णमस्कार्स लोक्स ,
गोष्ट आहे साधारण नऊ दहा वर्षांपुर्वीची .... दहावीत असेल .. नुकतंच मिसरूड फुटू लागलं होतं ... आणि सारख "कुछ कुछ होता है" असं वाटत होतं .. नक्की काय होतंय का होतंय हे कळायची अक्कल नव्हती .. आणि जरी बडबड्या स्वभाव असला तरी काही गोष्टी कोणाबरोबर बोलण्याची सोय नव्हती .. ते केवळ शारिरीक आकर्षण नव्हतं एवढं खरं .. त्याच्या कितीतरी पुढचं होतं ते .. मन कोणाच्या तरी शोधात होतं .. कोण ? स्वप्नसुंदरी ?
त्यावेळी एक मराठी सिनेमा पाहिलेला .. नाव नाही आठवत .. त्यात एक अत्तिशय सुंदर गाणं होतं .. "सहजिवनात आली ही स्वप्नसुंदरी"
हे गाणं त्यावेळी एवढं आवडलं एवढं आवडलं की झोपेतही हे गाणं वाजत रहायचं .. आईला काळजी वाटायला लागली .. आईनं नजर काढली तर बाबा म्हणाले ह्याची नजर काढायची गरज नाही .. मला त्यामुलीची काळजी वाटतेय जिच्यासाठी आपले युवराज गाणी म्हणतात .. मी ओशाळलो ... गावाबाहेर गेलं की एक टेकडी होती .. बाकी सगळीच हिरवळ असायची .. संध्याकाळ झाली की सुर्यास्त केवळ अप्रतिम दिसे .. तिथेच मी माझ्या स्वप्नसुंदरीची स्वप्न पहात तासंतास बसत असे .. एकटाच .. मळ्यातनं गुरं वळनारे लोकं त्यांच्या कळपाला घेउन घराकडे परतंत .. कोणी ओळखीचा भेटला की "आरं ए लका .. घरला न्हाय जायचं का ?" म्हणून आरोळी टाकायचा .. त्याला माझं उत्तर अपेक्षीत नसायचंच .. तो आपला रेडिओ चा ठोकळा कानाजवळ धरून णॉइजमिश्रीत गाणं ऐकन्यात मग्न असे. मी एकवात त्यांच्या कडे लूक टाकायचो आणि मनात विचार करायचो ... काय ही भावना आपल्यालाच आहे ? ह्याला दिवसभर गुरं वळणे .. अन घरी जाउन भाकरी खाउन तानुन देणे ह्या पलिकडे कधी विचार करताना पाहिला नाही .. सुर्याला शेवटपर्यंत नजर देउन मी घरी निघत असे. कोणासाठी तरी मन कासाविस होत असे ... फार फार .. एक पोकळी भासायची .....
फार चाळाचाळ केल्यावर माझ्या मनातलं चित्र मला सापडलं .. अगदी असंच होतं असं काही नाही .. पण बरंचसं असंच ..
कुठे तरी लांब अंदमान निकोबारच्या बेटावर एकादा समुद्रकाठ .. मावळतीकडे निघालेला सुर्य .. त्या प्रकाशाचं एखाच्या वॉटरकलरने रंगवल्याप्रमाणे छटा प्राप्त आकाश .. कसं ही मुक्तहस्त ... चित्रात माझी जागा ऑफकोर्स फिक्स असे... शेजारी जरी म्हैस चरत असली .. तरी विचारात समाधी लागलेला मी ... आणि शेजारी .. माझी स्वप्नसुंदरी .. वरचं चित्र मनात इतकं पक्क होतं की मी बर्याचदा एकच स्वप्न पहात असे .. नुसते तिचेच विचार मनात असंत .. त्यावेळचं मन फारंच चंचल आणि अपरिपक्व असतं ..नक्की काय हवंय हे कळण्यासाठी फारच लहान .. टेकडीवरच्या मोठ्या दगडावर बसून मी ....मनातल्या समुद्रकिणारी तिला बाहुपाशात घेऊन तासंतास तिच्या डोळ्यात पहात बसलोय असली स्वप्न रंगवायचो .. ती कशी दिसते माहीत नाही .. पण ती फारंच सुंदर आहे .. अगदी सगळ्या पिक्चरच्या नट्या तिच्यासमोर फिक्या पडाव्यात अशी .. उंचं बुटकी काळी की गोरी ? निराकार प्रतिमा माझ्या मनातली .. माझी स्वप्नसुंदरी ..... तिच्याशी हव्वं ते हव्वं तेवढं बोलेन .. तिच्यासाठी कसलेही पुचाट जोक्स करून तिला हसवू .. तिच्या गालावर पडणारी खळी वेड्यागत एकटक पाहील .. तिच्या रेशमी गालांना स्पर्श करतांना नक्की कसं बरं वाटतं ? तिच्या डोळ्यांत फक्त आपलीच प्रतिमा आहे ही भावना नक्की किती सुख देते बरं ? तिनं माझ्यासाठी खास आवडते म्हणून तिनं खास माझ्यासाठी बनवलेली बटाट्याची भाजी आणि चपाती आणलीये (ए कोण हसतोय रे ? ) आणि ती तिच्या हातानं मला खाउ घालते आहे .. आणि मी नक्की काय खातोय हे माहित नाही .. नुसता जबडा हलतोय आणि मी तिच्या डोळ्यात अखंड बुडालोय .. हळूच तिला म्हणतो .. आता हे चाऊन पण देना .. जबडा दुखतोय गं तु चपातीत गव्हाऐवजी मैद्याचं पिठ टाकलंयेस बहुदा .. त्यावर तिचं मौन .. तिच्या आवाजात एक प्रकारची जादूच .. तिचं हसणं समुद्राच्या लाटांसारखं अगदी लयबद्ध .. आणि तो गोड आवाज .. कोण आहे ती ? स्वप्नसुंदरी ?
काय गं ? किती उशीर ? गेले तिन तास झाला मी येड्यागत वाट पहात बसलोय ... ... तु कुठे आहेस ? अगं बोल ना ? अगं बोल ? भयंकर चिडलोय मी ..
त्यावर तिनंच हलकेच माझ्या मानेला पकडून अलगद ओढलं ... आणि माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले .. क्षणार्धात सर्व ब्रम्हांडांची ट्रिप झाली.... आकाशातले रंग लाल,सोनेरी, पिवळे , निळे करडे .. सगळ्या छटा एकापाठोपाट बदलल्या सारखा भासला .. शरीरात एक विज सळसळली .. हळूच एक वार्याची झुळूक आली तसं गालांना गार जाणवलं .. बहुदा डोळ्यांतून काही ठिपके नकळत सांडले होते.. तसाच मी एकटक पहात होतो तिच्याकडे .. पहिला स्पर्ष ... हो .. पहिलाच ... माझा राग ? तो कधी आला होता ? काळ थांबवता आला असता तर कित्येक युगे तो क्षण तिथंच अनुभवा असं वाटत होतं .. तसं ही तिचं उशिरा येणं नेहमीचंच असायचं .. कदाचित तिला भेटण्याच्या उत्सूकतेने मी लवकर जात असेल ... ती आली की माझं रागावण्याचा पहिला चॅप्टर असे .. मग तिचे एक्स्क्यूज देणं सुरू झालं की मी "बास्स... काही बोलू नकोस ... " म्हनून तोंड फिरवून बसे .. आणि मग मला हवं ते न सांगताच मिळत असे ..
ती ,चल ना .. ह्या वाळूवरून थोडं दुरवर चालूयात ... चपला इथेच ठेव .. मजा येते समुद्रकाठी आनवानी चालायला .. मला थोडं बोलायचंय ..
अगं हो बोल ना !! अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ... "बोल ना" मी घशात व्याकुळता आणून तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो ... तीचा चेहरा अगदीच निर्विकार .. मी हजारदा प्रयत्न करूनही कोणताच तर्क लावू शकत नाही ..
त्यावर ती उदास चेहरा करते ... इकडे मी थोडा घाबरतो .. बराच बावरतो .. तिचा चेहरा गंभीर होतो .. ती म्हणते .. मला शेवटचं सांग ... मी , "अगं बोल ना पटकन् .. का छळतेस ? " ती म्हणते ,, सांग .. "मेलेडी इतनी चॉक्लेटी क्यो है ? " आणि जोरजोरात हसत पुढे पळते .. मी ओशाळतो .. कारण ह्या आधी हाच सिन मी तिच्य सोबत केलेला असतो .. मी ही तिला पकडण्यासाठी तिच्या मागे पळतो ... संध्याकाळ होते .. सुर्य क्षितिजापार जातो .. आणि अंधार पडतो .. आणि मी स्वप्नातून बाहेर येतो .. तिचा निरोप अगदी नेहमी प्रमाणे रहातो ... उद्या येशील का लवकर ? असं विचारायला वेळच मिळत नाही .. मी आहे त्यात खुष असतो .. घरी येतो तर आई नं बटाट्याची भाजी केलेली असते .. मी जाम खुष होतो .. गालातल्या गालात हसत मी गाणं गुणगुणत असतो .. "सहजिवनात आली ही स्वप्न सुंदरी ... " आईच्या भुवया उंचावतात ... पण आई काही बोलत नाही .. रात्री बाबांना सगळा रिपोर्ट मात्र जातो ..
असाच बरीच वर्ष स्वप्नात जगलो .. पोरींबरोबर बोलण्याचा पोलियो झाला असल्याने स्वप्नसुंदरी आयुष्यात उतरणं तसं ही कठिणंच होतं ... जसा टाईम गेला तसं कधी कोणी आवडायची .. पण ती माझ्या स्वप्नसुंदरीच्या फ्रेम मधे फिट नाही बसायची .. मी आपलं "जाने क्या होगा रामा रे ? ,... जाने क्या होता मौला रे ..." म्हणत दिवस मोजायचो ... शेवटी देवानं जास्त परिक्षा पाहिली नाही ... स्वप्नसुंदरी प्रत्यक्षात उतरवून तो मोकळा झाला ...
स्वप्नातले क्षण तिने मला जसे च्या तसे मला दिले .. त्याबद्दल लाइफ मधे कधी नाही त्या एका बाबतीत मी स्वतःला लकी समजतो .. What do I wants from the life ? What comes till end with me ? Its only my dreamgirl !!
अशाच एका स्वप्नवत प्रसंगात ऐन टायमाला कोण बिपिन काका फोन करतात .. प्रेमी यूगुलाची तपश्चर्या भंग करतात .. आणि अनपेक्षित पणे टार्याला सापडलेला पाहुन .. फोन वर विकट हास्य करतात !! त्यांचा ह्या ठिकाणी कडक शब्दांत जाहिर निषेध करण्यात येत आहे
जाहीरात : अपकमींग शेंशेशनल लेख .... "माझे प्रेमाचे ३ पोपट " लवकरच कमींग सुन
No comments:
Post a Comment