखाद्या कॉन्फरंस्न हॉल मधे चाललेली मिटींग, कोणत्या ट्रेणिंग रुम मधे कुठल्याश्या टिमचं चाललेलं ट्रेणिंग.. आपल्या अ‍ॅक्सेस कार्ड मुळे ऑटोअनलॉक होणारे दरवाजे, कँटिन मधे सगळे कसे गृपने येणार ... मला सगळंच नविन, कुतुहल होतं ह्या गोष्टींचं ...  माझ्या साठी सगळेच चेहरे नविन! बरं अशी डायरेक्ट ओळख तरी कशी काढणार ? खुप बोर व्हायचं ! मग जीमेल ला लॉगिन करुन कंपनीतल्या गमतीजमती मित्रांबरोबर शेयर करायच्या. तो त्याच्या कंपनीतलं आणि आपण आपल्या कंपनीतलं वातावरण एकमेकांना सांगुन काय मिळायचं ते माहित नाही, पण फ्रेशरची जेंव्हा इंडस्ट्रित एंट्री होते तेंव्हा त्याला ह्या गोष्टींच कुतूहल असतं तसं मलाही होतं .

थोड्या कालावधीत मी थोडा रुळलो. त्यावेळी माझे केस मानेपर्यंत लांब होते. आणि हाईट पर्सनॅलिटीमुळे मला लोकं टरकून होती, माझ्याशी बोलायला थोडी नर्व्हसायची, हे नंतर मला समजलं आणि मी ओशाळलो. लगेच केस कापुन माणसात आलो.  :) नोकरी  लागेपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारच्या मैत्रिणी नव्हत्या , मुलींशी बोलायला आमची अंमळ फाटायची हो. मी जॉइन केल्यावर माझ्या टिम मधे अजुन एक मुलगा- मुलगी जॉइन झाले.  साहजिकच आमचा गृप झाला. मी तीन महिणे बेंचवर बसुन जे काही शिकलो ते त्या दोघांना शिकवण्याचं काम मला असाईन केलं गेलं.  काही दिवसांनी त्या नव्या मित्राला दुसर्‍या प्रोजेक्ट वर लटकवलं , आणि मग ती आणि मी दोघंच उरलो .. तिच्याशी बोलताना मी नेहमी नर्व्हस असायचो. ती सुद्धा असावी. पण हळुहळु हे फॉर्मल वागणं संपलं , मैत्री बरीच घट्ट होत गेली. तिला कधी काही आडलं तर मी लगेच मदत करायचो. ती फार फार प्रश्न विचारयची.अगदी स्वतःच्या डोक्यात तो मॉनिटर मारुन घ्यावा असं वाटावं इतकं. आमची कंपनी प्रॉडक्ट बेस्ड होती. ते प्रॉडक्ट बँकेसाठी कार्ड मॅनेजमेंट , एटिएम्/पॉस मॅनेजमेंट चं काम करतं  शिवाय कोर बँकिंगहोस्ट ला कनेक्टेड असतं. तसं पाहिलं तर कोर बँकिंग च्या तुलनेत प्रोडक्ट छोटं असलं तरी, प्रॉडक्ट भयंकर मोठा आहे. तर ह्या बाई म्हणत आपण लोक बँकिंग होस्ट  का नाही बनवत ? (इथे मी डोक्याची केसं उपटली होती) ...
तिला मी तिच्या नावाच्या टाईपचा कबाब असल्यानं "कबाब" असंच नाव पाडलं होतं , च्येष्टा मस्करीत दिवस कसा आरामात कटायचा. ती णॉनमहाराष्ट्रीयन होती, एम्टिआय मुळे तिचं बर्‍याच शब्दांचे उच्चार कॉमेडी असायचे.जसं कॉपी चं कोपी व्हायचं , रॅम चं रेम व्हायचं. मी तिची मुद्दाम मिमिक्रि करायचो.
 माझ्यासाठी हे सगळं मैत्रीपर्यंतंच होतं, पण तिच्या मनात माझ्या हेतुंविषयी शंका असावी. एका दिवशी अचानक तिने तिरकस बोलायला सुरुवात केली, "स्टे अवे फ्रॉम मी" असं काहीसं फिलिंग आलं! थोडंसं वाईट वाटलं आणि मी डायरेक्ट बोलणंच बंद केलंन! तिनेही काही रिस्पॉन्स दाखवला नव्हता.. कामापुरतं फक्त काय ते बोलणं व्हायचं. थोड्या दिवसांनी मी अफ्रिकेला जाणार असं कळल्यावर ती स्वत:हुन बोलायला आली , मी देखील कसला ही संकोच न बाळगता नॉर्मल रिस्पॉन्स दिला. लंच मधे म्हणाली , " तु जाणार तर बोर होईल मला खुप :) " 
"हो , पण मला थोडी शांती मिळेल =)) " ख्या ख्या हसत मी.
त्यावर तिला पुन्हा राग आला होता. नंतर मी तिकडे असतांना तिलाही दुसर्‍या देशात ऑनसाईट पाठवलं होतं. तिकडुन चॅट वर पिंग करायची. इम्प्लिमेंटशन चा काही इश्यु असला की विचारायची. मी हातचं काम सोडुन तिचे इश्यु सिम्युलेट करुन सोडवण्याच्या मागे लागायचो. कधी छोट्या मोठ्या गोष्टी सांगायची. मी देखील हिरारीने समुपदेशन करायचो. थोडक्यात आय वाज अ लिसनर कम अ‍ॅडव्हायझर कम मेट फॉर हर. अलिकडच्या काळात काहीतरी कारणांवरुन सारखं काही बिनसायचं. ती माझ्याशी बोलणं सोडायची , पण मी मुद्दाम तिच्या आवाजाची नक्कल करुन जोक क्रॅक करायचो. कधीतरी तीला हसु फुटत असे आणि न लागणार्‍या गोष्टी .. जसं तिचा हात किंवा नोटबुक .. ह्याने माला बडवले जायचे. मी पण "थांब आता पोलिस कंप्लेंटंच करतो, मला हिने मारलं म्हणुन .. ए पोरांनो तुम्ही साक्षीला आहात ना रे  " म्हणुन तिला अजुन चिडवायचो. बर्‍याचदा तिला कंपनीतुन बसस्टॉप पर्यंत लिफ्ट द्यायचो तेंव्हा तिचे पर्सनल प्रॉब्लेम्स , ऑफिसातले प्रॉब्लेम्स ती मला सांगायची ... "आमुक आमुक बॉस काही निट बोलत नाही रे हल्ली " , "सरांनी मला परफॉर्मन्स खराब आहे म्हणुन सगळ्यांसमोर पॉईंट आउट केलं आज " पासुन ते "तो सोम्यागोम्या हल्ली ट्राय करतोय  माझ्यावर " असल्या गोष्टी सांगायची, त्यावर मी "मला त्याची किव येतो .. देव त्याला शक्ति देवो" म्हणुन तिला आनखीच चिडवायचो.

 एकदा काय झालं , लंच ब्रेक मधे आम्ही प्लेटा घेउन जेवण आणायला गेलो तेंव्हा एक दुसर्‍या टिम मधला नविन पोरगा हिच्याशी बोलण्याचा ट्राय करत होता, हिने त्याला तेंव्हा काही भाव दिला नाही. संध्याकाळी स्नॅक्स च्या सुमारास मी दुसर्‍या क्युबिकल मधे जाईन हिला फोन लावला आणि आवाज बदलुन बोलायला सुरुवात केली. , "हॅलो.. मे आय स्पिक विथ ... "
"येस स्पिकींग ... "
"हाय , धिस इज विनीत, वे मेट इन कँटिन अ‍ॅट लंच , यु रेमेंबर  ?"
"येस.... येस.... "
"अ‍ॅक्चुली ... आय वांट टू टॉक समथिंग , कॅन वी मिट इन कॅफेटेरिया ?"
" या ... व्हाय नॉट ... आय वॉज अबाऊट टू लिव्ह टू कँटिन ओन्ली "
"ओके देन ... सी यु देयर इन अ मिनीट" फोन ठेऊन पटकन माझ्या क्युबिकल मधे येऊन साळसुदासारखा येऊन बसलो.
ती पटकन वॉशरुम मधे जाऊन तोंड वगरे धुवुन आली ... आपले स्पेक्स आणि ड्रेस ठिक करत निघणार इतक्यात मी तिला टोकलं " किधर जा रही है रे ??? इतना नट के ? "
"ए टार्‍या ... तुझे क्या करना है ? मे किधर भी जाऊं .... तु तेरा काम कर "
" अबे ए .... कोई विनीत बिनीत नही आने वाला ... मैनेही फोन किया था ... चली नट थट के.. बैठ ... "
त्यावर तिचे एक्स्प्रेशन क्लिक करण्यासारखे होते. तिने रागाच्या भरात इतका जोरात टोचला की मी चार दिवस केकलत होतो.

तिच्या रुममेट नं एकदा रुम साफ करण्यावरुन कशी भांडणं केली , कशी जेवण बनवण्यावरुन पेटली इत्यादी गोष्टींचे गार्‍हाणे ऐकण्याचं कामंही माझ्याकडे न विचारता आलं होतं. तसा मी तिच्याशी काही शेयर करायचो नाही , पण तिला सल्ले द्यायला , तिचं ऐकुन घ्यायला मला नाही म्हंटलं तरी बरं वाटायचं  (चला कोणी तरी पोरगी तेवढा तरी भाव देतेय राव)

नंतर मी जॉब सोडुन नविन जॉब पकडला. जॉब सोडला तेंव्हा काही कारणांवरुन बिनसलंच होतं. नंतर कधीतरी तिचा फोन आला. भेटलोही, गंधर्व मधे मस्त मसाला उत्तप्पा वगैरे खाल्ल्यावर जंगलीमहाराज रोडावर चालता चालता तिनं तिचे पर्सनल प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली , मी आपला नेहमीप्रमाणे ऐकत होतो. नंतर कधीतरी तिनं मला काही कारणांसाठी बोलावलं होतं , मी जायचा कंटाळा केल्यावर तिला त्याचा राग आला आणि आमचं बोलणं पुन्हा बंद झालं . हे सगळं नेहमीच अलिखीत घडायचं. त्यानंतर बराच काळ मी बोललो नाही. ती चॅट लिस्ट मधे ऑनलाईन दिसे पण कधी पिंग करावसं वाटायचं नाही. कधी वाटलंच तर चॅट विंडो ओपन करुन मेसेजही टाईप करायचो ... पण एंटर ऐवजी एस्केप वर बोटं टेकायची ... का ते माहित नाही पण मी कधीच तिला अ‍ॅप्रोच केलं नाही ना तिने मला ... कधी काळी तिचा "हाय" आला तर माझा इगो जागा होईन मी रिप्लाय केला नाही .... एखाद दिवशी मी चुकुन "कशी आहेस गं" विचारलं तर समोरुन बर्‍याच वेळानं "बिझि" एवढाच रिप्लाय यायचा... जवळपास ७-८ महिने लोटले. दरम्यानच्या काळात बोलु की नको बोलु की नको वर गाडी अटकायची .. आणि मी काही बोलायचो नाही.
आज एक कुल जोक वाचला आणि लिस्ट मधल्या मित्रांना फॉरवर्ड करता करता तिला ही पाठवला . चटकन तिने रिप्लाय केला .. हाय हॅलो नंतर विचारपुस केल्यावर (तसेही एकमेकांचे अपडेट्स ह्याच्यात्याच्या मार्फत आपल्याला मिळतातंच, तेंव्हा त्यांना अपडेट्स म्हणावं का ? )  तिनं विचारलं " तुझी इच्छा असेल तर काही पेस्ट करु ? "  , हो म्हणताच तिने काहीतरी शायरी पेस्ट केली ... नंतर एक छोटीशी कविता.... ओळींचा अर्थ चटकन लक्षात आला आणि हळवा झालो . भरभर जुण्या आठवणी काढल्या ... कितीकिती पेंडिंग गोष्टी होत्या.. आज बरं वाटलं बोलुन.
कधी कधी आपण समोरच्या विषयी किती एकांगी विचार करतो , नाही ? बर्‍याचदा परिस्थिती काही वेगळीच असते. गैरसमज, स्वाभिमान, अहं, समोरच्याला गृहित धरणं ह्या मुळे जो "गुत्तुडा" होतो ना , तो एखाद्या वेळेस सोडवुन पहा ... फार बरं वाटतं !!

अंदाज अपना अपना

णमस्कार्स लोक्स , 

शिर्षक वाचुन एकदम अमिर-सलमान-परेश रावल समोर उभे राहिले की नाही ? अगदी !! ज्याला "अंदाज अपना अपना" आवडला नाही असा एकंही जण मला भेटलेला नाही. आज पर्यंत ६० वेळा तरी हा पिक्चर पाहिला असेल. नंतर तर काऊंटिंग विसरलो.

मी लै लहाण असतांना  माझ्या मावशीच्या घरी पहिल्यांदा हा पिक्चर पाहिला होता. तेंव्हा केबल म्हणजे "वा वा !! केबल आहे का घरी !! वावावा !! " असला प्रकार होता. रात्री घरात सगळे झोपले होते आणि मी मावसभावांबरोबर हा चित्रपट पाहात होतो. " आवाज करु नका रे , नाही तर टिव्ही बंद करा ... काकांना फर्स्टशिप आहे ! "  अशी कडक तंबी मावशीने दिली होती. पण माझं हसु काही केल्या थांबतंच नव्हतं !! मावशीने साताठ वॉर्नींग दिल्या .. मावसभाऊ गप्प बघ म्हणुन वैतागले पण माझं हसणं काही आवरंतंच नव्हतं !! शेवटी टिव्ही बंद केला गेला. पण तरीही माझं हसणं थांबत नव्हतं .. मधेच मला खळखळुन हसु येत होतं  ;)  तर असा हा अफलातुन सिनेमा !! चित्रपटाच्या सुरुवाती पासुन ते "द एंड" येई पर्यंतंच नव्हे तर त्यानंतरही हा चित्रपट अगदी मनमुराद मणोरंजण करतो ..  "राजकुमार संतोषी" ह्या अतिषय हुषार डिरेक्टरचे उपकार मानावे तेवढे थोडकेच!

हे काही चित्रपट परिक्षण नव्हे. ह्या चित्रपटाणे माझ्या लाईफ मधला बराच काळ मला जो अफलातुन आणंद दिला त्याबद्दल काहीबाही खरडणं ह्याला परिक्षण म्हणता येणार नाही , नव्हे .. आम्ही ह्या चित्रपटाचं परिक्षण करण्याची लायकीच राखत नाही. ..  कोदांच्या लेखाला प्रतिक्रीया देतांना जसं कोणत्या वाक्यावर लिहु कोणत्या वाक्याला सोडु असं व्हावं तसंच "अंदाज अपना अपना" चा कोणता सिन हायलाईट करु न कोणता नको असं होतं !! तेंव्हाचे सलमान-आमीर आजसारखे निगरगट्टं आणि कडकलेले दिसत नव्हते. एकदम "क्युट" वगैरे म्हणता येतील असे चेहरे आणि कैक क्युट एक्स्प्रेशन देऊन बनवलेला ह्युमर ह्याला आजही तोड नाही. ह्या चित्रपटा आधी आणि नंतरही बाप सिनेमे येऊन गेले असतील , पण माझ्यासाठी तरी "अंदाज अपना अपना" च्च !
आमिर खान, सलमान खाण ने धुम तर केलीच्चे , पण शक्ति कपुर चा "क्राईम मास्टर गोगो" , परेश रावलचा डब्बल धमाका "पत्ते बिछवणारा , गेम बजाने वाला तेजा" आणि "वेळेचा पक्का शब्द मोजुन मापुन बोलणारा रामगोपाल बजाज" , विजु खोटे चा "हाथ को आया मुह ना लगा वाला स्मार्ट बॉय रॉबर्ट" , ड्युप्लिकेट लॉयन अर्थात शेहजाद खान चा "प्लान के मुताबिक चालणारा भल्ला"  हे एकसे बढकर एक बाँब आहेत ...... आणि हे कमी की काय म्हणुन मेहेमुद , अमर-प्रेम चे पप्पा लोक  , आणि पोलिस ठेशणातला फेव्हरिट इणिस्पेक्टर  पण उरली सुरली कसर काढुन टाकतात. मी पामर काय ष्टोरी सांगणार?  ती तर सर्वांना माहितीच असेल  (तोंडपाठही असेल)
जुहीची स्वप्न पाहाणारा आमिर खान जेंव्हा "आयला ! जुही !!" म्हणतो तेंव्हा खुदकन हसु फुटतं !! :)  ह्या डायलॉगचा उपयोग मी आमची म्याडम आमच्यावर रागवली की करतो , अतिशय प्रभावी उपाय... 

आमच्या सायटीवर मी आणि माझे दोन कलीग मिळुन पुर्ण "अंदाज अपना अपना" चा माहौल तयार करतो, सगळ्यांचेच डायलॉग्ज पाठ असल्याने त्यांची लिंक कधीही लागते आणि आमच्या क्युब मधलं वातावरन हास्यलाटांनी ओसांडुन वाहतं !! कधी कधी ब्यांकेची बोर लोकं आमच्याकडे भुवया वर करुन कपाळाला आठ्या पाडुन बघतात , बट हु केयर्स ?
"ये तेजा तेजा क्या है ...  ये तेजा तेजा "  क्राईम मास्टर गोगो गोज फॉर अ टोज !! =))
"सुनो सुनो दुनिया के लोगो .. सब से बडा है मिस्टर गोगो "  भोळ्या सलमान खाणचा शिघ्रकवी काय जागृत होतो ?
"तेजा मै हुं मार्क इधर है "  ह्या डायलॉग मधे तुम्ही म्हणाल विनोदी ते काय  ? पण चित्रपट पहाताना लोटपोट व्हावं इतकं खतरणाक त्याचं टायमिंग आहे
"लाख लाख के पचास चेक होयेंगे सर " ह्या स्मार्ट बॉय रॉबट च्या मेंदुंच कौतुक वाटतं..
"ये वास्को दा गामा की गन है " ह्यावरच्या "किस के मामा की गन है " ह्या तेजा च्या पंच वर मी केवळ मरायचा बाकी राहातो.
पोलिस ठेषणातला पाच मिंटाचा सिनही काय कमी नाही ... रोडवर मारपिट करण्याच्या कारणावरुन तुरुंगाचं ओपनींग करायला आणलेल्या अमर-प्रेम इनिस्पेक्टरच्या डोक्यावर ज्या मिर्‍या वाटतात त्याला उपमा नाही  =)) 
"सर आप शकल से गधे उल्लु के पठे लगते हो लेकीन आप हो नही " , " सर चाय मे शक्कर कम है "   काय लिहु काय नको ? 
लॉजमालकाला "रामानंद सागर च्या रामायणातला राम-भरत मिलणाचा " सिन आठवतो तेंव्हा माझ्या गालांना वात आलेला असतो ..
"क्राईम मास्टर गोगो .. आखे निकाल के गोटिया खेलुंगा ... आया हुं कुछ ना कुछ तो लुट के जाऊंगा .. खानदानी चोर हुं मै मोगँबो का भतीजा .. " इत्यादी गोगो के कारनामे  म्हणजे अगदी कहर आहे कहर.
मी इथे कितीही लिहीलं तरी त्यात पिक्चर पहाण्याची सर येणार नाही , तसा माझा आग्रह ही नाही ...

पण मी कधी निराश वैगैरे असलो  की हा चित्रपट जरुर पाहातो, मित्रांच्या घोळक्यात असलो की अंदाज अपना अपना चे संवाद आपोआप एका मागोमाग ओठांवर येतात.  ह्या चित्रपट बहुतेक ९३-९४ मधे आला असावा... त्या वेळी जेंव्हा ह्यायले विनोद लिहीले गेले तेंव्हा तर ते एकदम फ्रेश असावेत , जे मला आजही तितकेच फ्रेश वाटतात .. निखळ मनोरंजण करतात ...

तेंव्हा .. ज्यांनी "अंदाज अपना अपना" पाहिलाय त्यांना पुन्हा एकदा उजळणी झालीच असेल , ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरुर पहा .. आणि ज्यांनी  हा पिक्चर पाहिला पण त्यांना हा पिक्चर अगदी कॉमन वाटला त्याणा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.   ;)