णमस्कार्स मंडली ,
सहजरावांबरोबर चर्चा करता करता सुचलेला एक विषय ... आपली बॉलीवुड परंपरा अतिशय महान आहे. मनोरंजणाचा अनलिमिटेड खजाणा आहे.
दलाल : मिथुन च्या एका अप्रतिम हिट चित्रपटातलं हे गाणं म्हणजे क्या केहने ? सुनते ही बात बनती है ..
"चढ गया उपर रे ... अटरीया पे लोटन कबुतर रे ... गुटूर गटूर ..."
व्वा !! ज्या कोणी लिहीलंय त्याने कसं एखाद्या बैठकीला लिहीलंय ... "चढ गया उपर रे ... " मधे जो यमनाचा सुर लागतो त्यावर मिथुन ने तितक्याच ताकदवर नृत्याभिनयाने शब्दाशब्दाला दाद दिली आहे. आणि त्यानंतर "अटरीया पे लोटन का कसला तरी कबुतर म्हणजे खल्लासंच ! शिवाय "गुटूर गुटूर " हा कोरस सदृष पदार्थ तर लाजवाब .
हिरो नंबर १ : ह्यात खरं तर एकसे बढकर एक गाणी. तसंही नाईंटीज मधे गोविंदावर पिक्चराईझ झालेल्या गाण्यांना तोडंच नाही. गोविंदाला दिलेलं ड्रेसिंगही खास असे .. लाल शर्ट , पिवळी पँट (आजवर आम्ही फक्त गोविंदा आणि द मास्क लाच पिवळ्या पँट मधे पाहिला आहे ) ... गाणं काहीसं असं होतं
मै तो रस्ते से जा रहा था ..
भेल पुरी खा रहा था ...
तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू ?
फक्त एकंच प्रश्न पडला .... रस्त्याने चालता चालता अशी भेळपुरी खाता येते ? बर खातोय गोवींदा ... आणि त्या करिश्माला मिर्ची कशी काय लागली ? बरं लागली तर लेका तुझी हिरॉइन आहे ना ती ? तुच "मै क्या करू ?" म्हंटला तर कसं होणार? (नाही तसं करिश्मा म्हंटलं की बरेच स्वयंसेवी कार्यकर्ते "काहीही" करायला तयार झाली असती म्हणा ) पण ह्या गाण्याचे लिरिक्स इतर कोणत्याही गाण्यापेक्षा केवळ अर्थपुर्ण नाही तर रियलॅस्टिक आहेत. उगाच चंद्र-तारे तोडुन आणन्याच्या कवीकल्पना नाहीत .. किंवा "तेरे लिया सारी दुनिया छोड जाऊंगा " सारखी डोकेफिरू आशिकी नाही.... किती डाऊन टू अर्थ ?
गुलाम : तसं पाहिलं तर हा आमचा त्यावेळचा सर्वांत आवडता चित्रपट. अमिर खान अॅक्टिंग मधे तगडा आहे ह्यावर कोणाचंच दुमत नसेल (जसं प्रा.डॉ.दिलीप कुमार बद्दल आहे). ह्या चित्रपटातलं एक गाणं ..
"ए क्या बोलती तु ? .... " इतकी जबरस्त स्टाईल .. आणि त्यात इतका इंटेलिजंट प्रश्नं विचारावा ?
मग त्यावर लाडकी हिरॉइन " ए .. क्या मै बोलू" असं लाडिक उत्तर न देईल तर कसे ?
नायकही पहा कसा मौका पाहुन चौका मारतोय .. " आती क्या खंडाला ? " बरं आता हिरॉइनीने मंद असलंच पाहिजे का ? ती म्हणते .. "क्या .. करू ... आके मै खंडाला ? " अगं बाई .. .तो तुला इंदिरा आवास योजना किंवा जवाहरलाल नेहरु ग्रामरोजगार योजने अंतर्गत वीटा वहायला नाही गं घेऊन चालला ... असो .. कायम लक्षात राहाणारं अफलातुन गाणं
आंखे : गोविंदा बाबुंचंच एक गाणं आठवलं .
"अंगना मे बाबा ... द्वारे पेमा ... कैसे आये गोरी हम तोहारे घरमा "
कॅन यु इमॅजिन .. ? हिरॉइनीचा पप्पा अंगणात पत्ते कुटत बसलाय ... आणि दरवाजावर आई रंग घेऊन नेमप्लेट बनवते आहे "श्री.आगणे बाबा आणि सौ. द्वारका " .... आणि अशा ह्या कायम घरी पडिक असलेल्या आई-बापाच्या पोरीवर गोविंदाने प्रेम करावे ... तिला भेटणार कसा हा ? किती गहन प्रश्न किती सहजतेने माडंला आहे ? नाही ?
दाग- द फायर :एक महिमा चौधरी आणि संजय दत्तंचं गाणं .. आता 'सिवाजी - द बॉस' , 'हिरो - द नायक' , 'तात्या - द मालक' , 'टार्या - द हिणकस' सारखं "दाग" आणि "द फायर " चं काय रिलेशन आहे ? असला अतिमहामुर्ख प्रश्न विचारायचा नाही.
"ओ निले आखोंवाला ... तेरा लकी कबुतर
पिये इश्क दा प्याला .. तेरा लकी कबुतर"
आता निळ्या डोळ्यांचं कबुतर असतं का ? असा वैचारिक प्रश्नं विचारायचा नाही .. हे म्हणजे आणासपुर्या म्हणतो तसं " धु म्हंटलं की धुवायचं .. उगा काय लोंबतंय ते इचारायचं न्हाई " .. असो .. तर हे निले आखो वाला कबुतर .. तो ही महिमा चौधरी चा ? पहा काय महिमा आहे (हिला स्वतःला लक ची आवश्यकता होती .. तीला मिळालं नाही .. पण कबुतर लकीच) .. तसा सुरुवातीला काही अर्थबोध होत नाही .. पण दुसरं वाक्य आलं की पुर्ण अर्थ कसा गंगाजळाप्रमाणे क्रिस्टल क्लियर होतो.
खलनायक : संजुबाबा संजु चा हा चित्रपट कोण विसरेल .. साला आम्ही लै लहान होतो त्यावेळेस.. आणि आमच्या घरी टिव्ही पण नव्हता... तेंव्हा शेजारच्या आंटींना प्रश्न विचारला होता... तिने पुन्हा घरी टिव्ही पाहु दिला नाहीच .. उलट घरी तक्रार केली .. च्यायला माझं काय चुकलं म्हणुन मी बरेच दिवस खाजवत होतो ... डोकं.. असो .. गाणं काहीसं असं आठवतंय ..
"कुक कुक कुक कुक कुक कुक कुक ..... चोली के पिछे ... चोली के पिछे ... (एन टाईम्स) "
वं बाई जे काही आहे ते एक किंवा दोनंच असेल .. किति वेळा ? किती वेळा ? आं ? कोण्या एलियन ने लिहीलंय हे गाणं ? तर ते "कुक कुक कुक कुक " हे गाणं आमच्या गावी कोंबड्यांना परत बोलावण्यासाठी खुराड्यात डालन्याव्या वेळेस वाजवले जाण्याचा प्रघात होता. चोली के पिछे क्या है ? हे मात्र परिस्थिती नुसार बदलु शकतं .. ह्याला एकंच स्टॅटिक उत्तर कसं देता येईल ? आता जर चोली हँगर ला इस्त्रि करुन लटकवली असेल तरी तिच्या पिछे हिचं दिल कसं असु शकेल ? असो ..
राजाबाबु : गरिबांच्या मिथुनचं अजुन एक गाणं ते ही लाडक्या करिश्मा बरोबर. ऐन हिवाळ्याची वेळ ... गरिब घराण्यातली हिरो-हिरॉइनी ... (त्या काळी भिकेला लागले तरी महालात राहून फॅशन करण्याची "तारा रम पम" गिरी परवडायचीच नाही म्हणा )
"सरकाईल्यो खटिया जाडा लगे "
हिरो हिरॉइन कडे फक्त वन रुम झोपडी असल्याने हे अंगणात झोपायचे. आता त्यावेळी काही ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या नव्हती. आपली पृथ्वी हिरवी गार होती. ओझोनच्या थराला बिळ पडलेली नव्हती. अर्थात ... थंडी फारंच बोचरी पडे. हिरो हिरॉइन बाहेर झोपल्याने त्यांना मच्छरही फार चावत असावेत. त्यात यांच्याकडे एकंच गोदडी असल्याने एक सुंदर उपाय सुचवताना गोविंदा किती निरागस पणे करिश्माला म्हणतो .. सरकायल्यो खटीया जाडा लगे .. आणि त्याचं हे प्रेम किंवा समंजसपणा पाहुन तीही "जाडे मे बलमा प्यारा लगे " म्हणुन परतफेड करते.
अफलातुन गुढ खुल अर्थ असलेलं गाणं ..
आवरता हात घेतो... कारण गाणी तर खुप आहेत .. पण आमचा स्टॅमीना तेवढा नाही. आणि तसंही आम्हीच सगळं लिहीलं तर प्रतिसादात पब्लिक काय लिहील ?
- (लिरिक्स रायटर) कावेत अस्तर
तळ टिप : लेख लिहीतांना गाणी आणि माहिती पुरवल्याबद्दल सहजरावांचे आभार. ह्या निमीत्ताने त्यांच्या समर्पण कपाटात आमच्याकडनं पण एक लेख.
Friday, April 23, 2010
Wednesday, April 21, 2010
इंटरव्यु - इंटरव्यु
णमस्कार्स लोक्स ,
प्रत्येक नोकरी करणार्याला न चुकलेलं एक चक्र म्हणजे इंटरव्यु (कोण चोच्या मुलाखत म्हणाला रे ? ही काय टिव्ही वर दाखवायची गोष्ट आहे का ? ) असो. इंजिनियरींग मधे जसा फायनल इयरला आलो तसे इंटरव्यु चे वेध लागलेले. अॅक्चुअली तेंव्हा व्हायवा किंवा प्रॅक्टिकलच्या वेळेस घेतली जाणारी ओरल ... ह्या गोष्टींना कधी घाबरलो नसलो तरी एक प्रकारचा नर्व्हसनेस माझ्यात असे.
कँपस इंटरव्यु मधे आमच्या पराक्रमांमुळेच बर्याच कंपण्यांच्या क्रायटेरियातुन आम्ही बाहेर पडायचो .. तेंव्हा त्याची तर माणसिक तयारी होतीच. पण मग आम्ही फावल्या वेळात लोकांचं निरिक्षण करायचो .. आमच्या बॅचची २०-३० पोरं इंटर्व्यु ला बसायची आणि २-३ सिलेक्ट व्हायची .. न सिलेक्ट झालेल्यांची एकंच ओरड असायची .. पारशॅलिटी केली साल्यांनी .. किंवा मी बरोबर उत्तरं देऊन पण आम्हाला घेतलं नाही ... आणि त्यांचे प्रेमभंग झाल्यासारखी बडबड ऐकुन घ्यायची ... आम्ही टगे ते ऐकुन पोट दाबुन दाबुन हसायचो .. माधेच कोणी ओरडायचा .. "अरे तुझं तोंड नसेल आवडलं त्यांना .. तु तसा गुणीच हो " त्यावर बिचारा अजुन खट्टू व्हायचा. यदाकदाचित कोणत्या कंपनीने ओपन एंट्री अलाऊड केली तर जी झुंबड उडायची आमचा मुड तिथेच गायब व्हायचा. अर्थात प्रिपेरेशन चे कष्ट कोण घेणार ? म्हणुन आम्ही तशाच मख्ख चेहर्याने इंटरव्यु ला जायचो .. अॅप्टिट्युड कधी चुकून तुक्के मारुन क्लियर झालीच .. तर टेक्निकल राऊंड मधे मख्ख चेहर्याने बसुन रहायचो . इंटरव्यु घेणारा शेवटी शरणागती पत्करुन "नेक्स्ट" म्हणायचा :) आणि आम्ही पुन्हा कंपनीच्या नावाने शिव्या द्यायला मोकळे .. "अर्रे जाऊ दे रे .. बरं झालं सिलेक्ट नाही झालो ह्या कंपनीत .. साला लै फडतुस कंपनी होती ", "नाय नाय नाय .. ही कंपनी काय आपल्या लायक नाय .. " , "अर्रे आपण तर स्वतःची कंपनी काढणार बॉस .. :) " इत्यादी नेहमीचेच डायलॉग फेकले जायचे .
पास आउट झाल्यावर खर्या मजेला सुरुवात झाली ... "फ्रेशर" हा टॅग किती खतरणाक असतो हे कँपस प्लेसमेंट न भेटलेला सहज सांगु शकेल.. कोण्या सकाळी मित्राचा मेसेज येतो .. "आमुक आमुक कंपनी , फलाना फलाना पत्ता.. ९ वाजता " .. तसेच डोळे पुसून अंगावर भरभर पाणी मारुन अंघोळ आटपायची .. कसेबसे दात घासायचे ... आईने तोवर च्या केलेलाच असतो .. त्यातला बळेच एक घोट घेऊन पटकन कपडे चढवुन बुटं घालुन निघायचं ... उशिर झाला असेल का ? सिव्ही ची तर रद्दीच बनवलेली असते .. तिसेक सिव्ही पडिकच असायचे. बर्याचदा पत्ता माहित नसायचा. ह्याला त्याला विचारत कंपनी शोधत कँपस दिसला ... की दर्शन होतं ते १-१ किलोमिटर लांब लायनीचं ... च्यामारी इथे काय सिडको च्या घरांचं लॉटरी कुपण विकताहेत का जॉब देताहेत ? प्रश्न पडतो. तसं नंतर नंतर मन ही गोष्ट स्विकारुन अजुन प्रिपेयर करण्याची शक्ती पैदा करतं. जॉब शोध चालु असतांना दिसायला लागले ते परप्रांतिय ... नॉर्थ इंडियाच्या कसल्या पटना,भोपाल्,इत्यादी कसल्या फडतुस युनिव्हर्सिटी तुन आलेलं पब्लिक .. इंजिनियरींचे मार्क्स पाहिले तर ८० न ९० % .. च्यायला आमच्या पुण्याच्या युनिव्हर्सिटीचा टॉपर ७०-७५%च्या वर जात नाय राव ... इकडे सर्रास ८०-९० ? मग कंपण्याही गर्दी पाहुन चला .. ७० च्या खालचे कटाऊट व्हा .. म्हणुन बराचसा लोंढा परतवुन लावायचे :) आता उरलेले लोक कुठले असणार हे सांगायला हवं का ? तेंव्हा राज ठाकरे नव्हता पण परप्रांतियांविशयीचा द्वेष वाढु लागला होता :) कधी कधी पहिल्या तर कधी दुसर्या .. तर कधी तिसर्या-चौथ्या राऊंड ला बाहेर पडत आम्ही सगळीकडुन रिजेक्शनचा अनुभव मिळवला :) जेंव्हा कधी सिलेक्ट झालो तेंव्हा मात्र ३-३ ऑफर लेटरं हातात होती :)
आताही इंटरव्यु देतो. पण आता इतकं टेंशन नसतं ... आपल्याच स्पेसिफिक डोमेन मधला इंटरव्यु असला की काही एक्स्ट्रा प्रिपेयरही करायचं नसतं. फ्रेशर सारखी गर्दी फक्त पेशव्याच्या कंपण्यांसारखी कंपण्यांमधे असते. मग आमचं काम उरतं ते निरिक्षण करण्याचं ... ही निरिक्षणं दर वेळेस थोड्याफार फरकाने सारखीच असतात. अशा वेळेस आमचे कान आणि डोळे हे दुप्पट क्षमतेनं काम करतात.
सुरुवात होते ते एच्चारकडे सिव्ही सबमिट करण्यापासुन. जॉबला अप्लाय करताना स्किलसेट क्लियरली मेंशन केलेला असुनही काही महाभाग लक आजमावण्यासाठी आलेले असतात. ते नुसते येतंच नाहीत तर ते चक्क एच्चार वाल्या पोरीबरोबर हुज्जतही घालतात. ह्या एच्चारच्या पोरी बहुतांश फार आखिव-रेखिव आणि बोलायला अंमळ लाघवी असतात. तेंव्हा एच्चार हा ही एक कंटाळवाण्या इंटरव्यु प्रोसेस मधे मनोरंजणाचा कार्यक्रम असतो. आम्ही त्याचा पुरेपुर उपयोग करुन घेतो. एकदा एक साऊथ इंडियन इंटरव्यु ला आला होता. इंटरव्यु होते बँकिंग डोमेन मधे अनुभव असलेल्यांसाठी. हे शेड्युल्ड इंटरव्यु होते आणि फक्त इनव्हाईटेड लोकांनाच एंट्रि होती. साऊथ इंडियन भाऊ फार लांबुन आल्याचं बोलंत होते. खंडीभर सिव्ही एकत्र करुन सगळं ऑर्गनाईझ करुन बिचारी एचार सुंदरी थोडी थकुन गेली होती. तिला हा चावत होता ." सी... म्याडमं .. आयं केम फ्राम लांग डिस्टंस .. यु ह्याव टू टेक माय इंटरव्यु" , साऊथी.
एच्चार ने त्याचा एक्स्पिरियंस पाहुन आणि इन्व्हिटेशन मेल नसल्याचे पाहुन आधीच त्याला जायला सांगितलं होतं. भाऊ तरीही खिंड लढवीत होता. "टेक माय इंटर्व्यू .. यु कांट डू धिस टू मी ... आय याम वार्निंग यू .. " ब्ला ब्ला ब्ला ! अचानक भाऊचा पारा वाढला .. आम्ही सगळे त्या दिशेने पहायला लागलो .. साऊथ इंडियनला एचार सुंदरी आता खडे बोल सुनावत होती " यु प्लिज लिव्ह द प्लेस ऑर आय'ल कॉल सिक्योरिटी" आणि शेवटी खरोखर त्याला शिपाई लोक बाहेर घेऊन गेले. जाता जाता भाऊ ने तमिळ्/तेलगु (काय असेल ते) त्या भाषेत काहीतरी अपशब्द वापरले असावेत.
सिव्ही एनरोल केलेल्यांना आत घेऊन एखादा फॉर्म भरायला दिला जातो. आणि नंतर सुरु होतो तो ... वेटिंग वेटिंग वेटिंग चा वेळ. ईंटरव्यु ला बर्याच प्रकारचं पब्लिक असतं.
इंटरव्यु देणार्यांत एक वर्ग असतो तो गृपने आलेल्या पोरांचा. ही पोरं एकसाथ घोळक्याने इंटरव्यु ला येतात. लॉबी मधे जेंव्हा सगळे वाट पाहात असतात तेंव्हा हा गृप फालतु कमेंट मारणे , पेपरची विमानं करुन भिरकावने किंवा काहीतरी चाठाळ पणा करणे इत्यादी कारणाने बर्याच जणांच्या डोक्यात जातो :) यांच्यातल्या कमेंट्स ने खरोखर हे कंपनीत इंटर्व्यु द्यायला आलेत की घ्यायला आलेत ? असा प्रश्न पडतो. "आपण विचारणार बॉ .. कॅरम पुल टीटी आहे का ? तरंच कंपनी जॉइन करु .. नाही तर गेले उडत " असं म्हणत आत गेलेला तो .. येतांना मात्र इंटरव्यु घेणार्यानंच उडत लावल्यासारखा येतो. तो आल्या आल्या लगेच त्याचा गृप "ए काय विचारलं ... ए कसा झाला रे इंटरव्यु ?" वगैरे टिपिकल प्रश्नांचा भडिमार करतो. तो काय बोलतो त्याच्याकडे मात्र पुर्ण लॉबीचे कान आतुरतेने लांबले जातात. तोही उगाच काहीबाही फेकतो. ह्या गृप मधलं शक्यतो कोणी सिलेक्ट होत नाही.
दुसरा गृप असतो तो मोठा रेफरंस लागलेल्यांचा. ह्यांची कॉलर एंट्रि केल्यापासुनंच ताठ असते. भेंडी .. आपला तर आतुनंच जॅक आहे, ही गर्दी कशी येते आणि जाते ? आपण तर मजा बघणार बॉ. ह्यांच्या मते हे इंटर्व्यु आधीच हाय्यर्ड असतात. हे कधीच कोणाशी बोलत नाहीत. आपले कडेला जाऊन रेफरर ला फोन लाऊन मुद्दाम शेजार्यांना कळेल अशा टोन मधे सुरू होतात ...
"हं अरे .. आत आलोय बरंका , तुझं नाव लिहीलंय फॉर्म वर रेफरंस कॉलम मधे .. "
" हो हो हो .. तु सांगितलेलं सगळं प्रिपेयर केलंय बघ "
"अरे टेन्शन नाही रे ... आपला आपल्या टॅलेंट वर पुर्ण विश्वास आहे "
"यो डुड .. आय विल गिव्ह यु अ कॉल लॅटर .. थँक्स फॉर अ रेफरंस यार .. व्हाड डिड यु से कोण घेणारे इंटरव्यू ?"
हा किंवा ही फोन वर बोलत असतांना बाकी पोरींचं सगळं लक्ष यांच्याकडेच्च्च लागलेलं असतं ! मनातुन शिव्याशाप ही चालु असावेत असा एक तर्क :)
अजुन एक गृप असतो मराठी पोरींचा (किंव्हा आंटींचा) ! आहाहा ;) ह्यावर तर खंडच्या खंड पडु शकतात. दोन मराठी पोरी... चालु होतात इंग्रजी मिक्स हिंदी मधे . हा संवाद ऐकण्याचं भाग्य मिळालं इथेच इंटरव्यु ची फेरी सफल होते.
"ए यु नो .. मी आत्ता जिथे काम करते ना ? आय अॅम नॉट अॅप्रिशियेटेड रे ... "
"ओह या सेम विथ मी नो .. म्हणुन तर मी चेंज करतीये .. "
"आमच्या यांणा नाही आवडत माझी करंट कंपनी.. तिकडची लोकं जाम पॉलीटिक्स करतात "
"अगं माझ्या तर आवती भोवती नुसती गोंडा घोळतात बघ माझ्या करंट कंपनीतली लोकं .. काहीही काम असलं की मीच हवी ह्यांना " ह्या नुकत्याच लग्न झालेल्या आंटी असतात. दोन किलो च्या थैलीत ४ किलो पिठ भरल्यासारखं शरीर. नाक हे भलं मोठं .. केसांत कंगवा घातला की त्याच अँगल मधे उलटा काढला तर ठिक. उंची ५फुटाच्या आजुबाजुला. वेण्या घातलेल्या. पायाच्या टाचांना भरपुर भेगा पडलेल्या. आणि प्लास्टिकच्या आवाज करणार्या कॅरिबॅग मधे यांचं अनोखं फोल्डर त्यात ह्यांची डॉक्युमेंट्स. मनात विचार येतो साला .. किती फेकावं ? आवरा हिला कोणी.
" यु नो परवा मी इन्फोसिस ला गेलेले ना तेंव्हा माझ्या लास्ट विक मधे टिसीएस च्या इंटरव्यु च्या वेळेस दिसलेल्या दोन पोरी दिसल्या "
ह्यांना मोठ मोठ्या कंपण्यांची नावं घेण्याची फार हौस होती. एका इंटरव्यु च्या लॉबीत मी एकदा पुण्यातला कॉग्नि,इन्फि,टीसीएस्,विप्रो,अॅसेंचर्,अॅम्डॉक्स चं काय .. पण कधीही न ऐकलेल्या पण ह्यांच्या भाषेत खुप मोठ्या असलेल्या कंपण्या एका लाईनीत ऐकल्या होत्या . आणि ह्या २०-२२ कंपण्यांमधे ह्या मुलीने गेल्या १५-२० दिवसांत कसे काय इंटरव्यु दिले असावेत ? असं आश्चर्य वाटुन मी भोवळ यायचाच बाकी राहातो. आणि ह्या बाई कुठे तरी काँट्रॅक्ट बेसवर काम करत असतात :) तेंव्हा मात्र हसु फुटल्या शिवाय राहात नाही.
मधेच कोणाचं कॉसमॅटिक्/ब्युटी टिप्स चं डिस्कशन चालु होतं. मग चेहर्यासाठी, केसांसाठी, त्वचेसाठी, नखांसाठीच काय तर अजुन कोणत्या कोणत्या "पार्ट्स" साठी काय काय करावं ? ह्याचं मनमुराद डिस्कशन हे लॉबी मधे चाललेलं असतं. काही पोरी तर नोट्स घेऊन आलेल्या असतात. अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत त्या वाचत असतात. मला प्रश्न पडतो ... ही नक्की इंटरव्यु ला आलीये की थेरी पेपर द्यायला ?
साधारणतः इंटरव्यु नंतर आपण सिलेक्ट होऊ की न होऊ ह्याची कल्पना आलेली असते. ह्यांनाही येते. मग हळुच रुमालाने डोळे पुसत एकेक कटते. मी म्हणतो .. करंट जॉब असतानाही रडण्याचं काय कारण ? एका इंटरव्यु मधे तर पोरीने कहरंच केला होता.मला वाटलं हीच्या इंटरव्यु घेणार्याने मुस्काडात वगैरे वाजवली की काय ? बाहेर आली ती एकदम रडत रडत ... ते मुसु मुसु रडनं ही नाही .. ते पाहुन गृपगॅंग मधला कोणी चिरक्या आवाजात रडण्याचा आवाज काढुन मग त्या कोपर्यात हशा ही पिकतो.
सगळे राऊंडस झाल्यानंतर एचार म्हणते .. "वि वील गेट बॅक टू यू ऑन मंडे विद रिझल्ट्स "
आणि इंटरव्यु संपतो. कोणी तिकडुन पिक्चरला जातो .. कोणाची गँग सिंहगडाकडे निघते. कोणी भुकेने कासाविस झालेला असतो तो आधी खायला पळतो. पोरी कधीच गृपने येत वा जात नाहीत. ज्या लॉबी मधे अशा जिवा भावाच्या मैत्रिणींसारख्या बोलत असतात त्याही तोंडाला स्कार्फ गुंडाळुन आपापल्या वाटेने शेप्रेट निघुन जातात .
आमचा इंटरव्यु होतो .. कधी कंपनीला आम्ही पटत नाही .. कधी कंपनी आम्हाला पटत नाही. आम्ही आमच्या वाटेने एकटेच घरी येतो.
एक इंटरव्यु संपतो.

Saturday, April 3, 2010
मिटींग - मिटींग
णमस्कार्स पिपल्स ,
डिस्क्लेमर्स : लेखात टेक्निकल बाबींचा उल्लेख असेल त्याचा खुलासा करण्यात येणार नाही. लेख एंजॉय करुन विसरायचा ! कळ्ळं ?
आज गुरुवार.. उदया गुड फ्रायडे ची सुट्टी .. मोठ्ठा विकांत .. पुण्याला घरी पळण्याचे वेध प्रत्येक मुंबैत जॉब करणार्याला लागलेले असतात. लंच नंतर कसला ही काम करायचा मुड नसतो. आणि एका मिटींगचा कॉल येतो. मी एका सॉफ्टवेयर कंपनीत काम करतो जी बँकांसाठी सॉफ्टवेयर सर्व्हिस देते. आणि ऑनसाईट पाठवल्याने मी बँकेच्या आयटी सेंटरात बसतो. मोठ्या सरकारी बँकांत प्रोजेक्ट्स खुप मोठे असतात आणि खुप वेगवेगळे सॉफ्टवेयर व्हेंडर्स , टिम्स आणि डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात. मिटींग म्हंटलं की मला मोठी मजा वाटते. चला .. ऑफिशियली एखाद तास डोक्याला आराम .. वर गुबगुबीत खुर्च्या, थंड थंड एसीत बसायचं .. फुकाची च्या-बिस्किटं खायची ... विकेंडच्या दिवशी तसा मी उजेडातंच निघण्याचा प्रयत्न करतो.. आणि नेमकं ४च्या ठोक्याला मिटींगला बोलावल्याने जरा नर्व्हसलो होतो.
बरं मिटींगला आमची बिजनेस डेव्हलपमेंटची लोकं, माझा सिनियर हे असल्याने माझ्या सारख्या टेक्निकल रिसोर्सचं काय काम ? असं फाल्तु निष्फळ एक्स्क्युज दिलं आणि मिटींग ला गेलो . मिटींग एका इंटरनेट बँकींग प्रोजेक्टच्या संदर्भात होती. बँकेचा डिजीएम, जीएम, सिस्टिम्स मॅनेजर , इंटरनेट बँकिंग सिस्टिम्स मॅनेजर , एटिएम स्विच मॅनेजर आणि अशी वरच्या लेव्हलची लोकं टेबलाच्या दुसर्या साईडला बसली होती.
ब्यँकेचं डिजीएम (हे महा विनोदी पात्र) .. साउथ चा आहे ... पण मराठीही बोलतो. अंध लोकांसाठीच्या बोलुन मार्गदर्शन करणार्या एटिएम च्या प्रोजेक्ट साठी त्याच्याबरोबर एकदा मिटींग झाली होती. एका टेक्निकल प्रॉब्लेम मुळे एटिएम बॅलंस बोलत नव्हता, आणि त्याचं खापर स्विच सॉफ्टवेयर व्हेंडर वर फोडावं की एटिएम व्हेंडर वर ? हे कळत नसल्याने .. तो म्हणाला .. तुम्ही त्या एटिएम मधे डाळ ठेवा ... भात ठेवा .. किंवा अजुन काय ठेवा .. मला भुक लागली .. मला जेवण पाहीजे ... (हे उच्चार त्याच्या (किंवा माझ्या) तोंडुन ऐकल्यास ह्या वाक्याची भयानक विनोदी शैली कळु शकेल ) मला डेट सांगा .. आय वाँट प्रोजेक्ट टू बी लाईव्ह .. असो ... तर हे डि.जी.एम साहेब. आता बि.डी. टिमचे लोक फुल्ल बोलबच्चन असतात. बाकी लोक येई पर्यंत मायकल (आमचा बि.डी.) ने त्याला बँकेच्या मायक्रो-फायनांस आणि रुरल बँकिंग चा विषय काढला ... तेवढा एकंच शब्द .. त्यानंतर डि.जी.एम ने कोणालाच काही बोलायची संधी दिली नाही. आणि ते अखंड अर्धा तास त्यावर व्याख्याण देत राहिले .. त्यात अजुन १०-१ वर्षांनी बँका कशा रिलायंस / टाटा / भारती / किंवा इतर मोठ्या उद्योग समुहांना लोण देणार नाहीत .. बँका कशा रोड लेव्हल ला येऊन बिझनेस करणार .. कशा छोट्या खेड्यात पोचणार ? इत्यादी नविन माहिती मला बसल्या जागीच मिळाली. मी माझ्या सिनियर ला एका कागदावर लिहीलं... "साला .. काय टाईमपास चाल्लाय रे ? " ... त्याचा रिप्लाय करुन कागद परत केला.. "काही नविन आहे का हे आपल्याला ? "
थोड्या वेळानं जीएम आणि बँकेची इंटरनेट बँकींग टिम ची लोकं आली. .. डिजीएमचं अजुनही रुरल बँकींग तत्वज्ञान वाटप सुरू होतं :) इंटरनेट बँकिंग वाला एक जण मिटींगला बसल्या बसल्या समाधी आवस्थेत गेला. दुसरा लबालबा बोलणारा होता. तो डिजीएम ला कापत म्हणाला ... "शाल वी स्टार्ट ? जीएम ला जास्त वेळ नाही " तेंव्हा कुठे ते प्रवचन थांबलं !
मिटींग ला सुरुवातीलाच बाँब पडला ... "व्हाट इज द स्टेटस नाऊ ? व्हेयर आर वी नाऊ ? " , इति इं.बँकींग वाले.
डि.जी.एम म्हणाला .. "वेल .. दॅट्स व्हाट यु नीड टू टेल मिस्टर रस्तोगी. .. " आणि ख्या ख्या ख्या करुन हसला. आम्ही पण हसलो .. (मी सुरुवाती पासुनंच हसत होतो) मिटींग चं अजुन एक ऑब्जरवेशन असं की लोकं नोटपॅड वगैरे घेऊन येतात.. मला कधीही मिटींग मधे नोट करण्यासारखं सापडलं नाही .. मी आपला समोरच्याची कार्टुन काढतो ... किंवा मग त्या पेजेस वर चॅटिंग करतो ... मेसेज लिहुन वही पास करायची.
असो .. रस्तोगी स्वतःला संभाळत म्हणाले .. "Well , Sify team has completed the online testing with the payment gateway ! Only thing pending is , we need to test "Verified by Visa" and "Mastarcard's 3D secure code " testing . "
डिजीएम, "बर मग ? बॉल कोणाच्या कोर्टात आहे ? "
रस्तोगी . " सर , Sify has told , If we complete the transaction , the browser should delete all cache memory and close the browser automatically , aslo , On the transaction successful receipt page , if we copy the URL and open in another page , it should not open "
मी मधेच बोललो .. "सर , आपण सेशन क्लोज केला की काही युआरएल कॉपींग चा फायदा नाही .. आणि आपण ते ऑलरेडी केलंय ! " इथे मी रस्तोगीचा विनाकारण इश्युज वाढवुन आमच्या कोर्टात बॉल टाकण्याआधीच नेट वर करुन पुन्हा चेंडु उलटा टोलावला होता . महाभारतात .. शकुनीने दुर्योधनाला "पांव बारा ... " हवे असल्यावर नेमके "पांव बारा ... "मिळवल्यावर जसं कौरवांचं तोंड होतं तसं आमच्या सगळ्यांचं तोंड झालं :)
डिजीएम ला टेक्निकल काही कळत नाही .. पण तो नाक खुपसुन काही तरी असा बोलुन जातो ही हसु दाबणं ही मुश्किल होऊन जातं ...
डिजीएम बोलला , "पण सेशन क्लोज केला तर काय होतं ? ती युआरएल कोणी कॉपी केली तर ? "
ह्या वाक्याला सामुहिक फाट्यावर मारण्यात आलं !
नेक्स्ट पॉईंट ..
रस्तोगी , " सर , When the internet transaction is declined , it should show a proper message to card holder , as of now if transaction is successful , same message is shown, but when transaction is declined , only Transaction Failed is coming ... "
डेव्हलपर बोलला , "प्रोजेक्ट सुरु होण्या आधीच एक डॉक्युमेंट शेयर केलंय ज्यात रिस्पाँन्स कोड आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत. ते सिस्टिम मधे लॉग होतात, कार्ड होल्डर ला डिटेल्स देत नाही आपण, कारण एकाच रिस्पॉन्स कोड ची कारणे बरीच असु शकतात. हे सुद्धा आधीच शेयर केलं आहे. " प्रोजेक्ट युएटी फेज मधे बँक वाल्यांनी बेसिक मुर्ख प्रश्न विचारणं नविन नाही. पण हसायला येणं दाबावं कशाला ? आमची खिखिखि चालुच .. सिनियर ला म्हंटलं .. "नक्की ह्योच प्रोजेक्ट पाहातोय ना ? .. त्या शेजारच्याला बघ.. जणु संत ज्ञानेश्वर .. किती एकाग्रतेने समाधीस्थ झाला .. " पुन्हा खिखिखि...
हळु हळु मिटींग मुळ मुद्द्यापासुन दुर जात राहीली ... मी घड्याळाचे काटे चेक करुन कपाळावरच्या आढ्या वाढवत राहिलो.
एक बँक वाला म्हणाला ... आपलं इंटरनेट ट्रँसॅक्शन आज्जिबात सेक्युअर नाही. (मला माझं हसु दाबल्याने एयरप्रेशर दुसरी कडुन तर निघणार नाही ना ? अशी भिती वाटून पुन्हा हसुन घेतलं ..
तो कंटिन्यु करत होता ... "जर कार्ड नंबर आणि पिन नंबर भेटला ... तर कोणीही फ्रॉड करतो .. वि मस्ट डु समथिंग अबाऊट इट "
आयला .. मग तर एटिएम बँकींग पण सेफ नाही .. कार्ड ट्रॅक कॉपी करायला काय अवघड आहे ? आणि पीन नंबरही आहे ... सिनियर ने आणि मी पुन्हा हसुन घेतलं ... आणि पुढची गम्मत ऐकत राहिलो .
"सिंगापोर हॅज कम अप विथ द मँडेट दॅट टू हॅव अ मोबाईल नंबर , आणि मग त्यावर एक एसेमेस वर कोड येतो , जो फक्त सेशन पुरता चालतो ... हे इंटरनेट वाल्यांनी केलं पाहिजे.. " इति बँक वाला .. आता इथे "इंटरनेट बँकिंग आणि स्विच वाले .. " ह्या दोन बँकेच्या टीम्स मधेच भिडली होती. ..
आणि एक मस्त मजा पहायला मिळणार होती. मी कागदावर " पतंग उडवणे सुरू झालं बघ ... " म्हणुन लिहीलं नी सिनियर ला कागद पास केला.
रस्तोगीने पलटवार केला " तसं असेल तर मोबाईल हॅक करुन त्यावरुनही फ्रॉड करता येईल .. मी जर तुमच्या मोबाईल रेंज मधे असेल तर तुमचे इनबॉक्स अॅक्सेस करु शकतो.. इतकेच काय .. तुमच्या मोबाईल वरुन मेसेज पाठवु शकतो .. "
हा 'जर" "तर" चा गेम मोठा रोचक होत चालला होता. ... खर्या प्रोजेक्टचं भजं झालं होतं ..
आणि बँकेच्याच दोन टिमांमधे खडाजंगी सुरू होती.
मी सिनियर ला म्हणालो .. बघ आता ह्याला भुक लागेल .. आणि जेवण कधी देता ? म्हणुन विचारेल .. आणि तेवढ्यात
शेवटी डिजीएम म्हणाले ... "तारिख सांगा ... " ... आम्ही दोघे हसु लागलो ..
आमच्या साईडने कसलाही डिले नव्हता... तसं ही एकंच सॉफ्टवेयर पन्नास जागी विकायचं असतं .. फक्त थोडे कस्टमायझेशन्स असतात... :) त्यामुळे आपण पुर्ण सेफ असतो..
शेवटी ज्याने "इंटरनेट ट्रांझॅक्शन अनसेफ आहे म्हणुन मुद्दा उभा केला होता ... त्यानेच ते कसं सेफ आहे हे स्वतःच पटवुन दिल्याने आमची मौज अजुन वाढली."
शेवटी १५ दिवसांनंतरची डेट फिक्स करुन (त्यातही मास्टरकार्ड व्हिजा चं रेडिनेस चे क्लॉज टाकून मिटींग संपली.. ह्या मिटींगला फक्त मिनरल पाणी मिळाल्याने थोडी निराशा झाली ...
जातांना सिनियर ला डिजीएम ने एक पेपर मागितला .. त्याने चुकून तो आमच्या मुक्ताफळांचाच कागद दिला ...चुक वेळेत लक्षात आल्याने पुन्हा मागुन घेतला आणि पुढचा अनर्थ टळला ...
आख्या मिटींग मधे बँकेच्या जीएम ने एकदाही तोंड उघडलं नाही , ढेरीचा आधार घेत त्यावर हात टेकवुन एका हाताने हनुवटीला सपोर्ट देउन जसा आला तसा शेवटपर्यंत बसुन होता. बाकी टिम च्या लोकांना काय चाललंय ते माहितीच नव्हतं !
अजुन एक मिटींग संपली .. आणि टाईमशीट मधे २ तासांची जागा भरण्यासाठी चांगली सोय झाली.

Subscribe to:
Posts (Atom)