आपला मेंदु किती विचित्र असतो नाही ? बरंच काही साठवलेलं असतं त्यात. पण बर्रंचसं चक्क विस्मृतीत गेलेलं असतं, अगदी धुळीने मख्ख मळलेल्या पि.एम.टी. बस सारखं. आणि कधीतरी १५ ऑगस्ट २६ जानेवारीला बस धुवावी आणि त्यावर लिहीलेली "स्वच्छ पुणे सुंदर पुणे" ची जाहिरात दिसावी तशा आपल्या स्मृती जाग्या होतात. काही गोष्टींचं आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. "अरेच्च्या, आपल्या आयुष्यात हे ही घडुन गेलं होतं ? " , "असे होतो आपण ? " , "काय बावळटपणा केला मी ? "
असंच काहीसं काल घडलं. आज नवी कंपनी जॉइन करायची म्हणुन काल जरा माझ्या फायलीवरची धुळ झटकली. काय काय डॉक्युमेंट्स लागणार म्हणुन सॉर्टींग करण्यासाठी फाईल चाळत होतो. आणि एकेक कागद पाहुन मला काय काय आठवत होतं.
एक सर्टीफिकेट होतं ऑरेंज बेल्ट चं. साल १९९५. मी कधीकाळी कराटे शिकलो होतो ? माझंच मला कौतुक वाटलं. तेंव्हा मी सहावीत होतो. अगदीच पाप्याचा पितर. तशी आमच्या गावात तालिम होती. तालीम म्हणजे संत सावतामाळ्याची एक मुर्ती, शेजारीच एक १० बाय १५ चा लाल मातीचा आखाडा. एक बेंच , २-३ बार्स , आणि ३-४ डंबबेल्स चे सेट्स. मित्रांबरोबर असाच हौस म्हणुन एका दिवशी गेलो. माझी ज्याच्याशी खुण्णस होती तो जगतापाचा बाळ्याही आमच्यात होता. मोठ्या पोरांना व्यायाम करताना पाहुन मी सुद्धा डंबेलं हातात घेतली, एका हाताने एक काही उचलला गेला नाही म्हणुन दोन हातांनी एकंच डंबेल उचलुन वाकडा तिकडा होऊन कवायत केली. लगेच बार वर आलो. बार काही उचलला गेला नाही. त्याच्या प्लेट्स काढताना त्या फरशीवर पडल्या, आधीच फुटलेल्या फरशीचा तुकडा निघाला, मग गुपचुप तो चिटकवला. आणि विना वजनाचे बार मारला. चार रिपीटेशन्स झाली नाही तो लगेच , आखाड्यात गेलो. बाळ्याने मुद्दाम माझ्या डोक्यात टपली मारली. तोच हौशीनं आणलेल्या लक्स आंड्रेड (हो आमची आंड्रेड चं होती) वर आखाड्यात उडी मारली. लाल मातीत लिंबु टाकलेले. कोंदलेल्या वातावरणात तो मातीचा लिंबाचा आणि घामाचा असा मिक्स्ड फ्लेवर आला होता, पण त्याची आम्हाला कसलीच फिकर नव्हती. बाळ्याबरोबर कुस्ती खेळताना त्याने मला फिरवुन त्याने जमिनीत दाबलं, मला श्वासही घेता येत नव्हता. दम लागला होता. नाकातोंडात माती गेली होती. आवाज फुटत नव्हता. शेवटी मी बाळ्या जोरात चावलो. त्यानं माझ्या हांड्रेड ला जोरात ओढलं आणि णको व्हायचं तेच झालं. बाकीचा "सिन" तर झालाच त्यात माझी आवडीची आंड्रेड फाटल्याचं दु:ख अधिक. मी रडायला सुरुवात केली तशी बाळ्यासगळ्या पोरांनी धुम्म ठोकली. कपडे घालुन घरी आलो.
"आंड्रेड" प्रकरणामुळं आईचे फटके खाल्लेच आणि तालमीत पुन्हा जायचा प्रसंगंच आला नाही. दुसर्या दिवशी हात-पाय हलवनं जड झालं होतं, चालताही येत नव्हतं पोरं खुप चिडवत होती. तेंव्हा मनात बाळ्याला एक दिवस लै रेमटायचा म्हणुन खुन्नस धरली. पण तो वयानं आणि अंगानं थोडा मोठा असल्यानं मी त्याला टरकुन होतो.
आमच्या गावात कराट्याचे क्लासेस सुरु झाले तेंव्हा मोठ्या उत्साहानं क्लासला अॅडमिशन घेतली. तब्बल ३०० रुपये देऊन मी कराटेचा ड्रेस विकत आणला. त्याबरोबर व्हाईट बेल्ट मिळाला होता. मी घरुनंच ड्रेस परिधान करुन ऐटित कराटे क्लासला मिरवत जात असे. आमचा "सर" जाम डेंजर होता. त्याची कराट्याची कौशल्य पहाताना माझ्या मुठी आपोआप आवळल्या जात. जगतापाच्या बाळ्याला मी असाच धुवुन काढणार म्हणुन मी मनोमन सुखावत असे. कराट्याचा "सर" आमच्याकडुन खुप मेहेनत करुन घ्यायचा.प्राथमिक फेरीत मुठि आवळुन डिप्स मारणे,क्रंचेस,स्टमक्स ,साईडसिटप्स आणि भरपुर रनिंग. ह्या राक्षसी प्रकार केल्यानंतर माझ्यात चालायची देखील शक्ती उरत नसे.त्यातही जर थकलो किंवा बाकीच्यांबरोबर रिपिटेशन करताना मागे पडलो की आमचा राक्षस सर पोटात खौन पंच हाणायचा की मला देव दिसायचे. बैलासारखी भुक लागत असे. हा सर अजुन मला फायटींग का शिकवत नाही ? मला त्याचा लै राग यायचा.
माझा पेशन्स संपत होता. मला माझ्यावर हसणार्या क्लासमेट्सना , आणि माझी "हांड्रेड" फाडणार्याला बाळ्याला फाडायचा होता. पहिला महिना भर केवळ अवघड व्यायाम करुन घेतल्यावर मला थोडा आशेचा किरण दिसला. आम्हाला पंच, किक्स आणि ब्लॉक्स शिकवायला सुरुवात केली. पंच मारताना "ह्यूऊऊऊउईईई " करतांना अंमळ मौज वाटत असे. ह्या आवाजामुळे पंचला अधिक पॉवर मिळते असे सर सांगायचा.आणि ह्या "ह्युंऊऊऊउईईई" मुळे पंचची प्रॅक्टिस करण्याला उत्साह मात्र येत असे. फेस पंच, चेस्ट पंच आणि स्टमक पंच ह्या १-२-३ च्या क्रमाने आणि नंतर ३-२-१ च्या क्रमाने अगदी कसुन सराव करत होतो. नंतर आम्हाला ब्लॉक्स शिकवले, सिमिलर टु पंच , ब्लॉक सुद्धा फेस ब्लॉक चेस्ट ब्लॉक आणि स्टमक ब्लॉक ची उजळणी जशी जशी होत होती तसा मी अधिक काँन्फिडेंट होत होतो. मधेच कधी चुक झाली की सर कधी बरोब्बर स्टमक मधे एक जोरदार पंच मारायचा तर कधी कानाला सन्नकन एक किक घासुन जायची. मला कराटेचं व्यसन लागलं होतं. मी घरी सुद्धा पंच आणि ब्लॉक्स ची प्रॅक्टिस करायचो. रिकाम्या वेळात ह्यूऊऊऊईईई ह्यूऊऊऊईईई करायचो. नंतर मुहासी किक, साईड किक आणि स्पिनिंग किक्स चे धडे गिरवायला सुरुवात झाली. मी कराटे वेडाने पछाढलो होतो.
मला पोरं हसायची. " कराटे काय कामाचा नसतो , आपली गावठी पावर मजी पावर आस्ती." म्हणुन मला डिसकरेज करायची. पण मी लक्ष दिलं नाही. मला समोर फक्त बाळ्याला मारायचाय , ही एकंच गोष्ट दिसत होती.
पंच, ब्लॉक्स आणि किक्स मधे बेसिक्स शिकल्यावर आमची "यल्लो बेल्ट"ची परिक्षा वाघोली गावात होती. तिथे आमच्या क्लास ची मुख्य अकासमी होती. व्हाईट टू ब्लॅक सगळ्या बेल्ट ची पोरं आम्हाला पहायला मिळणार म्हणुन मी उत्साहीत होतो. आमच्या गावात पहिलीच बॅच असल्यानं आम्ही सगळेच यलो बेल्ट साठी चाललो होतो. ही अगदीच प्रायमरी परिक्षा असली तरी आमच्या बॅचचे त्यातही ४ जण फेल झाले होते. आता मी व्हाईट बेल्टचा यलो बेल्ट झालो होतो. तो यलो बेल्ट आमच्या सर कडुन स्विकारताना मी ज्याम फुलुन गेलो होतो. आर्ध जग जिंकलो होतो जणु. आमच्या परिक्षे नंतर ऑरेज बेल्ट , रेड बेल्ट , ग्रीन बेल्ट , ब्राऊन बेल्ट , यलो ब्राऊन बेल्ट च्या परिक्षा बेल्ट च्या चढत्या क्रमाने झाल्या. मी अगदी मंत्रमुग्ध होऊन पहात होतो. त्यांच्या परिक्षांमधे वेगळ्यावेगळ्या प्रात्यक्षिकांचा समावेश तर होता. अजुन एक अनोखा प्रकार मी पाहिला तो म्हणजे कटास. कटास ह्या प्रकारात कराटे फायटर ला एका चौकोणात प्रिडिफाईन्ड मुव्हज परफेक्टली करुन दाखवायच्या असतात. प्रत्येक कटास ला नाव असतं. बेल्टची लेव्हल जशी वाढत जाते तसा कटास किचकट आणि अवघड होत जातो. क्लियर मुव्हज , वेळ , आणि बॅलंस इत्यादी गोष्टींवरुन कटास चे मार्क्स दिले जातात. त्यानंतर माझ्या आवडीचा प्रकार म्हणजे फाईट्स झाल्या. फाईट पहाताना माझ्यात इतका जोश चढला होता की मी अगदी नकळत समोरच्याला एक पंच लगावला(नंतर १० पंच खाल्ले हा भाग अलहिदा). सर्वांत शेवटी ब्लॅकबेल्ट्स साठीच्या सर्वांत अवघड परिक्षा झाल्या. त्यांन्ना फाईट्स,कटास शिवाय वेगवेगळी शस्त्र चालवण्याचीही प्रात्यक्षिकं सादर करायची होती.नंतर आमच्या सर लोकांनी हवेत उडी मारुन मडकी फोडणे , फोरआर्म्स ने फरशा, विटा , कौलं फोडणे इत्यादी फाईव्हस्टार आयटम पेश केले .त्या दिवशी मी खुप खुश होतो. मी आता लवकरंच बाळ्याच्या डोक्याची विट करणार होतो.
आता आमची ऑरेंज बेल्टसाठीची ट्रेणिंग सुरु झाली. सर आम्हाला फाईट्स चं एकेक तंत्र अगदी बारकाईनं समजुन सांगायचा. ह्यात त्याचा भर ब्लॉक टेक्निक सुधरवण्याबरोबर अटॅक कसा करावा ? ह्यावरही होता. मी मन लाऊन प्रॅक्टिस करत होतो. अॅब्ज,हात अगदी निबर झाले होते.सराचा पंच झेलण्याची क्षमता माझ्यात आली होती. आमची मॉक फायटिंग होत असे. फायटींग ची सुरुवात "बो" ने होते. बो म्हणजे वाकुन नमस्कार करणे. मुहासी किक मधे पायाचा तळवा समोरच्याच्या छातीवर असा पंच सारखा मारायचा असतो. ही किक जोरात मारायची नसते, तर जोरदार ताकद लाऊन समोरच्याला मागे ढकलुन मिसबॅलंस करण्यासाठी असते. साईड किक मधे डोक्यापासुन कमरेपर्यंत कोणत्या टेक्निक ने लाथ मारावी ? हे शिकवले गेले. तर सर्वांत अवघड स्पिनींग किक अशी वेगात मारायची असते.
फाईट्स शिकल्यावर आम्हाला पहिला कटास शिकवला गेला. त्या कटासचं नाव होतं "तायकीसिदा". कटास सुरु करण्याआधी कटासचं नाव आदराने घ्यायचं असतं , मग सर ला "बो" करायचा असतो. आणि मुव्हज सुरु करायच्या असतात. १२ स्टेप्सचा तो कटास होता. दिसायला सोप्पा दिसला तरी करताना अंमळ गल्लत होत असे आणि सर ची किक बसत असे. शेवटी एकदाचे आम्ही कटास आणि बेसिक फाईट्स मधे निपुण झालो. पुन्हा परिक्षा जवळ आल्या.
आम्ही ७ जण परिक्षेसाठी क्वालिफाय झालो होतो. माझा नंबर आला तेंव्हा मी फार घाबरलेलो होतो. मी "तायकीसिदा$$$$$$" म्हणुन कटास सादर करण्यास सुरुवात केली. बावरल्याने मी ३ स्टेप्स मिस केल्या आणि मार्क्स गमावले. ह्यावेळी बेल्ट हुकणार म्हणुन खात्री पटली. पंच आणि किक्स मधे काही चुक झाली नाही. शेवटच्या फाईट राऊंडला माझ्या समोर थोडासा थुलथुल्या पण माझ्या दिडपट पोरगा उभा होता. त्याला पाहुन माझी अंमळ फाटली होती. पण "बो" करुन फाईट स्टार्ट म्हणताच माझ्यात कुठुन शक्ती आली कुणास ठाऊक, मी एक मुहासी किक अगदी परफेक्टली त्याच्या छातीवर मारली आणि तो भुईसपाट झाला. माझी फाईट ९ सेकंदात संपली होती. मला ऑरेंज बेल्ट सह एक प्रशस्तीपत्रक भेटलं, मी त्यादिवशी उड्या मारत मारत घरी आलो. आईनंही पोतंभर कौतुक केलं.
मी वाट पहात असलेली संधी तशी आयतीच चालुन आली. क्रिकेट खेळतांना मी बाळ्याला रन आउट केला, तोच बाळ्या माझ्या नकळत माझ्या मागे बॅट घेउन पळत आला , आणि त्याने रप्पकन माझ्या पाठीत बॅट मारली. मी कळवळलो. मरणाचं उन होतं, मी बेशुद्ध पडलो तसं कोणी हापश्यावरुन पाणी आणुन माझ्यावर शिंपडलं ... बाळ्या मला शिव्या देत होता. मी तसाच उठलो आणि बाळ्याच्या तोंडावर एक जोरदार पंच लावला. बाळ्यानं तो पंच खाऊनही माझ्यावर बॅट उगारली पण ह्यावेळी मी ब्लॉक वापरला. आणि उलटा फिरुन एक किक मारली ती बरोब्बर बाळ्याच्या काखेकाली बरगडीत बसली. ह्यावेळी बाळ्या कळवळला. त्याच्या हातातली बॅट खाली पडली. तशी बाळ्याला दुसरी किक पोटात बसली, बाळ्या जमिनीवर आडवा पडला. मी त्याच्या तोंवावर मारणार तोच त्याचा डोळा टरटरुन फुगला.आणि बघता बघता काळानिळा झाला. आधीच लाल असणार्या बाळ्याचा एक डोळा उघडलाही जाणार नाही इतपत सुजला होता. मी आणि बाकी सगळी पोरं पळुन गेलो. मी गुपचुप घरी येऊन बसलो.
थोड्यावेळाने बाळ्याची भांडकुदळ आई बाळ्याला आमच्याघरी आली. आई बाहेर गेली.नंतर बाळ्याची आई अखंडपणे बोलत होती. थोड्यावेळानं आई घरात आली, आतुन कडी लावली आणि लाटण्याने माझी यथेच्छ धुलाई झाली. माझ्यातला व्हायलंस पाहुन माझे कराटेचे फॅड बंद करण्यात आलं. थोड्या दिवसांनी जास्त पोरं नसल्याने सराला क्लास बंद करावा लागला.
काल ते सर्टिफिकेट पाहुन मला माझे तायक्वांदो चे दिवस आठवले. अॅक्चुली अजुनही बरीच वेगवेगळी सर्टिफिकेट्स होती. आणि अजुन बरंच काही आठवलं , आणि मी ह्या लेखात बरंच काही लिहीणारंही होतो, पण हा एकंच किस्सा भरभर लिहीता लिहीता एवढा मोठा झाला की बाकी गोष्टी पुढच्या भागात (अर्थात जमल्यास)
- (कराटे फायटर) टार ली - दी ऑरेंज बेल्ट ओनर
Wednesday, July 14, 2010
Sunday, July 11, 2010
आय.डी. तितक्या प्रकृती
मला मराठी संस्थळावर येऊन आता जवळपास दोन-अडिच वर्ष झाली. हळु हळु इथले रिती-रिवाज कळले. लोकंही हळु हळु ओळखु लागलो. इथे जशी वयानं अनुभवानं श्रेष्ठ मंडळी आहेत , तशीच अगदीच गबाळी , शेंबडी आणि ज्यांना पाहुन फक्त किळस यावी असे ही महानग आहेत. थोडक्यात काय ? की मराठी अंतरजालावर वावरणार्या लोकांची बँडविड्थ फार मोठी आहे. कोणी वैचारिक गुर्हाळं चालंवतो , कोणी आपल्या विश्वात मश्गुल स्वतःची लाल करत रहातो ,कोणाला प्रसिद्धीचे हव्यास, कोणाला स्वतःचा उदोउदो व्हावा असं वाटतं,तर कोणी काय लिहीतो हे त्याला स्वत:लाही समजत नाही. काही काही तर इतकं भयंकर पकाऊ लिहीतात की पहिला पॅरा वाचतानाच मी वैतागुन म्हणतो, "हे निद्रादेवी,मला तुझ्या कुशीत घे, आणि दोनचार चांगलीशी स्वप्न दाखव बाई , ह्या लेखकानं माझ्या डोक्याचा भुगा केलाय ".
माझ्या अंडरस्टँडिंग नुसार, मराठी संस्थळांवरुन बौद्धिक ग्रहण करण्याचा प्रकार शुन्य टक्के आहे. किंबहुना तो शुन्य टक्केच असावा. एखाद्या जनरल विषयातली माहिती वगैरे ठिक आहे. कोण महाभाग जेंव्हा एखाद्या गोष्टीचं भुसकाट काढे पर्यंत एखाद्या विषयावर पकवतो तेंव्हा आमचा नेहमीच तोल ढासळतो. आपल्याला जे शिकायचं होतं ते आपण शाळेत/विद्यालयांत शिकलो आहोत. आणि जरी आपल्याला इंटरनेट वर कोणती माहिती हवी असेल तर त्यासाठी गुगल बाबाने मिलियन डॉलर्स खर्ची घालुन एक एक्सलंट सर्च इंजिन २४x७ सुरु ठेवलेलं आहे. मग मराठी साईट्स वरंच हे गुर्हाळे दळने का चालु असते ? मागे कोणी एकदा कसला तरी संस्कृतचा श्लोक उचलुन आणला आणि त्याचा अर्थ काय ? म्हणुन एक धागा सुरु केला.असे आणि अशा प्रकारचे कैक धागे. मला नेहमी प्रश्न पडतो, साला हे लोक ह्या सुभाषितांचा/श्लोकांचा अर्थ जाणुन नक्की काय करत असावेत? बर आता म्हणाल तर ही सुभाषितं लिहीली गेली तो काळ कोणता होता ? त्याकाळाप्रमाणे आपण आज आचरण तरी करणे शक्य आहे का? गितेत कृष्ण म्हणुन गेलाय "फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा" शेंबड्या पोर्याला देखील ही ओळ माहिती असेल, पण मग आज आयटी वाले इन्क्रिमेंटची(पक्षी: फळाची अपेक्षा) वाट का पहात असतात ? तिकडे इन्क्रिमेंट झाली की इकडे पेपरं पडायला सुरुवात होतेच ना ? आहो का नाही होणार? कृष्णाला देव मानतात म्हणुन ठिक आहे, नाही तर कृष्णाच्या ह्या तत्वज्ञाना बद्दल लोकं त्याला वेड्यात काढायला कमी करतील ? मग हेच लोक 'मला सुभाषिताचा अर्थ सांगा हो" म्हणुन काय कोल्हेकुई पिटतात ? तर ह्याचं सुबोध मराठीत उत्तर आहे, "माझ्या अभ्यासुपणाचं कौतुक करा" , "माझ्या लेखावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडा ( ह्यांच्या लेखांवर कुत्र मुतल्यासारखाच पाऊस पडतो,हा भाग अलहिदा).
अजुन एक प्रकारचा फ्रस्ट्रेटेड प्रकार पहायला भेटतो, तो म्हणजे पण्णाशी किंवा साठी उलटलेले एकेकाळी उच्चशिक्षण घेतलेले (आणि सद्ध्या रिकामे असलेले) वृद्ध गट. ह्या गटातली लोकं अशा विषयांवर लिहीतात जो विषय एखाद्या पेपरात छापुन येतो आणि तो पेपर पोर्याला गटाराशेजारी बसवताना त्याची आई खाली पसरवते. ह्यांच्या लेखणाचा स्पिड आणि एवढं ढिगाढिगानं प्रसवणारं ते भयंकर मटरेल पाहिलं की खडकवासला धरण तुडुंब भरल्यावर जशी त्याची सगळी दारं खुली करतात आणि पाणी जशी वाट मिळेल तसं प्रलयकारी वेगात वहातं त्याची आठवण होते.कधीकधी हे लोकं कोणत्याश्या इंग्रजी नॉवेलचं भाषांतर (अगदी वर्ड-टु-वर्ड बरंका) करत बसतात आणि मग त्याचं आपल्याला अप्रिसियेशन मिळेल म्हणुन चातका सारखी आ वासुन धागा रिफ्रेश करतात. ह्यांच्या इथे कुत्र ही मुतत नाही, ते नुसतंच वास घेऊन जातं , चार प्रतिसाद असतात त्या पैकी २ यांच्यासारख्याच नगांचे असतात , आणि २ प्रतिसाद हे त्याप्रतिसादांना आभार प्रदर्शित करणारे ह्यांचेच असतात.
"माझी कुणीतरी दखल घ्यावी" असं कोणत्याही मणुष्यप्राण्याला वाटते. पण अरे बाबा, तु तुझ्या घरात नाहीस जिथे तु चड्डी जरी भरवली तरी तुझी आई, लाडानं "कशी गं शु केली माज्ज्या बाळानं, आत्ता तर भरवलं होतं मी माज्ज्या शोणुल्याला.." करंत पुन्हा "श्श्श्श्श्सूऊऊऊऊ श्श्श्श्श्सूऊऊऊऊ" करत उरलेला कार्यक्रमही जोरात कर म्हणुन प्रोत्साहित करेल. काही आय.डी. इतके अॅडिक्टेड असतात ह्या 'दखल घेणे' प्रकाराला, की त्यांची त्यांच्या धाग्यांवर नकारात्मक प्रतिक्रिया खायचीही तयारी असते , फक्त "माझ्या धाग्याला प्रतिसाद द्या हो" एवढ्या एकाच हेतु ने प्रचंड प्रेरीत असतात. ह्या दखल न घेतल्याचा त्रास नव्या - नवख्यांपेक्षा जुण्या-मुरलेल्या लोणच्यांचा जास्त होतो.हे लोकं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात यशस्वी असतीलही , कदाचीत त्यामुळे त्यांच्या मराठी संस्थळांवरच्या अपेक्षा वाढत जातात. '१५० लोकं मला रिपोर्ट करतात, माझ्या पाण्चट विनोदांना सुद्धा हसतात' हीच अपेक्षा यांच्या अंतरजालावर असते, आणि सगळा घोळ होतो.
काही आय.डी. हे अगदीच बाळबोध लिखाण करतात.हे कशावर लिहीतात? का लिहीतात? कोणत्या वाचकवर्गासाठी लिहीतात? ह्याचं ज्ञान ह्यांना स्वतःलाही आहे की नाही ह्याबाबद मी अजुन सांशक आहेत. लेखाचा हेतु काय आहे ? हे यांना उमगलेलंच नसतं.पण केवळ फुकट आहे म्हणुन पानं भरवायची, त्यातुन पुन्हा लोकांकडुन "वा वा! काय छाण लिहीलंय! च्या अपेक्षा ठेवायच्या! तो खुळचटपणा इतका बकवास असतो की की असे आय.डी. पाहिले तरी सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. काही काही आय.डींनी तर स्वतःचे असे ऑफसेट्स बनवले आहेत. त्यांची जालावरची ती ओळखंच तशी आहे. हा आय.डी. जर नाव बदलुन आला आणि कोणाचा जर त्याच्याशी साम्य असलेला आय.डी. असेल तर त्याची त्रेधातिरपिट होते.नव्हे त्याला तितकं जागरुक व्हावंच लागतं. तो प्रत्येक ठिकाणी वावरताना 'ह्या" आणि माझ्या आय.डी. चा काही संबंध नाहीये ;) थोडक्यात, ह्यांची दखल जरुर घेतली जाते पण ती ह्या प्रकारे. लोकल/बस साठी स्टेशन वर उभे असताना गर्दीत सामान्य लोकं आजुबाजुला असतात. आपण त्यांची दखल घेत नाही, किंवा वि जस्ट डोंण्ट माईंड देम बींग क्लोज टु अस इन गर्दी(मराठीत क्राऊड) पण जर एखादं दाढीचे खुटले वाढलेलं,अंगाचा वास येणारं,गबाळे कपडे घातलेलं बेनं शेजारी उभं राहिलं तर आपण न रहावुन आपली जागा तरी बदललो नाही तर त्याला तरी दुर रेटतो. ह्यांच्याविषयी आमच्या जालिय सदस्यांची मतं काहीशी अशी आहेत.
"अरे तो ग्याणबा७८९ म्हणजे शेंबुड आहे रे , घृणा वाटते मला त्याची. "
"हा हा हा , ह्या ग्याणबाच्या डोक्याचे आटे ढिल्ले झालेत , काय बावळट पणा करतोय "
"हा ग्याणबा तर ||***|| ला सुद्धा लाजवेल असा वागतो रे हल्ली"
" हा बहुतेक लहाणपणी डोक्यावर पडलेला असणार " असो , ही लिस्ट फारंच अपुर्ण आहे. ह्यांच्यावर उधळलेल्या स्तुतीसुमनांचा एक नवा धागा होऊ शकेल.
आय.डी.चा अजुन एक पैलु म्हणजे राजकारणी आय.डी. ह्यांना केवळ जालिय राजकारणात रस असतो, ह्याच्या त्याच्या स्क्रॅपबुक मधे जाऊन या बोटावरच्या थुंकी त्या बोटावर करणे , पिना मारणे , एकाला दुसर्या विरुद्ध भडकवने, एखाद्याला दुसर्याविरुद्ध "चढवुन देऊन" आपण लांबुन त्याची मजा लुटणे. असे हे विकृत आय.डी. हे स्वतः शक्यतो क्लिन कॉलर रहाण्याचा प्रयत्न करत असतात. पण दर वेळी जमुनंच येईल असे नाही. मग तोंडघशी पडलं की दुसरीकडे त्याच आय.डी. बद्दल गोडगोड जवळीक साधणार्या प्रतिक्रीया लिहायच्या. जालावर सगळ्यात इरिटेटिंग आणि नको असलेले कोणी प्राणि मला वाटले असतील तर ते हे. स्वतःला चालाख हुशार आणि दिडशहाणे समजणार्या ह्यांना "गिरे तो भी टांग उपर" राहिल असा शाप मिळालेला असत्तो बहुतेक.
असो , जालावर फिरताना मला १०० विचित्र टाळकी भेटली असली तरी २०-१ अफलातुन टाळकी सुद्धा भेटली. प्रो'ज अँड कॉन्स प्रत्येक गोष्टीला असतात. मामला बॅलंस्ड है.
प्रत्येकजण कुठेतरी स्वतःच्या "आयडेटिटी" च्या शोधात असतो, त्याला त्याची "आयडेंटीटी" मिळो इतकंच मागणं विधात्याकडे आहे, कारण "आयडेंटीटी क्रायसीस" मधे अडकलेले,पिचलेले आणि फ्रस्टेट झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे , आणि ही चिंतेची बाब आहे :)
जो जे वांछिल तो ते लाहो || प्राणिजात ||
-(जालप्रकृती अभ्यासक) टारझन

Friday, July 9, 2010
स्टेप-बाय-स्टेप
हल्ली ना ,मला कसलं वैराग्य आलंय कळत नाही. पुर्वीसारखं काही वाटतंच नाही , पुर्वीसारखं म्हणजे हे आत्ताआत्ता, कॉलेजात होतो तसं. कॉलेजात छोट्या छोट्या गोष्टी देखील मनमुराद आनंद देऊन जायच्या , एक्साईटमेंट्स देउन जायच्या. कोणती अनपेक्षित गोष्ट घडली की "आनंदानं हुरळुन जाणं" हे मला फक्त कॉलेज पर्यंत माहित होतं असं वाटतं , त्यानंतर ते ग्राज्युअली कमी कमी होत गेलं. का कुणास ठाऊक ? माझ्यासारखं माझ्या वयातल्या इतरांचंही असंच होत असेल का ?
कॉलेजात असतांना कोण्या पोरीने साधा कटाक्ष दिला तरी तो काळजाला भिडे. मनात मोरपिस वगैरे फिरल्याच्या,मनतरंग सैरभैर होऊन भर उन्हाळ्यात पाऊस पडावा आणि आपण बेभान होऊन नाचावे वगैरे वगैरे कविकल्पना आपल्या आपल्यालाच सुचत. आता हे आठवलं तरी हसु येते (की मी आता स्वतःचं हसु करुन घेतोय ?) कुठल्याशी कंपनी इंटरव्यु ला येणार किंवा आपण इंटरव्यु अपियर होणार ह्यातही प्रचंड थ्रिल होतं , काय होईल ? होईल का माझं प्लेसमेंट ? मनाची सैरभैर धाव इथपर्यंतही थांबत नसे. त्यानंतर येणारा पगार ,मग त्या पगारातले मी घरी किती देणार आणि स्वतःसाठी किती ठेवणार ? किठे कुठे भटकायला जाणार ? किती पार्ट्या करणार , सग्गळं सग्गळं कसं टु एक्सायटिंग टू ब्रिथ ! रिझल्टच्या दिवशी वरवर जरी जोक्स पास करत असलो तरी आत काय काहुर माजलेला असे ते माझं मला माहित. आम्ही इंजिनियरींगला अभ्यास ही शेवटची प्रायॉरीटी ठेवली होती, पीएल्स सुरु झाल्यावरही १० दिवसांनी आमची वात पेटे आणि मग आम्ही पेटुन अभ्यास करत असु, त्या आधी सगळा आनंदी आनंद गडे ! त्याची फळंही मग एखाद दुसरी केटी लागुन आम्हाला मिळाली , अर्थात आम्ही त्यातही धन्यता मानायचो , चला एका केटीवर सुटलो गड्यांनो. पण मी जेंव्हा बी.ई. फायनलचा रिझल्ट पाहिला, कोणता क्लास आला त्याकडे लक्ष नव्हतं , नजर आधी फिरली ते गुणतक्त्याच्या उजव्या बाजुला , एक-एक करत सगळे 'P' दिसले , प्रत्येक 'P' नंतर हृदयाचे ठोके एक्स्पोनेंशियली वाढत होते, शेवटी "Pass: Higher Second Class" ची लाईन पहाताना मोठ्ठ्याने ओरडावसं वाटलं पण का कुणास ठाऊक कंठातुन आवाजंच निघला नाही,एक थेंब टप् कन मार्कशिट वर पडला. दुसरा पडला, अगदी तिसराही पडला! ह्याला आमचा आमच्या अॅबिलिटीवरचा अविश्वास म्हणा, नाही तर रेप्युटेशनवरचा विश्वास म्हणा , मी दोन मित्रांकडुन माझं मार्कशीट ,नाव आणि मार्क्स बरोबर असल्याचं चेक करुन घेतलं. "थोडक्यात फर्स्टक्लास हुकला गड्या " - इति मित्र. "गेला भो**त तो फर्स्टक्लास" असं म्हणुन मी फायनलम्याच मधे पेणल्टी शुटआऊट मधे ४-४ स्कोर असतांना गोलकिपरने अफलातुनपणे गोल आडवावा आणि म्याच जिंकावी त्या आवेगाने पळत सुटलो होतो. अजुनही आठवतंय, इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षाला "मजाक मजाक"मे चांगला सपाटुन नापास झालेलो. नंतर एम-१ केटी ठेउन सेकंड इयरला ही आलो ... तेंव्हा ही आम्ही सिरियस नव्हतो. नंतर "एम-१" साहेब क्रिटिकल ला गेल्यावर मला तारे दिसु लागले. सेकंड इयरला पास होऊनही जर फर्स्ट इयरचा एकही सब्जेक्ट राहिला तर थर्ड इयरला जाता येत नाही. त्या दिवशी फर्स्ट ईयरचा रिझल्ट होता. माझ्यासाठी जणु "जजमेंट डे" च! मार्कशीट हातात मिळाल्यावर पहिल्या रो मधे तब्बल "४८" मार्क पाहिले.. हो हो "४८" मार्क्स म्हणजे आमच्यासाठी सेंच्युरीच होती. मटकन गुढघ्यांवर बसलो. मागची पोरं दंगा करायला लागली. निकालानंतर काही मुलं आनंदानं उड्या मारत यायची तर काही हिरमुसायची. कचितंच एखादा दगड असायचा जो इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ व्हाट हॅपनड् इन मार्कशीट, मख्ख तोंडाने यायचा. थोडक्यात काय ? तेंव्हा इमोशन्स फार सेन्सिटिव्ह होत्या. मी आनंद उपभोगायचो , एक्साईटमेंट / थ्रील उपभोगायचो , दु:खी देखील व्हायचो.
थर्ड ईयरला जेंव्हा एकदा प्रेमात पडलो तेंव्हा नेहमीच बंक मारणारा मी , रोज ९:०५ ची लोकल कश्शीही मॅनेज करुन पुढेच असलेल्या पिंपरीच्या प्लॅटफॉर्म कधी ती दिसते असं होई. जशी लोकल प्लॅटफॉर्म वर एंट्री करे , नजर तिचा शोध घेई, भरभर लोकं नजरेसमोरुन जात , आणि बरोब्बर तिच्या रोजच्या जागी ती उभी असे, माझा दिवस बनल्यासारखे होई. उलट ती दिसली नाही की पुर्ण डिसमुड होउन जात असे. बाकी ह्या प्रकरणाचे डिटेल्स तुम्ही "माझ्या प्रेमाचे तीन पोपट-३" मधे वाचलेच असाल (नसेल वाचलं तर वाचा , हा छुपा संदेश ;) ) असो. सांगन्याचं तात्पर्य इतकंच , आय वॉज एंजॉईंग माय लाईफ.
पण अलिकडे स्साला काय झालंय काही कळतंच नाही. गुलछबु,बाहेरुन मोहक/आकर्षक वाटणार्या सॉफ्टवेयर इंडस्ट्रीत आता तिनेक वर्ष उलटुनही गेली. आधी मी घरी प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागायचो, आता देतो. आयुष्य एका स्टेप ने पुढं आलं, आता असा १८०अंशांनं बदल झाल्यासारखा वाटतो. तेंव्हा इंजिनियरींगची वार्षिक फी देताना नाकी नऊ यायचे, आता एका झटक्यात देऊ शकलो असतो. तेंव्हा कँटिन मधे २२ रुपयांची एग-बिर्याणी म्हणजे फुल्टु चंगळ असायची, मी आपला ४ दिवस पैसे साठवुन मग एकदा एग-बिर्याणी खायचो.च्यायला, इतक्या साध्या गोष्टीतही आनंद मिळायचा. आता पंचतारांकित हॉटेलांत ( ते स्वखर्चाने की कंपनीच्या ? असले पाण्चट प्रश्न विचारणार्यांना आम्ही फाट्यावर मारतो ) तंगड्या तोडुनही तो आनंद मिळत नाही, खायचंय म्हणुन खातो. डझंट म्याटर यार. व्हॅट डझंट मॅटर ? द बिल ? ऑर द फिलींग्स ? नथिंग मॅटर्स नाऊ !
नाऊ द लाईफ हॅज बिकम लाईक अ ब्रेड-बटर. डेली इट लुक्स सेम, डेली इट टेस्ट्स सेम अँड द मोस्ट इंपॉर्टंट थिंग इज आय डोंट एंजॉय इटिंग इट. व्हाट द फक इज गोईंट ऑन ?
पैसा येतो जातो. क्षण फक्त जातात. आयुष्यातले दिवसही असेच चाललेत. आणि माझ्या कडे त्यांना जाताना पहाण्याशिवाय आणखी काहीच ठेवलेलं नाही. आला दिवस उठतो मी , दिनचर्या आटोपुन ऑफिसात पाट्या टाकतो मी. दोन चार साईट्स वर विरंगुळ्याचे क्षण शोधायचो (आता त्याचाही कंटाळा आला , आय क्विट !) जगण्यासाठी खावं लागतं. काय खातो ह्याला अर्थ नाही, खायचं म्हणुन खातो. पचवण्याचं काम ऑटोमॅटिक आहे. आणि स्वतःला निद्रेच्या हवाली करतो मी. व्हाट इज माय अचिव्हमेंट ऑफ द डे ? डू आय फाईंड अ सिंगल मोमेंट विच इज अ डे वर्थ ? नो, अॅब्सोल्युट्ली नॉट !! आय मिस द फन बडी !
पैसा पैसा पैसा !! डझंट मेक माय मुड नाऊ. लवकरंच मी एक तथाकथित मोठी नावाजलेली मल्टिनॅशनल कंपनी जॉईन करतोय. पगार आधीपेक्षा दुप्पट. पण आनंद शुन्य. काहीच एक्साईटमेंट नाहीये. कॉलेजात असतांना जर ह्या कंपनीत नंबर लागला असता तर मी गावजेवण घातलं असतं, हत्तीवरुन साखर वाटली असती, घराला पुर्ण लायटिंग करून दिपोत्सव साजरा केला असता. आता मित्रांना फक्त फॉर्म्यालिटी म्हणुन पिंगवत .. "बाबारे इकडे जॉइन करतोय " बास !
थँक्स टू माय बडीज! आय स्टिल फाईंड माय फन विथ देम. बाप्या-नर्या-प्रदिप-योग्या-निल्या-आज्या-कावर्या-बोरक्या हीच आमची बडीलिस्ट. नाही म्हणायला मित्र भरपुर आहेत, अगदी दिप्या-कुक्की सारखे संकटमोचन मित्रही आहेत. पण ते त्यांच्या लाईफ्स मधे बिझी झालेत.
पण जेंव्हा जेंव्हा मित्रांना भेटतो , दंगा करतो तेंव्हा टाईम मशीन नक्कीच उलटी फिरते. पुन्हा एकदा मी त्या वेव्हज वर सर्फिंग करुन आपला मनमुराद आनंद घेतो. कॉलेज आधीचं आणि नंतरचं लाईफ ह्यात काय फरक आहे हे मी सांगण्याची गरज नाही.
हे छोटंस स्फुट ... आयुष्य स्टेप-बाय-स्टेप बदल रहातं.
"चेंज इज द ओन्ली थिंग इन लाईफ विच इज कॉन्स्टंट . "

Monday, July 5, 2010
भारत बंद , न्युज चॅनल्स आणि ह.ह.पु.वा.
णमस्कार्स लोक्स ,
हो , आहो भारत बंद आहे ना आज ? मंग ? आम्ही घरी पडिक :) (तसंही ऑफिसात असलो तरीही आम्ही पडीकंच असतो) एखाद्या पक्षाला एकदा का बहुमत मिळालं आणि त्याला काँपिटिशन मिळाली नाही , की तो कशी मनमानी करतोय, हे आपण प्रत्यक्ष बघतोय , नाही ? असो.. राजकिय मुद्द्यांवर वाद घालावा असा काही माझा इथे हेतु नाही. पण या सगळ्यात फायदा आहे तो ण्युज चॅणल वाल्यांचा हो !! पहा पहा , आपले ण्युज वाले आपल्याला घरबसल्या अपडेट्स मिळावे म्हणुन कसे ह्या सुटीच्या दिवशी बंदाचे अपडेट्स घेऊन येत आहेत :)
एक बाकी सत्य , एखादा ण्युज चॅणल असो वा वृत्तपत्र, राजकियस बायस्ड पणा त्यांत असतोच. आता आमच्या आजतक चंच घ्या ना ? आहो हसुन हसुन मुरकुंडी वळली =)) झालं काय ? सकाळ पासुन मी हा न तो ण्युज चॅणल चाळतोय, सगळीकडे बंद सफल झाल्याचं दिसतंय , कुठे जाळपोळ होतेय , कुठे बस,रिक्षा,कार्स च्या काचा फोडल्या जात आहेत , रोड ओस पडलेत ... तोच आमचे आजतक वाले "ये बंद फेल हुआ है ... " "बंद से यातायात बिल्कुल व्यस्त नही " इत्यादी बातमी देऊन थोडक्यात काँग्रेसचं लांगुलचालन (काय शब्द आहे हो हा ,च्यामारी) का काहीतरी चालल्यासारखं दिसतंय ... मग हे लोकं बंदाचा कसा "काहीच्च परिणाम झाला नाहिये" इत्यादी सांगण्याची धडपड मला त्या टेलेब्रांड च्या जाहिरातींसारखी वाटते. तिथे एखादा प्रॉडक्ट विकताना , कैच्याकै म्हणजे कैच्याकै गोष्टी बडबडल्या जातात. जसं "ये देखीये फोन के साथ आप को मिलते है ये हाय क्वालिटी इयरफोन्स .. ये इयरफोन्स की आप के कानोंपर ग्रीप एकदम मजबुत है ... जिस्से आप को बार बार इन्को निकालना नही पडता(????? नक्की इयरफोनच्याच ग्रीप विषयी बोलतोय ना ? ) " असो ह्या आजतकच्या रिपोर्टर ने चर्चगेटावर कोणत्यातरी माणसाला पकडलं (जो मला वाटतंय १००००% त्यांचाच माणुस होता) आणि त्याला अगदीच फालतु प्रश्न विचारायला सुरुवात केली ...
१. क्या आप पे बंद का कोई असर हुआ है ?
-> नही नही , बिल्कुल नही .. ये देखो मै तो बे रोकटोक आ जा रहा हूं .. रेल्वे टाईम पे चल रही है (इकडे मी =)) )
२. आप के दफ्तर को छुट्टी नही है ? क्यो नही है ?
-> नही हमारे "सरकारी" दफ्तर को छुट्टी नही है ...
३. आप घर से कितने बजे निकले ?
-> जी मै अपने नॉर्मल टाईम पे निकला हुं जी
बास .. ह्या तीन प्रश्नांत आजतक वाल्यांनी "ह्या बंदाचा कोणताच परिणाम झालेला नाही , सगळं कसं सुरळीत चालु आहे " म्हणुन ठोकुन दिलं आणि नंतर बॉम्ब टाकला "हाला के सडकों पे कोई नही है .. सडके ओस पडी है ... "
अरे ? =)) आत्ता तर म्हणत होता सगळं सुरळीत आहे म्हणुन ?
तोच दुसर्या एका चॅनल वर "बंद से पुरा जनजिवन प्रभावित .... नितीन गडकरी ने खुद को गिरफ्तार करवाया .. बहोत से बिजेपी वाले पोलीस स्टेशन मे " तर काही पोलिसांचा निर्दयी लाठीचार्ज दाखवत होते ...
मधेच एक न्युज चॅनलवर धोनीच्या लग्नाचा एपिसोड चालु होता... त्यात एक ८-१० सेकंदांचा एका घोडीचा फुटेज असा लुप मधे दाखवत होते, एक घोडेस्वार तिच्यावर बसुन इथुन तिथपर्यंत जाताना दाखवला ... हे रिपोर्टर भाऊ चालु .. " आप देख सकते है .. ये वो घोडी है जिसपे बैठ के माही अपनी दुल्हन को लेने आयेंगे " आणि त्यावर सुमारे १० मिनीटं तेच तेच वेगळ्या अँगलने सांगणं सुरु होतं ... मनात म्हंटलं यांना जर कुठेसं त्या घोडीचं लिद वगैरे पडलेलं दिसलं तर हे त्यावर सुद्धा ३० मिनीटांचा एक एपिसोड काढतील .. 'ये देखीये ये उस घोडी का लिद है जिसपे माहि बैठणे वाले है ... जब माहि घोडी पे बैठेंगे तब उसका स्वास्थ्य और मन शांत होणा जरुरी है... असो पुढचं इमॅजिन करा "
पुढचा चॅनल मराठी .... ह्यांचा ण्युज रिपोर्टर फ्रेशर असावा , ह्याच्यात आणि आमच्या पिं-चिं-वार्ताहार चॅनल च्या ण्युज रिपोर्टर मधे काह्ही एक फरक नाही ... रखडत- अडखळत तो बिचारा बंदाच्या बातम्या देतो ... आणि फुल्टु मनोरंजन होतं !!
कधी कधी वाटतं , ह्या ण्युजचॅनल्स ची कॅटॅगरी बदलुन "एंटरटेनमेंट चॅनल" करायला हवी.
जेंव्हा जेंव्हा मेजर घटणा घटतात , तेंव्हा तेंव्हा हे ण्युजवाले एक्स्क्लुझिविटी आणि ब्रेकिंग ण्युज बनवण्याच्या नादात बातमी कमी आणि मनोरंजन जास्त करतात.
क्यामेरा म्यान गजोधर पांडे के साथ मै टारझन चौरासिया , न्युज टीएनेन,भाजीवाला मार्केट .

Subscribe to:
Posts (Atom)