......... मस्त २ मजली बंगला होता, बाहेर धान्य वगैरेचं गोदाम , ट्रॅक्टर , एक जिप ..घरामागे मोठ्ठ वावर. एक द्राक्षाची बागही होती साइड ला. फॅमिली बक्कळ पैका वाली असावी.मी येण्याची आधीच कल्पना आहे की काय आत सगळं नीट नेटकं आवरलेलं, एका बाजुला झोक्यावर त्या घरातले पुराणपुरूष झोका घेत लिहिता आणि उच्चारता न येणारा झोक्याचा आवाज करत शांतता भंग करत होते. हॉल मधे लाकडी सोफे त्यावर कुशनच्या उशा (हे मला बिककुल कंफर्टेबल वाटलं नाही) आणि उत्तम बैठकीची व्यवस्था होती. कुठे कोणी पादलं तरी एका मोठ्या दिवाणखाण्यात सगळी फॅमिली वास हवेत विरायच्या आत जशी जमा होते इथे सगळी फॅमिली हजर. कर्णधाराने फिल्डींग लावल्याप्रमाणे सगळे आपापल्या पोझिशन वर होते. घरातले कर्ते आणि मुखिया वाटनारे गृहस्थ ३-४ लटकेलछाप लोकांना घेउन बसले होत.त्यांची मुले पण एका कोपर्यात बसलेली. एक जण आभ्यास करत होता (एप्रिल मधे अभ्यास? मी ताडले ते बेनं नुसतं नाटक करत होतं ) सुना स्वयंपाक घरातुन डोकवत होत्या. १२-१५ वर्षांच्या ३ मुली उगाच मला पाहून एकादा लै भारी विनोद झाल्यावर ह ह पु वा व्हावी तशा(किंवा पौराणिक मालिकांमधल्या राजकन्या व तिझ्या मैत्रिणी जशा कारण नसताना हसतात तशा) उगाच हसून एकडून तिकडून येऊन स्वैंपाकघरात पळत होत्या. मी अजुन ही निरागस मनाने गंमत पहात, मी मुलाचा भाउ आहे म्हणून आपल्याला काही फॉरेन रिटर्न सारखी वागणुक मिळते आहे असे समजुन फुगत होतो. मी आल्यावर सगळेच आपल्याघरी कृष्ण दही चोरायला आला असा आनंद त्यांना झालेला. सगळे उभे राहिले. आणि "आमच्या घरी चला" म्हणनारे कुठे तरी धान्याच्या पोत्यांवर विराजले.अजुनही ट्युब पेटत नव्हती. मग घरातुन चहा आला. आम्ही अंमळ बोर माणूस , चहाच्या बाबतीत बाजीराव नखरे फार. "चहा नको .. मला त्याबरोबर गुडडे ची बिस्किटे लागतात." असं म्हंटल्याबरोबर एका आदेशासरशी अभ्यास करणारं(!!) ते बेनं बाणासारखं बाहेर पळालं मोजुन २ मिनीटात चहा गार व्हायच्या आत माझ्या पुढ्यात बिस्किटे हजर. आपण ऑलिंपीक मेडल जिंकल्याचा आनंद त्याच्या तोंडावर स्पष्ट दिसत होता.
च्या-बिस्किटं झाल्यावर, एक काकू मला स्वयंपाक घरातुन येत आहेत असं मला ८० अंशाच्या कोनातुन दिसलं.. त्यांच्या मागे एक गोरी पान,सुंदर,ऍव्हरेज उंचीची मुलगी मस्त साडी घातलेली, पदर थोडा डोळ्यांपर्यंत , हातातल्या ट्रे भल्या मोठ्या ट्रे मधे पोहे, बालुशाही,गुलाबजाम, समोसे, आणि अजुन कसलासा पदार्थ होता. चहा+बिस्किट नाकात गेलं आणि खोकला लागला .४४० किलो व्होल्टचा झटका लागावा आणि काळजात धस्स्स व्हावं आणि मति खुंटावी असलं फिलींग मला पुर्वी कधीही आलं नव्हतं.मला परिस्थितीची कल्पना आल्यावर सावरायला ५-१० सेकंद गेले. मी बावळटासारखा तिच्याकडे पहात होतो. आयला "आपल्याला दाखवण्याचा" प्रोग्रॅम आहे , ही गोष्ट पटतच नव्हती. मी खरोखर स्वता:ला पिंच करून पाहिलं. बापरे.. मी जाम घाबरलो. पोहे खाऊन झाले. गुलाबजाम मला आवडतात हे सिक्रेट माहिती असावं , मोठ्याबाउल मधे २०+ गुलाबजाम होते. मी कसे बसे (जबराइच्छा होत असताना) फक्त ६-८ गुलाबजाम खाल्ले. आणि त्या कर्त्याने डायरेक्ट विषयाला हात घातला.
"काय मंग जावायबाप्पू .. पोरगी पसंत का ? आम्हाला तुम्ही कालच पसंत पडले ........." असली खतरा सुरूवात ...( आयचा घो ... टार्या ... तुझी कन्यारास यावेळी कशी गप्प बसली बे ?) माझी बोलती बंद झालेली .. मी त् त् प् प् करत होतो. मी म्हणालो मी असला विचार नाही हो केला अजुन .. मी तर आजुन जॉबलेस आहे हो .. त्यावर ते म्हणाले आवो .." कुटं चाकर्या करत बसता .... आमची बागायती हाय, द्राक्ष, कापशी आन् उसाचं आमुक आमुक मिळतं .. " खुल्लमखुल्ला ऑफर ? मला काहीही सुचत नव्हतं ... चहा-पोहे खाऊन नाय कसं म्हणू याचं बळच जिवावर आलेलं... कसं बसं बडबडायला लागलो (मला सुचलं नाही की उगाच इंग्लिश बोलायची सवय आहे) ... मी इंग्लिश सुरू झाल्यावर तर सगळे लोक अजुन ४ पावलं पुढे सरकुन मी काय बोलतोय हे ऐकत आहेत असा भास मला झाला.आईशी चर्चा करावी लागेल, असं पटेबल कारण देत शेवटी कसा बसा निसटलो ..
जाताना पोरीकडे एक फिल्मी लुक दिला, बिचारी 'चक्क' लाजली आणि मी 'तिला नाही म्हणनार आहे' हे शल्य मनात ठेउन निघालो .
(समाप्त)
अविवाहित
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
2 comments:
घाशीराम कोतवाल :
आयचा घो ... टार्या ... तुझी कन्यारास यावेळी कशी गप्प बसली बे ?
साला टार्या धमाल आली आसल ना मग करोत का? लगिन मित्रा पण साला मिपावर सगळ्यांना निमंत्रण दे नाय तर तुझ्या वर बहीश्कार बघ मिपावर
Post a Comment