Thursday, February 25, 2010

खट्टा-मिठा

णमस्कार्स लोक्स ,
जेन म्याडमनं आज ताकिद देऊन सुटी घ्यायला लावली होती. कालंच अ‍ॅप्रायझल मिटींग मधे बॉसनं तासभर डोकं तासलं होतं ! " ट्राय टू टेक मोर रिस्पाँसिबीलिटीस ... (म्हणजे आणखीन राबा रोज) " , " वी आर हॅविंग प्लान्स फॉर यू ( ढिश्क्यांऊऊऊ.. गोळ्या द्यायला सुरूवात " , " फिनिश अप द प्रॉजेक्ट अँड अल्सो लुक इन ऑदर्स प्रॉजेक्ट्स अल्सो ( घरचं झालं थोडं ... आता व्याही धाडतोय घोडं ) ... इत्यादी इत्यादी टिपीकल म्यानेजरियल गोष्टी सांगुन झाल्यावर सुट्टी सोडाच, पण एक्स्ट्रा कामाचा काँप ऑफ घेणं ही अवघडल्यासारखं वाटू लागतं ! पण आमच्या हायकमांड कडून आदेश आल्यावर काही उपयोग आहे का ? गुपचुप घरी आल्यावर मेल टाकला ! " नॉट फिलींग वेल .. टेकिंग काँप ऑफ अगेन्स्ट सो अँड सो डेट " ..
तिनं ही प्लान्ड् लिव्ह टाकली होती. आता गुपचुप भेटायचं म्हंटल्यावर असे स्टंट्स करावे लागतात .. Smile असो !
सकाळी बरोबर साडेसातला फोन वाजला .. "उठा सुर्यनारायणा .. आज वेळेवर उगवलास तर एक गम्मत मिळेल ,लेट झालास तर ... " , पलिकडून करड्या आवाजात ऑर्डर आली. साखरझोपेची चिंधी झाली .. तरीही त्याविरुद्ध तक्रार न करता गुमान अस्मादिक उठले , लॅपटॉप उशाशीच असतो , लिड उघडली न् कनेक्ट झालो . दुसर्‍या सेकंदाला सहजरावांचा पिंग आला .. हल्ली जास्त सिंक्रोनस नसल्याने बर्‍याच गोष्टी अंमळ मागे पडल्या होत्या. अपडेट डाऊनलोड झाल्यावर घाई-घाईत आवरून बरोबर १० मिन्टात बेलापुर वरून वाशी गाठली. म्याडमच्या बरोबर दोन मिनिटं आधी पोहोचलो होतो. काही आव्हानात्मक पक्षी आजु बाजुने फिरत होते .. तसा आमच्या अँटेनाने सिग्नल पकडायला सुरूवात केलीच होती.. तोच मागुन डोक्यावर टपली पडली ..
"काय पहाताय ? मन भरतं की नाही तुझं ? .." इति जेन.
"अगं .. असं काय करतेस ? इतक्या नटून थटून येतात त्या .. कोणीतरी बघावं म्हणूनंच ना ? अँड बाय द वे इट्स मेल सायकॉलॉजी .. दे जस्ट गेट अ‍ॅट्रॅक्टेड टू विमेन जस्ट फॉर अ‍ॅन इन्स्टंस... दॅट्स इट .. " माझा हळवा बचावात्मक प्रयत्न.
त्याच्यानंतर जे झाले ते आमच्या इमेजला धक्का पोचवण्याची भिती असल्याने कापण्यात येत आहे. Smile तसा मी कोणालाही घाबरत नाही Smile विचारा कोणालापण ..
म्याडमने आपल्या हाताने बनवून साबुदाण्याची खिचडी आणि अभिनव प्रकार म्हणजे चॉकलेट चिप्स टाकेल श्रीखंड आणलं होतं.. आता खायला हक्काची जागा म्हणजे मॉल ! सेंटर वन कडे काडी वळवली .. गेटं बंद .. एक स्तुतिसुमन हलकेच निघता पुन्हा मागुन टपली पडली ! फार सात्विक राहावं लागतं आणि शब्द कसे मनोगत फ्लेवर टाकून उच्चारावे लागतात बाबा .. काय करणार ... उरला शेवटचा ट्राय .. म्हणून रघुलीला मॉल कडे गाडी वळवली. नशिब .. थेटर असल्यानं मॉल लवकर उघडतो. आत गेलो. फुड कोर्टावर साफसफाई चालू होती. नाही म्हणायला आमच्या सारखे ४-५ विठ्ठल-रुक्मिनीचे अवतात फिरताना दिसले. असो ! एक टेबल पकडल्यावर सकाळच्या भुकेचा कोटा संपवायच्या तयारीत होतो ! तोच कर्मचारी उद्गारले .. "साब .. थोडी देर बाद आना.. सफाई चल रहा है .. "
मनातल्या मनात त्याचा उद्धार करत आपला कडेला उभे राहिलो.
"आज कुठे जाऊयात ? " थोड्या त्रासिक स्वरात जेन बोलली.
आमचं कधी कोणतं प्लानिंग नसतं ... जेंव्हा भेटतो तेंव्हा कुठे जायचं डिसाईड होतं ..
मी म्हणालो .. "तु बोल .. तुझ्यासाठी सुटी घेतलीये .. तु म्हणशील तिकडे जाऊ .. "
म्याडम लगेच हर्षोल्हासित होऊन म्हणाल्या .. "सिद्धिविनायक .... "
चिडचिड्या स्वरात .. "तिकडे काय ? ... भजन ठेवलंय का तुझं ? "
" नाही! .. दर्शन घ्या कधी तरी देवाचं ! आणि आज तुला घेऊनंच जाणार ... दर वेळी कारणं देऊन सुटतोस " ,जेन
" दर्शन घ्यायला देवळात का जायला पाहिजे ? आणि यु नो . तसाही मी पुर्ण नास्तिक आहे ... देव असतो कुठे " मी.
" देव कसा नाही ? तू आहेस मी आहे .. ते कशामुळे ? " जेन.
" हॅहॅहॅ आपल्या पालकांच्या पुण्याईने .. ह्यात देव असण्याचा प्रश्न येतो कुठे ? " मी.
" आपण असे दिसतो ... असेच का दिसतो आपण ? "
"आगं .. तो डिएनए नावाचा प्रकार असतो बघ .. त्यामुळे असतंय .. देव काय चित्र काढतो का आपलं ? खाली पाठवण्या आधी ? "
"मग ? डिएनए कोणी निर्माण केला ? "
" निर्गतःच आहे .. "
"निर्सर्ग कोणी निर्माण केला ?"
" निसर्गा च्या आई-बापाने ... " अस्मादिकांच्या ह्या दर्जेदार विनोदाची परतफेड एका चिमकुड्याने झाली.
"मग हे महाभारत ... रामायण ... हे पण खोटंय का ? "
"हो .. अगदीच .. ते फक्त ब्लॉग्ज आहेत कोणे एके काळ चे .. कोणाचा तरी वेळ जात नव्हता म्हणून मोठमोठाले खंड पाडून ठेवलेत .. आणि तेच आपण खरे मानतोय "
"काहीही .. मग तु म्हणशील शिवाजी पण खोटे आहेत .. "
"शिवाजी महाराज असल्याचा प्रुफ आहे गं ! .. ते अस्तित्वात असल्याचे खरे पुरावे आहेत. आणि बाय द वे .. ते काही देव नव्हते .. दैवी पुरुष नक्कीच होते. "
"काहीही .. तूला काही कळतंच नाही ... बोलू नकोस माझ्याशी "
" बोलण्यात मुद्दे संपले की ही पळवाट असते हो .. "
तिचा एकंदरीत रुसलेला मुड पाहुन मग मी एकदम सिरियस मोड मधे येऊन मी स्पिच द्यायला सुरूवात केली ..
"हे बघ .. जुणी लोकं फार हुशार होती .. त्यांना माहित होतं .. वाईट कामं करणारी लोकं जर लगाम राहिला नाही तर कोणत्याही थराला जातील . म्हणून त्यांनी पाप-पुण्य ही संकल्पना काढली. मग पापाची फळं भोगण्यासाठी भयानक नरकाची निर्मीती झाली. तशीच स्वर्गाची ही .. आणि कोणी तरी आपल्यावर २४x७ लक्ष ठेवणारी अज्ञात सर्वोच्च शक्ति आहे .. असं ग्रुहित मांडलं .. जे कालांतराने इतकं रुढ झालं .. की लोकं ते खरंच मानायला लागले .. .. दॅट्स इट ..
ह्या पुढेही जाऊन देवाचा फंडा सांगायचं झालं तर बघ .. जेंव्हा कोणी निराष होतो .. आणि सगळ्याच बाजुंनी त्याला कोणतीही मदत दिसत नाही , तेंव्हा त्याला एका मोराल सपोर्ट ची गरज असते .. ती म्हणजे देव. हीच गोष्ट आपल्याला जगायची शक्ती देते Smile उद्विग्न मनाला शांत ठेवते ... "
"तेच तर मी म्हणते आहे " जेन ..
आता हसुन हसुन लोटपोट झालो होतो .. माझेच मुद्दे मला ऐकवल्या गेले .. ह्यावर झालेल्या फजितीवर कशी मात करायची हे तिला चांगलंच ठाऊक आहे .. पुन्हा माझं बोट वाकवल्या गेले ... "आईईईई गं !!!??! " असा आवाज झाला .. (ऐकताय ना बिका ? त्या दिवशीही हाच आवाज होता !! ) आणि चला सिद्धिविनायकाला म्हणून आज्ञा झाली. मॉल काय उघडत नाही पाहुन आम्ही मुंबै च्या दिशेने कुच केले.
नेहमी प्रमाणे हायवे ला आल्यावर तिची "केस बांधायचे आहेत .. गाडी कडेला घ्या" म्हणून ऑर्डर आली. साहाजिक आहे. भन्नाट वेगात गाडी चालवताना इव्हन माझे केसही टारझनासारखे उभे राहातात. तिची ब्याग प्लस माझी ब्याग आवरत ती सेटिंग करत होती .. त्यात माझा मोबाईल वाजल्याने ती आनखिन वैतागली .. आणि मला चिडायला हे कारण पुरेसं होतं .. वरच्या उन्हानं अजुन इरिटेट होतं होतं ..
"काय तुझं फोन फोन चाललंय ... कळत नाही का? बंद ठेव फोन एक दिवस "
"कंपनीतुन फोन होता.. काही महत्वाचं असेल तरंच येतो फोन.. जास्त थोबाड चालवू नकोस .. "
आमच्यात वणवा पेट्ला की दोन्ही कडून फायरींग सुरू होते. तेवढी किरकिर करून गाडी सुरू केली.. इकडुन तिकडून लेन चेंज करत मुंबै च्या घाणेरड्या ट्राफिक मधुन अगदीच पुणेरी बाईक ट्रेनिंग घेतलेला मी .. शिताफीने गर्दी कापत होतो. सिद्धीविनायकाला आल्यावर बाईक पार्किंग साठी जागा शोधत होतो. तिथल्याच एकाने .. "आवो लावा इथंच .. काय प्रॉब्लेम नाही ... " असं म्हणत हळूच .. "फक्त प्रसाद आमच्याकडनं घ्या " म्हणून सांगितलं .. मी गाडी लावून तसाच जायला लागल्यावर बळेच १०१ रुपयांचा प्रसाद माथे मारणार्‍याला पुणेरी जोडे मारूया म्हंटलं .. "काय .. इथे पे अँड पार्क चे १०१ रुपये .. आणि त्यावर प्रसाद आणि हार फ्री भेटतो का ? " .. सरळ सांग ना. .. प्रसाद घ्या म्हणून .. पण हे असले चाभरे धंदे बंद करा .. इज्जत घालवायची कामं ..साला !! " सरळ गाडी अजुन थोडी पुढे लावुन दिली.
आत भरपुर पोलीस वगैरे चेकिंग ला उभे होते. ल्यापटॉप आणला होता... म्हणे ल्यापटॉप बाहेर ठेऊन या ... चिडचिड झाली .. मी म्हणालो .. मी बसतो बाहेर .. तु ये दर्शन घेऊन ..
दर्शन घेऊन आल्यावर अगदी अपेक्षित असा बाँब तिने टाकलाच ...
"पाहिलंस ? देवाला मानत नाही ना ? म्हणून तुला दर्शन नाही भेटलं ... "
"ए चल्ल गं .. एक तर माझा ल्यापटॉप नेहमी माझ्या पाठीशी असतो .. आणि दुसरं म्हणजे ल्यापटॉप बंदी फार पुर्वी पासून आहे .. गणपतीनं ही सेटिंग काय पुर्वीपासुन केवळ माझ्यासाठीच करून ठेवलीये का ? " बोलायला ऐकतोय तो मी कुठला ? ... उगाच कोणती गोष्ट अति आणि मुद्दाम करायची म्हणून मी तिला म्हणालो .. आता "महालक्ष्मीला ही जाऊया .. आलोच्चे तर ... मग तिकडून हाजि आली वगैरे पण .. कोणाच्या देवाला राग नको यायला .. काय ? " टोमणा लक्षात न येण्या इतकी ही ती काय हे नव्हती .. "फाजिलपणा पुरे ... कुठे जायचं ते बोला "
"बसा मागे .. चाकं नेतील तिकडे जाऊया ... " म्हणत मी गाडी गेट वे ऑफ इंडिया कडे हाणली....
कुलाब्यात घुसल्यावर मधेच विज चमकल्यासारखं ती बोलली .. "हे बघ .. इकडून डावीकडे गेलास ना.. माझ्या मामाचं घर आहे ... "
"मग ? जायचं का ? मामाला म्हणावं .. आज बेबीज डे आउट आहे .. कामाला नाही गेले :)"
"काहीही काय ? वेडा आहेस का तू ? हे बघ .. मामाचं हॉटेल .. " माझ्या वाकड्या प्रतिक्रीयेला अगदी जेन्युअनली घेणार्‍या नव्या लेखकांची इथे आठवण झाली !
नंतर मग गेट वे ऑफ इंडियाला पोचल्यावर एकेक जण फोटू काढून देतो म्हणून मागे लागला !! एक तर उन .. सावलीत निवांत लुत्फ घेत बसण्याची जागा कुठे भेटत नाहीये .. आणि हे डुचमळे ..."साब एक मिनट मे फोटो मिलेगा... साब .. देख लो साब .. " च्यायचं बिहारी ... त्याला चार वेळा नाही म्हंटलं तरी पुन्हा तेच तेच करत होता. .. क्षणात इरिटेशनची जागा रागाने घेतली .. आणि त्याची कॉलर पकडली .. "आता जातो का बे भैय्याच्या .. " तेंव्हा कुठे लांब पळाला तो .. इकडे पुन्हा किटकिट सुरू झाली .. "काय गरज आहे तुला मारामार्‍या करायची. . ? सोडून दे ना.. " असल्या डायलॉग ला ऐकून न ऐकल्यासारखे करणे आम्ही अनुभवांतुन शिकलोय ..
तिकडून मग नरिमन पॉईंट ... चार वेळा रस्ता चुकल्यावर आम्ही बरोबर नरिमन पॉईंट ला येऊन पोचलो. इथे ही साले फोकलीचे भय्ये लोक .. "ए सेट चना लेलो .. चना जोर .. " पण इथे आम्ही व्यवस्थित पर्सन्यालिटीचा फायदा करून घेतो.. एकंच कटाक्ष असा टाकावा की पुन्हा बाजुच्यालाही "ए सेट .. चना लेलो .. चना जोर " म्हणताना विचार करेल ...
शेवटी नरिमन पॉईंटच्या एका झाडाखाली व्यवस्थित जागा मिळवली .. फोटोज पहाण्यासाठी लॅपटॉप कनेक्ट केला . आणि ........
जीटॉक कनेक्ट केल्या केल्या चार मैत्रिणींचे पिंग पटापट पॉप अप झाले (साला जेंव्हा ही समोर असते तेंव्हा हे बिका-सहज-मित्र वगैरे लोकं पिंग करत नाहीत .. ) .. आता मी ह्यांना उत्तरं देत बसणार .. म्हणून म्याडम चा राग डायरेक्ट सातव्या तालात गेला ...
"बंद कर पाहु तो ल्यापटॉप आधी .. "
"अगं थांब .. फक्त ५ मिनीटं दे .... "
" तु माझ्या बरोबर आलायेस ना ... की चॅटींग करायला .. सकाळी पण फालतु फोन चालू होते तुझे ... "
"अगं थांब .. " म्हणताच .. आमच्या फायरफॉक्स वर आमच्या आवडत्या ब्लॉग साईटही ओपन झाल्या ..
आता मी साईट्स वर टाईंपास करणार म्हणून तिने डायरेक्ट मोडेम खेचून काढला ... ते पाहुन माझं ही डोकं सरकलं .. न मी ल्यापटॉप खाटकन बंद केला .. आणि आजच्या दिवसाच्या नव्या भांडणाला सुरुवात झाली ..
"काय गरज आहे ह्या गोष्टींची ? मी आहे ना इथे ? " भडकून म्याडम उद्गारल्या,
"पण ५ मिनीटांनी काही फरक पडणार होता का ? ... मोडेम डायरेक्ट काढण्याची काही गरज होती का ? "
ठॉ ठॉ ठॉ ठॉ .. ठॉ ठॉ ...... तिचं तोंड ति़कडे .. न माझं इकडे .... पुन्हा एकदा शेंबडं कारण भांडणाला पुरलं होतं ..
रागाच्या भरात " माझा ल्यापटॉप .. माझा मोडेम" अशी "मी पणा" असलेली वाक्य मी बोलून गेलो होतो .. आणि तिच्याकडूनही असंच काही झालं होतं .. जवळजवळ १५-२० मिनीटं शांततेत गेली .. आणि शेवटी नेहमीप्रमाणेच ती म्हणाली .. "चल तिकडे जाऊन बसू आता .. उन कमी झालंय "
मी आपला अजुनही ताठंच होतो .. "तू जा .. आय डोंट वांटू कम .. माय मुड इज गॉन..."
" सोड ना आता ... प्लिज .. चिल अप !! "
मी भरपुर भाव खाल्ल्यावर आम्ही पुढे समुद्रकिनारी बसायला गेलो ..
राग शांत झाल्यावर मी केलेला फाजिल माजोरडेपणा मान्य करून मी हळूच सॉरी म्हणालो .. तसा तिला पुन्हा आयता कोतिलंच मिळाला .. पुन्हा फायरींग चालू झाली .. मी पुन्हा बचावात्मक फायरींग केली .. पुन्हा ठॉ ठॉ ठॉ .. ठॉ ठॉ ठॉ..
आणि ..............
शेवटी तिने ब्रम्हास्त्र काढलं .. ..
"डोळे पाणावले " हो तिचे ... आणि आम्ही शरणागती पत्कारली .. ज्या चुका होत्या .. त्या तर कबुल केल्याच केल्या ... जे आमच्या ध्यानी मनीही नव्हतं ते ही माथी लागलं ! शेवटी नंदीबैलासारखे सगळे गुन्हे गपगुमान कबुल केल्यावर एक थंडगार पाण्याच्या बाटलीवर आजचं भांडण संपलं !! आणि आम्ही गुण्यागोविंदाने पुन्यांदा नवी मुंबैकडे माघारी वळलो.
भांडणं कुठे नाहीत ? आणि ही भांडणं तर हवीच ना ? नाही तर पुलं म्हणतात तसं बुळबुळीत साबणासारखं लाईफ .. ज्यात ना काही एक्साईटमेंट ना काही चेंज .. सगळंच कसं रटाळवाणं ..
ही अशी आधुन मधुन भांडणं आणि त्यानंतरचं गोड गोड प्रेम म्हणजे अगदी "खट्टा-मिठा" लाईफ हो !!
खुलासा : गावभर ब्लॉग लिहीत हिंडतो पण आपल्यावर एकही ब्लॉग लिहीत नाही म्हणून आमच्यावर वारंवार रुसणार्‍या जेन म्याडमला हा लेख अर्पण आहे Smile

1 comment:

YoginiR said...

Good one...
I remembered my day out with Sandy...
Ashich sutti ghetli hoti amhi ;)
Ani asach diwas khatta mitha gela hota:)
-Yogi