रणरणती ऊन्हाळ्याची दुपार , घराबाहेर संपूर्ण शांतता. सगळेजन घरात चिडीचूप
दडी मारून झोपलेले. पोराटोरांना घराबाहेर निघायला बंदी घातलेली असायची.
जास्तीत जास्त गेटच्या आतून बाहेरची मजा बघायची अनुमती मिळायची. रोड वरून
एखाददुसरा माणूस किंवा एखादी भाकड गाय कोणी काही खायला देतंय का म्हणून
दारोदार भटकताना दिसायची. गवत वाळून पिवळं पडलेलं असायचं. एवढ्यात तो
दिसला की सगळीकडे एकच गलका व्हायचा. एक्च्युली तो दिसाय्चन आही , घंटीचा
आवाज ऐकू यायचा. मग समजून जायचं , कुल्फीवाला कही आसपासही है! गारेगार
चौकोनी पेटीत बर्फ आणि त्यावर त्या ट्यूबमध्ये भरून खुपसून ठेवलेल्या
कुल्फ्या. वेगवेगळ्या साईझच्या आणि वेगवेगळ्या फ्लेवरच्या. इलायची फ्लेवर
सस्ता , म्यान्गो फ्लेवर मेहेंगा.. लक चांगले असेल तर म्यान्गो कुल्फीसाठी
पैसे मिळत. कुल्फीवाला कोणती कुल्फी कडक झाली हे कड्या हलवून पहायचा , जी
झाली असेल ती बाहेर काढून पाण्यात ढवळायचा मग कुल्फी त्या कंटेनर मधून
बाहेर निघे, मग त्या कुल्फीच्याच लिक्विड मध्ये बुडवून आपल्याला द्यायचा.
मजा यायची .
अजुन एक कुल्फीवाला असायचा. त्याच्याकडे अंड्याच्या आकाराचे कंटेनर असत. एक बाहेर काढून त्यात ती बांबूची काडी खुपसायची , आणि रबरलॉक काढलं की ते अंड्यासारखी कुल्फी तयार. मटका कुल्फीवालाही असे. तो एका सिलेंडरीकल ग्लासात मटका कुल्फी बनवायचा. त्याचे चार भाग करून चतकोर आकारच्या चार कुल्फ्या तयार करायचा. कुल्फीवाल्यापेक्षा जरा हटके बिजनेस म्हणजे पेप्सीकोला. चाराणे-आठाणे-रुपया नुसार पेप्सीकोल्याची लांबी असायची. वेगळ्या रंगाचे वेगळ्या फ्लेवरचे पेप्सी ! विटकरी हिरवा लाल नारंगी . दुधाचा पेप्सी दुप्पट किमतीला . पण पेप्सीकोला हातगाडीवरच नाही तर दुकानांतही मिळायचा त्यामुळे त्याचे खास आकर्षण नसायचे. दाताने एका कॉर्नरचा प्लास्टिक कुरतडून पेप्सी चोखायची. शेवटी फक्त बर्फ उरला की फेकून द्यायची !

असतात एकेक दिवस. उन्हाळ्यातल्या दुपारची शांतता सर्वात शांत असावी. लिंबाच्या किंवा वडाच्या झाडाखाली मस्त खेळत तिथेच दडी मारून द्यायला मजा यायची. उन्हाळ्यात आम्ही रानात पोहायला जायचो. दर वेळी नव्या नव्या विहिरी शोधायचो. विहिरीवर पोहून झालं की विहिरीच्या काठावर उताणे पडायचो. तो गरम चटका अंगावर घ्यायला मजा यायची. गरम झालो की तिथूनच परत पाण्यात सूर मारायचा. पोहून झालं की मग तिथेच डबा खोलून खायचा आणि वावरातून टमाटे हरबरे तोडून खायचे.
उन्हाळा म्हटला की मला हे आठवतं. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. असो.