Wednesday, April 21, 2010

इंटरव्यु - इंटरव्यु

णमस्कार्स लोक्स ,

प्रत्येक नोकरी करणार्‍याला न चुकलेलं एक चक्र म्हणजे इंटरव्यु (कोण चोच्या मुलाखत म्हणाला रे ? ही काय टिव्ही वर दाखवायची गोष्ट आहे का ? ) असो. इंजिनियरींग मधे जसा फायनल इयरला आलो तसे इंटरव्यु चे वेध लागलेले. अ‍ॅक्चुअली तेंव्हा व्हायवा किंवा प्रॅक्टिकलच्या वेळेस घेतली जाणारी ओरल ... ह्या गोष्टींना कधी घाबरलो नसलो तरी एक प्रकारचा नर्व्हसनेस माझ्यात असे.

कँपस इंटरव्यु मधे आमच्या पराक्रमांमुळेच बर्‍याच कंपण्यांच्या क्रायटेरियातुन आम्ही बाहेर पडायचो .. तेंव्हा त्याची तर माणसिक तयारी होतीच. पण मग आम्ही फावल्या वेळात लोकांचं निरिक्षण करायचो .. आमच्या बॅचची २०-३० पोरं इंटर्व्यु ला बसायची आणि २-३ सिलेक्ट व्हायची .. न सिलेक्ट झालेल्यांची एकंच ओरड असायची .. पारशॅलिटी केली साल्यांनी .. किंवा मी बरोबर उत्तरं देऊन पण आम्हाला घेतलं नाही ... आणि त्यांचे प्रेमभंग झाल्यासारखी बडबड ऐकुन घ्यायची ... आम्ही टगे ते ऐकुन पोट दाबुन दाबुन हसायचो .. माधेच कोणी ओरडायचा .. "अरे तुझं तोंड नसेल आवडलं त्यांना .. तु तसा गुणीच हो " त्यावर बिचारा अजुन खट्टू व्हायचा. यदाकदाचित कोणत्या कंपनीने ओपन एंट्री अलाऊड केली तर जी झुंबड उडायची  आमचा मुड तिथेच गायब व्हायचा. अर्थात प्रिपेरेशन चे कष्ट कोण घेणार ? म्हणुन आम्ही तशाच मख्ख चेहर्‍याने इंटरव्यु ला जायचो .. अ‍ॅप्टिट्युड कधी चुकून तुक्के मारुन क्लियर झालीच .. तर टेक्निकल राऊंड मधे मख्ख चेहर्‍याने बसुन रहायचो . इंटरव्यु घेणारा शेवटी शरणागती पत्करुन "नेक्स्ट" म्हणायचा  :)  आणि आम्ही पुन्हा कंपनीच्या नावाने शिव्या द्यायला मोकळे .. "अर्रे जाऊ दे रे .. बरं झालं सिलेक्ट नाही झालो ह्या कंपनीत .. साला लै फडतुस कंपनी होती ", "नाय नाय नाय .. ही कंपनी काय आपल्या लायक नाय .. " , "अर्रे आपण तर स्वतःची कंपनी काढणार बॉस .. :) " इत्यादी नेहमीचेच डायलॉग फेकले जायचे .

पास आउट झाल्यावर खर्‍या मजेला सुरुवात झाली ... "फ्रेशर" हा टॅग किती खतरणाक असतो हे कँपस प्लेसमेंट न भेटलेला सहज सांगु शकेल.. कोण्या सकाळी मित्राचा मेसेज येतो .. "आमुक आमुक कंपनी , फलाना फलाना पत्ता.. ९ वाजता " .. तसेच डोळे पुसून अंगावर भरभर पाणी मारुन अंघोळ आटपायची .. कसेबसे दात घासायचे ... आईने तोवर च्या केलेलाच असतो .. त्यातला बळेच एक घोट घेऊन पटकन कपडे चढवुन बुटं घालुन निघायचं ... उशिर झाला असेल का ? सिव्ही ची तर रद्दीच बनवलेली असते .. तिसेक सिव्ही पडिकच असायचे. बर्‍याचदा पत्ता माहित नसायचा. ह्याला त्याला विचारत कंपनी शोधत कँपस दिसला ... की दर्शन होतं ते १-१ किलोमिटर लांब लायनीचं ... च्यामारी इथे काय सिडको च्या घरांचं लॉटरी कुपण विकताहेत का जॉब देताहेत ? प्रश्न पडतो. तसं नंतर नंतर मन ही गोष्ट स्विकारुन अजुन प्रिपेयर करण्याची शक्ती पैदा करतं. जॉब शोध चालु असतांना दिसायला लागले ते परप्रांतिय ... नॉर्थ इंडियाच्या कसल्या पटना,भोपाल्,इत्यादी कसल्या फडतुस युनिव्हर्सिटी तुन आलेलं पब्लिक .. इंजिनियरींचे मार्क्स पाहिले तर ८० न ९० % .. च्यायला आमच्या पुण्याच्या युनिव्हर्सिटीचा टॉपर ७०-७५%च्या वर जात नाय राव ... इकडे सर्रास ८०-९० ?  मग कंपण्याही गर्दी पाहुन चला .. ७० च्या खालचे कटाऊट व्हा .. म्हणुन बराचसा लोंढा परतवुन लावायचे  :)  आता उरलेले लोक कुठले असणार हे सांगायला हवं का ? तेंव्हा राज ठाकरे नव्हता पण परप्रांतियांविशयीचा द्वेष वाढु लागला होता  :)  कधी कधी पहिल्या तर कधी दुसर्‍या .. तर कधी तिसर्‍या-चौथ्या राऊंड ला बाहेर पडत आम्ही सगळीकडुन रिजेक्शनचा अनुभव मिळवला  :)  जेंव्हा कधी सिलेक्ट झालो तेंव्हा मात्र ३-३ ऑफर लेटरं हातात होती  :) 

आताही इंटरव्यु देतो. पण आता इतकं टेंशन नसतं ... आपल्याच स्पेसिफिक डोमेन मधला इंटरव्यु असला की काही एक्स्ट्रा प्रिपेयरही करायचं नसतं. फ्रेशर सारखी गर्दी फक्त पेशव्याच्या कंपण्यांसारखी कंपण्यांमधे असते. मग आमचं काम उरतं ते निरिक्षण करण्याचं ... ही निरिक्षणं दर वेळेस थोड्याफार फरकाने सारखीच असतात. अशा वेळेस आमचे कान आणि डोळे हे दुप्पट क्षमतेनं काम करतात.

सुरुवात होते ते एच्चारकडे सिव्ही सबमिट करण्यापासुन. जॉबला अप्लाय करताना स्किलसेट क्लियरली मेंशन केलेला असुनही काही महाभाग लक आजमावण्यासाठी आलेले असतात. ते नुसते येतंच नाहीत तर ते चक्क एच्चार वाल्या पोरीबरोबर हुज्जतही घालतात. ह्या एच्चारच्या पोरी बहुतांश फार आखिव-रेखिव आणि बोलायला अंमळ लाघवी असतात. तेंव्हा एच्चार हा ही एक कंटाळवाण्या इंटरव्यु प्रोसेस मधे मनोरंजणाचा कार्यक्रम असतो. आम्ही त्याचा पुरेपुर उपयोग करुन घेतो. एकदा एक साऊथ इंडियन इंटरव्यु ला आला होता. इंटरव्यु होते बँकिंग डोमेन मधे अनुभव असलेल्यांसाठी. हे शेड्युल्ड इंटरव्यु होते आणि फक्त इनव्हाईटेड लोकांनाच एंट्रि होती. साऊथ इंडियन भाऊ फार लांबुन आल्याचं बोलंत होते. खंडीभर सिव्ही एकत्र करुन सगळं ऑर्गनाईझ करुन बिचारी एचार सुंदरी थोडी थकुन गेली होती. तिला हा चावत होता ." सी... म्याडमं .. आयं केम फ्राम लांग डिस्टंस .. यु ह्याव टू टेक माय इंटरव्यु" , साऊथी.
एच्चार ने त्याचा एक्स्पिरियंस पाहुन आणि इन्व्हिटेशन मेल नसल्याचे पाहुन आधीच त्याला जायला सांगितलं होतं. भाऊ तरीही खिंड लढवीत होता. "टेक माय इंटर्व्यू .. यु कांट डू धिस टू मी ... आय याम वार्निंग यू .. " ब्ला ब्ला ब्ला ! अचानक भाऊचा पारा वाढला .. आम्ही सगळे त्या दिशेने पहायला लागलो .. साऊथ इंडियनला एचार सुंदरी आता खडे बोल सुनावत होती " यु प्लिज लिव्ह द प्लेस ऑर आय'ल कॉल सिक्योरिटी" आणि शेवटी खरोखर त्याला शिपाई लोक बाहेर घेऊन गेले. जाता जाता भाऊ ने तमिळ्/तेलगु (काय असेल ते) त्या भाषेत काहीतरी अपशब्द वापरले असावेत.

सिव्ही एनरोल केलेल्यांना आत घेऊन एखादा फॉर्म भरायला दिला जातो. आणि नंतर सुरु होतो तो ... वेटिंग वेटिंग वेटिंग चा वेळ. ईंटरव्यु ला बर्‍याच प्रकारचं पब्लिक असतं.
इंटरव्यु देणार्‍यांत एक वर्ग असतो तो गृपने आलेल्या पोरांचा. ही पोरं एकसाथ घोळक्याने इंटरव्यु ला येतात. लॉबी मधे जेंव्हा सगळे वाट पाहात असतात तेंव्हा हा गृप फालतु कमेंट मारणे , पेपरची विमानं करुन भिरकावने किंवा काहीतरी चाठाळ पणा करणे इत्यादी कारणाने बर्‍याच जणांच्या डोक्यात जातो  :)  यांच्यातल्या कमेंट्स ने खरोखर हे कंपनीत इंटर्व्यु द्यायला आलेत की घ्यायला आलेत ? असा प्रश्न पडतो. "आपण विचारणार बॉ .. कॅरम पुल टीटी आहे का ? तरंच कंपनी जॉइन करु .. नाही तर गेले उडत "  असं म्हणत आत गेलेला तो .. येतांना मात्र इंटरव्यु घेणार्‍यानंच उडत लावल्यासारखा येतो. तो आल्या आल्या लगेच त्याचा गृप "ए काय विचारलं ... ए कसा झाला रे इंटरव्यु ?" वगैरे टिपिकल प्रश्नांचा भडिमार करतो. तो काय बोलतो त्याच्याकडे मात्र पुर्ण लॉबीचे कान आतुरतेने लांबले जातात. तोही उगाच काहीबाही फेकतो. ह्या गृप मधलं शक्यतो कोणी सिलेक्ट होत नाही.

दुसरा गृप असतो तो मोठा रेफरंस लागलेल्यांचा. ह्यांची कॉलर एंट्रि केल्यापासुनंच ताठ असते. भेंडी .. आपला तर आतुनंच जॅक आहे, ही गर्दी कशी येते आणि जाते ? आपण तर मजा बघणार बॉ. ह्यांच्या मते हे इंटर्व्यु आधीच हाय्यर्ड असतात. हे कधीच कोणाशी बोलत नाहीत. आपले कडेला जाऊन रेफरर ला फोन लाऊन मुद्दाम शेजार्‍यांना कळेल अशा टोन मधे सुरू होतात ...
"हं अरे .. आत आलोय बरंका , तुझं नाव लिहीलंय फॉर्म वर रेफरंस कॉलम मधे .. "
" हो हो हो .. तु सांगितलेलं सगळं प्रिपेयर केलंय बघ "
"अरे टेन्शन नाही रे ... आपला आपल्या टॅलेंट वर पुर्ण विश्वास आहे "
"यो डुड .. आय विल गिव्ह यु अ कॉल लॅटर .. थँक्स फॉर अ रेफरंस यार .. व्हाड डिड यु से कोण घेणारे इंटरव्यू ?"
हा किंवा ही फोन वर बोलत असतांना बाकी पोरींचं सगळं लक्ष यांच्याकडेच्च्च लागलेलं असतं ! मनातुन शिव्याशाप ही चालु असावेत असा एक तर्क  :)

अजुन एक गृप असतो मराठी पोरींचा (किंव्हा आंटींचा) ! आहाहा  ;)  ह्यावर तर खंडच्या खंड पडु शकतात. दोन मराठी पोरी... चालु होतात इंग्रजी मिक्स हिंदी मधे . हा संवाद ऐकण्याचं भाग्य मिळालं इथेच इंटरव्यु ची फेरी सफल होते.
"ए यु नो .. मी आत्ता जिथे काम करते ना ? आय अ‍ॅम नॉट अ‍ॅप्रिशियेटेड रे ... "
"ओह या सेम विथ मी नो .. म्हणुन तर मी चेंज करतीये .. "
"आमच्या यांणा नाही आवडत माझी करंट कंपनी.. तिकडची लोकं जाम पॉलीटिक्स करतात "
"अगं माझ्या तर आवती भोवती नुसती गोंडा घोळतात बघ माझ्या करंट कंपनीतली लोकं .. काहीही काम असलं की मीच हवी ह्यांना "  ह्या नुकत्याच लग्न झालेल्या आंटी असतात. दोन किलो च्या थैलीत ४ किलो पिठ भरल्यासारखं शरीर. नाक हे भलं मोठं .. केसांत कंगवा घातला की त्याच अँगल मधे उलटा काढला तर ठिक. उंची ५फुटाच्या आजुबाजुला. वेण्या घातलेल्या. पायाच्या टाचांना भरपुर भेगा पडलेल्या. आणि प्लास्टिकच्या आवाज करणार्‍या कॅरिबॅग मधे यांचं अनोखं फोल्डर त्यात ह्यांची डॉक्युमेंट्स. मनात विचार येतो साला .. किती फेकावं ? आवरा हिला कोणी.

" यु नो परवा मी इन्फोसिस ला गेलेले ना तेंव्हा माझ्या लास्ट विक मधे टिसीएस च्या इंटरव्यु च्या वेळेस दिसलेल्या दोन पोरी दिसल्या "
ह्यांना मोठ मोठ्या कंपण्यांची नावं घेण्याची फार हौस होती. एका इंटरव्यु च्या लॉबीत मी एकदा पुण्यातला कॉग्नि,इन्फि,टीसीएस्,विप्रो,अ‍ॅसेंचर्,अ‍ॅम्डॉक्स चं काय .. पण कधीही न ऐकलेल्या पण ह्यांच्या भाषेत खुप मोठ्या असलेल्या कंपण्या एका लाईनीत ऐकल्या होत्या . आणि ह्या २०-२२ कंपण्यांमधे ह्या मुलीने गेल्या १५-२० दिवसांत कसे काय इंटरव्यु दिले असावेत ? असं आश्चर्य वाटुन मी भोवळ यायचाच बाकी राहातो. आणि ह्या बाई कुठे तरी काँट्रॅक्ट बेसवर काम करत असतात  :)  तेंव्हा मात्र हसु फुटल्या शिवाय राहात नाही.
मधेच कोणाचं कॉसमॅटिक्/ब्युटी टिप्स चं डिस्कशन चालु होतं. मग चेहर्‍यासाठी, केसांसाठी, त्वचेसाठी, नखांसाठीच काय तर अजुन कोणत्या कोणत्या "पार्ट्स" साठी काय काय करावं ? ह्याचं मनमुराद डिस्कशन हे लॉबी मधे चाललेलं असतं. काही पोरी तर नोट्स घेऊन आलेल्या असतात. अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत त्या वाचत असतात. मला प्रश्न पडतो ... ही नक्की इंटरव्यु ला आलीये की थेरी पेपर द्यायला ?
साधारणतः इंटरव्यु नंतर आपण सिलेक्ट होऊ की न होऊ ह्याची कल्पना आलेली असते. ह्यांनाही येते. मग हळुच रुमालाने डोळे पुसत एकेक कटते. मी म्हणतो .. करंट जॉब असतानाही रडण्याचं काय कारण ? एका इंटरव्यु मधे तर पोरीने कहरंच केला होता.मला वाटलं हीच्या इंटरव्यु घेणार्‍याने मुस्काडात वगैरे वाजवली की काय ? बाहेर आली ती एकदम रडत रडत ... ते मुसु मुसु रडनं ही नाही .. ते पाहुन गृपगॅंग मधला कोणी चिरक्या आवाजात रडण्याचा आवाज काढुन मग त्या कोपर्‍यात हशा ही पिकतो.

सगळे राऊंडस झाल्यानंतर एचार म्हणते .. "वि वील गेट बॅक टू  यू ऑन मंडे विद रिझल्ट्स "
आणि इंटरव्यु संपतो. कोणी तिकडुन पिक्चरला जातो .. कोणाची गँग सिंहगडाकडे निघते. कोणी भुकेने कासाविस झालेला असतो तो आधी खायला पळतो. पोरी कधीच गृपने येत वा जात नाहीत. ज्या लॉबी मधे अशा जिवा भावाच्या मैत्रिणींसारख्या बोलत असतात त्याही तोंडाला स्कार्फ गुंडाळुन आपापल्या वाटेने शेप्रेट निघुन जातात .

आमचा इंटरव्यु होतो .. कधी कंपनीला आम्ही पटत नाही .. कधी कंपनी आम्हाला पटत नाही. आम्ही आमच्या वाटेने एकटेच घरी येतो.

एक इंटरव्यु संपतो.

3 comments:

Ashish Sarode said...

छाण!, णाइसओब्सरवेशन

अजित said...

He he he... Aamchya nashibat jast interview nahi aale pan jevdhya interview la gelo hoto tithe yatla barach kahi pahila... :)
Lay bhari re...
Interview chi aathvan taji zali...

विनायक said...

chalu de
aamhi chalato aamchi vattt